Tuesday 31 December 2019

ओबीसी कॉलम विरहित जनगणनेविरुद्ध राजुरात एल्गार




राजुरा ,दि.31: मराठा सेवा संघ, शाखा राजुरा तसेच इतर सहभागी संघटनांच्या माध्यमातून राजुरा येथे 28 डिसेंबरला भारतातील पहिल्या ओबीसी जनगणना असहकार रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारने 2021 मध्ये जनगणना उपक्रम जाहिर केला असून जनगणना फॉरमॅट मध्ये एस. सी., एस. टी., व अन्य असे तीन कॉलम ठेवले आहे मात्र ओबीसी कॉलमचा उल्लेख नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गामधील 3743 जातींना खुल्या प्रवर्गात स्पर्धा करावी लागेल. केंद्र शासनाचा हा निर्णय ओबीसीच्या संवैधानिक अधिकारा विरुद्ध असून तो रद्द करावा आणि ओबीसी कॉलम टाकून जनगणना करावी अशी मागणी करीत ओबीसी विरहित जनगणने विरुद्ध ओबीसी वर्गाने रॅली काढून रणशिंग फुकले.
पाटी लावाच्या माध्यमातून जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजुऱ्यात 28 डिसेंबरला निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेवून स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या 3743 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करून भारतीय संविधानात कलम 340 घालून ओबीसी प्रवर्गातील जातींना आरक्षण लागू केले. परंतु प्रस्थापित राज्यकर्त्यांनी आपला बौद्धिक विवेक राजकीय पार्टीच्या सिद्धांताला गहाण ठेवून वागत असल्यामुळे 60 टक्के ओबीसींसाठी आरक्षण लागू करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाही. म्हणून ओबीसी प्रवर्गावर स्वातंत्र्यापासून अन्याय झाला आहे. दबाव गट बनवून शासनावर तसेच जनप्रतिनिधींवर दबाव टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे मत ओबीसी आंदोलनाचे प्रणेते बळीराज धोटे यांनी राजुरा येथे आयोजित ओबीसी जनगणना असहकार रॅलीतील सभेत केले.
तत्कालीन प्रधानमंत्री वि. पी. सिंग यांनी इंग्रज राजवटीच्या 1931 च्या जनगणनेच्या सर्वेत ओबीसी समाजाची संख्या निश्चित केली. या सर्वेला आधार मानून आरक्षण 1990 मध्ये विपरीत परिस्थितीत लागू केले. राममंदिर सारखे भावनिक मुद्दे समोर करून आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. वि. पी. सिंग नरमले नाही म्हणून पाठींबा काढून सरकार पाडले होते. त्यानंतर आलेल्या कोणत्याही सरकारने पाहिजे तशी अंमलबजावणी केली नाही. यामुळे ओबीसी समाज शैक्षणिक व नौकरी आरक्षणासह अन्य आरक्षणापासून वंचित राहिला आहे. आता पुन्हा ओबीसी आंदोलन उभे होत आहे हे पाहून एनआरसी सारखे मुद्दे समोर आणून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे. करीता बहुजन समाजाने या षड्यंत्रापासून सावध राहून आपले आंदोलन तेज करावे आणि जनगणनेवर बहिष्कार टाकावा असे आव्हान ओबीसी आंदोलनाचे प्रचारक श्रीकांत राऊत, नागभीड, हेमंत पिपरे, चामोर्शी यांनी केले. रॅली संविधान चौक ते नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक असा दीड किलोमीटर प्रवास करीत संविधान चौक पंचायत समिती समोर शांततेत व नारेबाजी करीत पोहचली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पटांगणात सभा घेण्यात आली.
सभेचे संचालन संभाजी साळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक डाखरे यांनी केले.
रॅली व सभा यशस्वी करण्यासाठी दिनेश पारखी, लक्ष्मण घुगुल, संतोष रामगिरवार, लक्ष्मण तुराणकर, मधुकर डांगे, विनोद बोबडे, दिलीप गिरसावळे, ए. डी. एकडे, दिलीप ठेंगणे, ब्रिजेश जंगीतवार, विजय मोरे, दिनेश उरकुडे, मधुकर मटाले, जगदीश मल्लेवार, बाबुराव मुसळे, दत्तात्रय मोरे, कुणाल तुराणकर, दिपक मडावी, मेघा धोटे, माया धोटे, कुंदाताई जेनेकर, जयश्री रोगे, चित्रलेखा धंदरे, वंदना पारखी, मनीषा कायडींगे, कांचन तुराणकर, श्रुती मोहितकर, विना साळवे, मंदा घुगुल, सिंधू बोबडे, शालिनी बोबडे, सचिन मोरे, श्रीकांत मोरे, उत्पल गोरे, सूर्यभान अडबाले, विवेक खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर, विश्वास साळवे, रवी भोयर, बंटी तालन, गुड्डू बुटले, बाबुराव झटाले, केशव बोढे, प्रणव बोबडे, साईनाथ पिंपळशेंडे, बंटी मालेकर, अमोल राऊत, जय खोब्रागडे, बापू धोटे, महेश बोरकुटे, जगदीश पिंगे, प्रतीक कावळे, अनिकेत पारखी, आशिष करमनकर, संतोष देरकर, सुरज भंबेरे, उमेश पारखी, रामकीसन पारखी, रामकिशोर सपाट, राजू बुरडकर, विनोद गुरनुले, मनोज बोबडे, स्वप्नील शेरकी, सुनील बोबडे, संजय गोरे, मनोहर कायडींगे, विश्वास साळवे,इर्शाद शेख, एम. के. रागीट, नामदेव मोरे, रवी डाहूले, दिलीप कनकुलवार, हर्षल साळवे, राहुल धानोरकर, विशाल शेंडे, आसिफ, केतन जुनघरे, शुभम ढवस, अनंता येरने, दिनकर डोहे, अविनाश जाधव, अरुण गावत्रे, शुभम मुने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्न केले.

अपसंपदेप्रकरणी कार्य.अभियंता राऊत यांच्यावर गुन्हा दाखल


गोंदिया,दि.३१ः- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता व अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता अशोक कचरुजी राऊत यांच्यासह पत्नी सौ.हंसलता राऊतवर(हल्लीमुक्काम चिचगड रोड देवरी) अपसंपदा धारण केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राऊत यांनी आपल्या नोकरी कार्यकाळातील १९९७ ते २०१७ या काळात पदाचा गैरवापर करुन ज्ञात उत्पन्नापेक्षा २७ लाख २० हजार ६७३ रुपयाची अपसंपदा धारण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर,अप्पर पोलीस अधिक्षक राजेस दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पो.हवा.राजेश शेंद्रे,नितिन रहागंडाले,राजेंद्र बिसेन,गिता खोब्रागडे,देवानंद मारबते यांच्या पथकाने केली.

Monday 30 December 2019

थंडीमुळे चौघांचा मृत्यू

लाखांदूर,दि.30ःगेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचे प्रमाण इतके वाढले की, एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी/संगम येथे शनिवारला (ता.२८) घडली.सुमित्रा जनार्धन दुपारे (७0), ताराबाई प्रितमसिंह पवार (६८) दोन्ही रा. सोनी, इंदीरा दिवाकर हुळे (६७) रा. सरांडी/बुज, तिमा बकाराम मेहंदळे (७0), रा.आसोला अशी मृतकांची नावे आहेत.
संपुर्ण झाडीपट्टीत सोनी या गावात प्रसिद्ध मंडईचे आयोजन केले जात असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सोनी या गावात मंडई भरत असते. दरम्यान, या मंडई निमित्ताने गावात पाहुण्यांची रेलचेल असते. मात्र पाहुणे म्हणूनच गेलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याने सोनी गावात शोककळा पसरली आहे. मृतकांमधील इंदिराबाई दिवाकर हुळे ह्या मुळच्या सरांडी/बुज येथील रहीवाशी असून, त्या एक वर्षापासुन मुलीकडे राहत होत्या. दुसरे मृतक तिमा बकाराम मेहंदळे मु.आसोला हे मंडईकरीता सासर गाव सोनी येथे आले होते. तर सुमित्रा जनार्धन दुपारे व ताराबाई प्रितमसिंह पवार वय (६८) दोन्ही मु.सोनी येथीलच रहीवाशी होते.
शनिवारी तापमान १0 अंशापर्यंत घसरले होते. त्यातच सकाळपासूनच शीतलहर सुरू होती. या कडाक्याच्या थंडीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

Sunday 29 December 2019

राज्यातील १८ हजार शिक्षकांवर उपासमारीची पाळी

साकोली, दि 29: जिल्हा परिषदेच्या १०० पटसंख्या असलेल्या शाळेतील अतिथी निदेशकांना सध्या घरी बसण्याची वेळ आलेली आहे. चालु शैक्षणिक सत्रात ६वी ते ८वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळा कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकाविनाच सुरू आहेत. राज्यातील १८ हजारांवर शिक्षकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. परिणामत: नवीन उमेदवारही कला, क्रीडा, कार्यानुभवचे कोर्स नको रे बाबा म्हणत आहेत.
 नियम २००९ नूसार १०० पटसंख्या असलेल्या उंचप्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशक नेमन्याचे आदेश दिले होते. राज्यात १०० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या दोन ते अडीच हजारापर्यंत उच्च प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांवर सन २०१५-१६ मध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव असे प्रत्येकी ३ याप्रमाणे साडे सहा ते सात हजार अतिथी निदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. या आधी सन २०११-१२ मध्ये सुध्दा १८ हजारापर्यंत अंशकाली निदेशकांची नियुक्ती इयत्ता ६वी ते ८वी पर्यंतच्या शाळांवर करण्यात आली होती. अतिथी निदेशकांची नेमनुक ५० रूपये तासीकेप्रमाणे करण्यात आली होती. त्यांना आठवड्यातून किमान ३ दिवस १२ तासीका दिल्या जात होत्या. त्यामुळे अनेक शाळांमधील मुलांना कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयाची गोडी निर्माण झाली होती. परंतु आरटीई २००९ नूसार अतिथी निदेशकांच्या भरतीने शाळेतील मुलांसाठी फायद्याचे झाले असले तरी, निदेशकांना वेळेवर मानधन मिळाले नाही. तसेच या अतिथी निदेशकांना दोन वर्ष करीता बंद करण्यात आले. कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना कायम न केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे. बरेच दिवस हे प्रकरण न्यायालयातही निदेशकांनी दाखल केले होते. परंतू या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक इयत्ता ६वी ते ८वी पर्यंतच्या शाळांवर एकही कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयाकरीता शिक्षक कार्यरत नाहीत. वारंवार पाठपूरावा करूनही अतिथी निदेशकांचा प्रश्न प्रलंबित राहत आहे. परिणामी नवीन उमेदवारही या विषयाचे कोर्स करण्याकडे काना-डोळा करीत आहेत.

पोलिस अधिक्षकाच्या परवानगीने गुन्हा दाखल


गोंदिया,दि.29 : तिरोडा येथील दुर्गावती अरविंद मिश्रा या महिलेचे कुटूंब वडिलोपार्जित मंदिर परिसरात राहत आहेत. मात्र, ट्रस्टच्या नावाखाली आरोपी फिर्यादी मिश्राच्या कुटूंबाला जमिनीवरील कब्जा हटविण्यासाठी सातत्याने तिची हेळसांड करीत आहेत. 
३१ जुलै रोजी नविन बांधकाम सुरू असताना तथाकथीत मंदिर ट्रस्टच्या सदस्याने त्या ठिकाणी येवून महिलेस शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली. या प्रकरणाची नोंद तिरोडा पोलिसांनी केली नव्हती. दरम्यान फिर्यादी महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे दाद मागितली असता पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये तिरोडा पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविस्तर असे की, फिर्यादी दुर्गावती मिश्रा हिचे कुटूंब वडिलोपार्जित तिलक वॉर्ड तिरोडा येथे मंदिर परिसरात राहत आहेत. फिर्यादी महिलेकडे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे जमिनीचे कागदपत्र देखील आहेत. मात्र, मंदिराच्या नावाने ट्रस्ट तयार करण्यात आले. या ट्रस्टमध्ये बाहेरचे व्यक्ती सदस्य झाले आहेत. ट्रस्टीकडून जमिनीचा ताबा सोडण्यासाठी सातत्याने फिर्यादी महिलेची हेळसांड केली जात आहे. त्यातच ३१ जुलै रोजी फिर्यादी महिलेच्या घराचे बांधकाम सुरू असताना आरोपींनी त्या ठिकाणी येवून बांधकाम करा आम्ही मंदिराचे ट्रस्टी आहोत, असे बोलून घराचे सामान व साहित्य फेकून नुकसान केले. एवढेच नव्हेतर फिर्रूादी महिलेला धक्काबुक्की केली होती. या घटनेनंतर फिर्यादी महिला तिरोडा पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली नव्हती. यामुळे फिर्यादीने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे धाव घेतली. पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये तसेच फिर्यादीच्या बयानावरून तिरोडा पोलिसात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. 

क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या










अर्जुनी मोरगाव,दि.29 : तालुक्यातील केशोरी येथे गारूडीचा खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या कुटूंबातील दारूड्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना आज (ता.२९) समोर आली.                           मंगला रूपचंद राऊत (३०) रा.झरपडा असे मृत महिलेचे नाव आहे.
 या प्रकरणात आरोपी रूपचंद राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील झरपडा येथील रूपचंद राऊत याच्या कुटूंबात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. गावोगावी मुक्कामी राहून त्या ठिकाणी गारूडीचे खेळ दाखवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असे. गेल्या आठ दिवसांपासून केशोरी येथे राऊत याचे कुटूंब मुक्कामी होते. काल (ता.२८) रात्री १२ वाजता सुमारास रूपचंद राऊत याने दारूच्या नशेत क्षुल्लक वादावरून पत्नी मंगला वर घाव घालून तिची हत्या केली. हत्येनंतर तो आपल्या मुक्कामी ठिकाणीच राहिला. सकाळी रक्ताच्या थारोड्यात आई मंगलाला पाहून मुलांनी आरडाओरड केली. आणि प्रकरण उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच केशोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंद राऊतला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



लाचखोर लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तुमसर,दि.29ः- भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनाचे बिल काढून देण्यासाठी ५00 रुपयांची लाच स्विकारताना येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.२७) दुपारी रंगेहाथ अटक केली.
अविनाश महादेवराव रिनके (५६) असे लाचखोर सहाय्यक लेखाधिकार्‍याचे नाव आहे. मोहाडी येथील एका व्यक्तीने तुमसर पंचायत समितीला आपले वाहन भाड्याने दिले होते. सदर तक्रारदार मालक आणि चालक आहे. या वाहनाचे मासिक बिल काढून देण्यासाठी अविनाश रेनके याने त्याला ५00 रुपयांची मागणी केली. याची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यावरून शुक्रवारी तुमसर येथे सापळा रचण्यात आला. ५00 रुपये स्विकारताना रिनकेला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने पंचायत समिती वतरुळात एकच खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, सहाय्यक फौजदार पडवार, संजय कुरंजेकर, रवींद्र गभने, सुनील हुकरे, कृणाल कडव यांनी केली. तुमसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे

Friday 27 December 2019

आता दर गुरुवारी भरणार सालेकसा येथे गुजरी बाजार

सालेकसा,दि.27ः-वाढती लोकसंख्या व व्यापार लक्षात घेत नवीन वर्षापासून नगरपंचायतीच्या हद्दीत आठवडी बाजार व्यतिरिक्त दर गुरुवारी गुजरी बाजार भरणार आहे.
सालेकसा येथील बाजार चौकात दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. परंतु, गावातील वाढती लोकसंख्या आणि व्यापार लक्षात घेऊन गावकर्‍यांच्या पुढाकाराने आणि शेतकर्‍यांच्या मदतीने आता आठवड्यात दर गुरुवारी गुजरी बाजार तहसील कार्यालयजवळील खुल्या मैदानात भरणार आहे. २ जानेवारी रोजी याचे औपचारिक उद््घाटन नगरपंचायतमार्फत केले जाणार आहे.
या गुजरीमुळे शेतकर्‍यांना त्यांचा शेतमाल सरळ ग्राहकांपयर्ंत विकता येईल. तर ग्राहकांना ताजी भाजी मिळणार आहे. परिसरातील शेतकर्‍यांना व छोट्या प्रमाणात भाजीपाल्याची शेती करणार्‍याना येत्या दोन तारखेपासून साप्ताहिक गुजरीच्या निमित्ताने आपले साहित्य ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर,दि.27ः- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक  शनिवार दि. ४ जानेवारी, २०२० रोजी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आरक्षीत प्रवर्गानुसार सर्वसाधारण महिलेची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे.
 अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून जाहिर करण्यात आला आहे. दिनांक ४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारणे, दुपारी १.०० वाजता सभेची सुरूवात, दुपारी १.०० वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी १.१५ ते १.३० वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे तर दुपारी १.३० वाजतानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेवून अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
Blogger

मुठभेड़ में महिला नक्सली ढेर

रायपूर(एंजसी).26 दिसबंर. छत्तीसगढ़ के नक्सल प्रभावित सुकमा जिले में सुरक्षा बलों ने मुठभेड़ में एक महिला नक्सली को मार गिराया है. सुकमा जिले के पुलिस अधिकारियों ने बताया कि जिले के चिंतागुफा थाना क्षेत्र के अंतर्गत सिंगनमड़गु गांव के करीब जंगल में सुरक्षा बलों ने मुठभेड़ में एक महिला नक्सली को मार गिराया है. सुरक्षा बलों को चिंतागुफा थाना क्षेत्र में नक्सली गतिविधि की जानकारी मिली थी.
जानकारी के बाद डीआरजी और सीआरपीएफ के कोबरा बटालियन के दल को गश्त के लिए रवाना किया गया था.जब डीआरजी का एक दल सिंगनमड़गु और केडवाल गांव के मध्य जंगल में था तब नक्सलियों ने सुरक्षा बलों पर गोलीबारी शुरू कर दी. इसके बाद सुरक्षा बलों ने भी जवाबी कार्रवाई की. कुछ देर तक दोनों ओर से गोलीबारी होने के बाद नक्सली वहां से फरार हो गए थे. बाद में सुरक्षा बलों ने घटनास्थल की तलाशी ली तब वहां एक महिला नक्सली का शव बरामद किया गया.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात, हा संघ आणि भाजपचा कट – प्रकाश आंबेडकर

मुंबईस,दि.26 – नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभरात विरोध आणि समर्थन सुरू आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे वतीने या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. सीएए आणि एनआरसी मुस्लिविरोधी असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
नागरिक्त कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील दादर टीटी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पक्षाचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीएए आणि एनआरसी मुस्लिविरोधी आहे. हा कायदा म्हणजे संघ आणि भाजपचा कट आहे. अशाप्रकारे भाजप अराजकता माजवत आहे, सुधारित नागरिकत्व कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. अनेक जणांकडे रहिवासी पुरावे नाहीत. अशावेळी डिटेंशन सेंटर उभारल्यास तोडून टाकू, दोन लाख जण मावतील इतके मोठे डिटेंशन सेंटर बांधले जात आहे, तिथे जायचे नसेल, तर मोदी सरकार पाडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.

Thursday 26 December 2019

स्त्रियांचे दुःख ओबीसी महिलांनी पहिल्यांदाच मांडले-प्रा.विजया मारोतकर

नागपूर,दि.26ः- अनादी काळापासून समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले.प्रत्येक जातीत स्त्रियांना शोषण, समस्या आणि दुखांचाच सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजातील स्त्रियांनीच महिलांचे हे दुःख सर्वप्रथम साहित्यातून व्यक्त केले. पण श्रेष्ठत्त्व आणि पुरुषी मानसिकतेच्या आधिपत्याखाली या साहित्याला प्रतिष्ठाच मिळाली नाही. आता हे साहित्य नव्याने समोर आणून ते लिहिणाèया महिला साहित्यिकांचा सन्मान व्हावा, असे कळकळीचे आवाहन प्रख्यात कवयित्री आणि लेखिका प्रा. विजया मारोतकर यांनी केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवनातील लोकमान्य टिळक सभागृहात दोन दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

जगातील सर्वच माणसांचे रक्त लाल आहे आणि रक्ताची तपासणी करून कुणाच्याही जाती, धर्माची विभागणी करता येत नाही. पण तरीही जातींच्या आधारावर होणारा भेदभाव आणि श्रेष्ठ-कनिष्ठता काही केल्या संपत नाही, ही शोकांतिका आहे. ओबीसी महिला साहित्यिकांनी अनेक शतके हा भेदभाव भोगला आहे. त्यामुळे त्यांनीच समाजातून ही जात हद्दपार करण्यासाठी मानवी मुल्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आता लेखन करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ओबीसी समाज मोठा असून आणि याच समाजाने आजपर्यंत नेतृत्त्व केले आहे. यानंतरचे भविष्य स्त्रियांचेच आहे. साहित्य निर्मितीची लेखनकळा तपासताना आपण अधिक सकस आणि गुणवत्तापूर्ण लेखनाचा विचार करायला हवा. त्यासाठी आत्मटिकाही करता आली पाहिजे आणि इतरांच्या लेखनाचे, विचारांचे कौतुकही करता आले पाहिजे. अशी संतुलित लेखणीच समाज जागृतीचे कार्य करू शकते, असे त्या म्हणाल्या.स्त्रियांना आता त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची प्रचिती आली आहे. ही जाणीव संपूर्ण समाजात प्रवाहित करण्याचे कार्य स्त्रियांच्या लेखणीतून होण्याची गरज आहे. पुरुषांचीही मानसिकता बदलविण्याचे सामथ्र्य स्त्रियांच्या विचारात आहे. कारण पुरुषाला घडविणारी एक स्त्रीच आहे. एकूणच या दृष्टीने लिखाण करताना संपूर्ण समाजच सकारात्मकतेने भारून टाकण्याचे सामथ्र्य ओबीसी समाजातील स्त्रियांचे आहे. हे सामथ्र्य अधिक ताकदीने आता समोर येईल,असा विश्वास यावेळी मारोतकर यांनी व्यक्त केला.

Wednesday 25 December 2019

जैन कलार समाजाचे स्नेहसंमेलन येत्या १९ जानेवारीला

गोंदिया,दि.25 -  गोंदिया जिल्हा जैन कलार समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या नववर्षातील 19 जानेवारी रोजी स्थानिक पिंडकेपार रोड स्थित समाजभवनात आयोजित केले जाणार आहे.
स्थानिक पिंडकेपार रोडस्थित जैन कलार समाज भवनात समाज कार्यकारिणीची सभा आज बुधवारी (दि.25) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी समाज कार्यकारिणीचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते.
 या सभेत समाजाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.  या वर्षीचा महिला मेळावा व स्नेहसंमेलन १९ जानेवारी ला करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच त्यामध्ये १८ जानेवारी ला दुपारी दीड वाजता  महिला व युवती करीता मेंहदी स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. तर १९ जानेवारी ला महिला मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेह संमेलन घेण्यासंदर्भात निश्चित झाले. त्याच दिवशी भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांसाठी इच्छिकांनी आपापली नावे समाज कार्यकारिणीच्या सदस्यांकडे पाठविण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याशिवाय मार्च 2019 च्या 10 वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांच्या गुणपत्रिकेसह कार्यकारिणीकडे पाठविण्यासंबंधी आयोजकांनी सूचना केल्या आहेत

बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी कुटुंबियांसमोर रचले स्वतःच्या अपहरणाचे खोटे नाट्य

नागपूर(वृत्तसंस्था)दि.25 – नागपूरमध्ये एका तरुणीच्या अपहरण प्रकरणाला बुधवारी नाटकीय वळण लागले. गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी संध्याकाळी 8 वाजता पालकांनी आपल्या तरुण मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये 4 जणांनी मुलीचे अपहरण केले असे सांगण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच तपास सुरू केला आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, बुधवारी सत्य समोर आले तेव्हा कुटुंबियांसह पोलिस सुद्धा धक्काच बसला.
 गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी तिचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी आले होते. त्यांनी आरोप केला की त्यांच्या मुलीचे 4 जणांनी अपहरण केले होते. कॉलेजला जात असताना त्यांच्या मुलीचा मार्ग अडवण्यात आला आणि तिला उचलून नेण्यात आले असे तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले होते. यानंतर तिने कशी-बशी त्या चौघांच्या तावडीतून सुटका केली असा दावा पालकांनी केला होता.
पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर संबंधित तरुणीला घटनास्थळी नेऊन तपास केला. यावेली नागपूर क्राइम ब्रांचची टीम सुद्धा उपस्थित होती. परंतु, घटनास्थळी नेल्यानंतर आणि त्या ठिकाणी नेण्यापूर्वी तरुणीने दिलेल्या जबाबांमध्ये कमालीचे अंतर दिसून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. बीए सेकंड इयरला शिकणारी ही तरुणी कॉलेजमधून निघाल्यानंतर नेमके काय घडले याची सुद्धा कॉलेजच्या सीसीटीव्हीत पाहणी करण्यात आली. त्यामध्येच तरुणीला 4 जण नव्हे, तर ती स्वतःच एका तरुणासोबत जाताना दिसून आली. पोलिसांनी हेच पुरावे त्या विद्यार्थिनीला दाखवून पुन्हा चौकशी केली. तेव्हा तिने अपहरणाचे खोटे नाट्य रचल्याची कबुली दिली. कॉलेज संपताच आपण बॉयफ्रेंडसोबत वाकी येथे फिरायला गेलो होतो अशी कबुली तिने पोलिसांसमोर दिली. यानंतर तिच्या प्रियकराने तिला घरापर्यंत ड्रॉप केले. हे सुद्धा व्हिडिओमध्ये दिसून आले. आपल्या प्रियकरासोबत बाहेर गेल्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यास ते रागावतील या भितीने संपूर्ण नाट्य रचले. स्वतः सुटून आल्यानंतर कुटुंबिय पोलिसांकडे जातील याची तिने कल्पनाच केली नव्हती. यानंतरच तिचे नाटक उघडे पडले. दरम्यान, पोलिसांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तसेच तरुणीला ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.

देवरीत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

देवरी,दि. 25 - स्थानिक पायोनिअर पब्लिक स्कूल येथे शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.19) करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उग्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार ह्या होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे, येटरे, गटसमन्वयक धनवंत कावळे, नीना जायस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
 या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मोटघरे हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य महेंद्र मेश्राम, श्री. साकुरे, येटरे. सेवानिवृत्त शिक्षक हंसराज तागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात एकून ४८ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक सहभागी झाले होते. 
  कार्यक्रमाचे संचलन श्री गजभिये यांनी केले.  उपस्थितांचे  आभार विजय लोथे यांनी मानले.

घरफोडी चोरी रोखण्यासाठी पोलीस करणार ग्रामरक्षक दलाची स्थापना

अर्जुनी मोरगाव,दि.25ः- तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायतीमध्ये संगणक साहित्य चोरी तसेच घरफोडी व मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने यावर आळा घालण्यासाठी ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दृष्टीने ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला असून पोलीस पाटलाची सभा घेऊन तशा सूचना सुद्धा देण्यात आले आहेत.
ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात गस्त घालावी गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष देऊन चोरी होणार नाहीत. तसेच गावात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहील याची दक्षता घेणे अशी जबाबदारी सोपवली जाणार आहे. या ग्रामरक्षक सदस्यांना पोलीस विभागातर्फे ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात या दलाचे मूल्यमापन करून उत्तम कामगिरी करणाऱ्या दलाला प्रशस्तीपत्र व बक्षीस दिले जाणार असल्याचे अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी सांगितले

साप्ताहिक बेरारटाईम्स अंक 03ः 25 ते 31 डिसेंबर 2019








Tuesday 24 December 2019

देवरीच्या गटविकास अधिकारीपदी चंद्रमणी मोडक रूजू


देवरी,दि.24- देवरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी आज मंगळवारी (दि.24) नागपूर जिल्ह्यातील कुही पंचायत समिती येथून स्थानांकरण होऊन आलेले चंद्रमणी मोडक रूजू झाले आहेत.


देवरी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांचे नागपूर जिल्ह्यातील कुही पंचायत समिती येथे गेल्या ऑक्टोबर महिन्यात स्थानांतरण झाले होते. यामुळे रिक्त पदाचा अतिरिक्त कारभार सहायक गटविकास अधिकारी एन.एस. वाघाये यांचेकडे होता. आज मंगळवारी कुही पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले चंद्रमणी लक्ष्मण मोडक यांचे स्थानांतरण देवरीच्या गटविकास अधिकारी पदी करण्यात आले. श्री. मोडक यांनी आज आपल्या पदाची सूत्रे हातात घेतली.

धानाचे पुंजणे जळालेल्या शेतकर्‍यांना जि.प. विभागाकडून २0 हजारांची आर्थिक मदत

चिचगड(सुभाष सोनवणे),दि.२४ः-देवरी तालुक्यातील चिचगड व ककोडी क्षेत्रात ५६ शेतकèयांचे अज्ञात व्यक्तिकडुन जाळण्यात आलेल्या धानाला शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी ही मागणी जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ इमीद यांचेकडून करण्यात आली होती.
 शेवटी जि.प.गोंदियाच्यावतीने २२ डिसेंबरला शेतकèयाना प्रत्येकी २० हजार रूपयाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. देवरी मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे,जि.प. अध्यक्ष सिमाताई मडावी व उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांचे हस्ते धनादेशाचे वाटप शेतकèयांना करण्यात आले.चिचगड जि.प.क्षेत्राचे सदस्य व जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांच्या क्षेत्रात व ककोडी भागात नोव्हेंबर महिन्यात अज्ञात व्यक्तिकडुन शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जाळण्यात आले होते. या जळलेल्या धानाला शासनाकडुन कोणत्याच प्रकारची आर्थिक मदतीची तरतुद नव्हती परंतु जि.प.कृषी विभागाकडुन शेतकèयांना आर्थिक मदत मिळवुन देण्याची ग्वाही जि.प.चे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी दिली होती.अल्ताफ हमीद यांनी जि.प. च्या स्थायी समितीत हा मुद्दा प्रखरतेने उचलला व वित्त विभागाकडे पाठपुरावा केला.या अनुषंगाने प्रत्यकी २० हजार रूपये मोबदला देण्याचे ठरविले. शेतकèयांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम रविवारला चिचगड येथे पार पडला.यावेळी क्षेत्राच्या आमदारांनी कार्यकत्र्याकडून वर्गणी गोळा कडुन शेतकèयांना प्रत्येकी ५ हजाराची मदत करण्यात आली.

वंचळा गावळ यांचे निधन

चिचगड,दि.24- चिचगड येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते श्रीराम गावळ यांच्या धर्मपत्नी वंचळा गावळ यांचा काल सोमवारी (दि,23) वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यसमयी त्या 62 वर्षाच्या होत्या.
स्व. वंचळा या मृदुभाषी होत्या. त्यांच्या निधनाने चिचगड परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती , 3 मुली आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर आज दुपारी स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Friday 20 December 2019

गोंदियात साकारतेय बाबासाहेबांवर चित्रपट; २१ डिसेंबर पासून होणार चित्रीकरण




गोंदिया,दि. 20 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित, त्यांनी केलेला संघर्ष, समाजाला दाखविलेली दिशा आणि हिंदू कोडबील ते चवदार तळे, अशी संपूर्ण कारकिर्द याची माहिती देणारा हिंदी चित्रपट गोंदियात साकारत आहे.
त्याकरिता भीमयूग फिल्म आणि आंबेडकरी अनुयायी फिल्म निर्माण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चित्रपटात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील २२ विविध ठिकाणांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. अप्रतिम गाणे, कॅमेरा आणि उत्कृष्ट अशा ध्वनीचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईचे प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर दा यांच्या नेतृत्वात हा चित्रपट तयार होणार आहे.ओरीसा येथील संध्या सिंह या रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते म्हणून संतोष लिल्हारे, वीरेंद्र गजभिये हे जबाबदारी सांभाळणार आहेत. हा चित्रपट इतिहास घडविणार असल्याचा आशावाद दिग्दर्शक कबीर दा आणि सुनील भालेराव यांनी व्यक्त केला. चित्रपटात उदित नारायण यांच्या आवाजात गाणे असणार असून येत्या २१ डिसेंबर रोजी भिमनगर येथील मैदानात चित्रपटाची निर्मिती सुरू होणार आहे. १० एप्रिल रोजी संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावेळी कमलेश उके, प्रथम उके, संध्या सिंग, नितीन गजभिये, सुनील भालेराव, संतोष लिल्हारे, डॉ. पाटील, रियाज सय्यद, महेंद्र चौरे, धीरज मेश्राम, निलेश देशभ्रतार, सपना देशभ्रतार, सविता उके, समता गणवीर आदी उपस्थित होते. 

गोंदिया जिल्ह्यात डिजीटल शाळांचा बट्ट्याबोळ



राबविली योजना नावापुरतीच
देवरी: २० - युती शासनाच्या काळात राज्यात मोठा गाजावाजा करून डिजीटल शाळा योजना राबविण्यात आली होती. मात्र, ही योजना आता फॉर्स ठरली असून केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच अनेक अधिकाऱ्यांनी ही योजना केवळ पारितोषिकासाठीच मोठी केली असल्याचे वास्तव आता समोर येत आहे. गोंदिया जिल्ह्यात तर डिजीटल झालेल्या जवळपास पूर्णच शाळेतील डिजीटल वर्ग आता धूळ खात पडले आहेत.
आजच्या  तंत्रज्ञानाच्या युगात खेड्यापाड्यात सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना आणि उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून राज्यातील संपूर्ण शाळा या डिजीटल करण्याचे फर्मान तत्कालीन राज्य सरकारने सोडले होते. याच संधीचा फायदा उचलण्यासाठी काही हौसी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजीटल झाल्याचे जाहिर करून टाकले होते. परिणामी, 2 मे 2017 रोजी  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भायंदर ठाणे येथे आयोजित डिजिटल शाळा पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून गोंदिया जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला होता. यासाठी गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचा महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल महामहिम सी.विद्यासागर राव, शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता
 डिजिटल इंडियाच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक गाव आणि गावातील ग्रामपंचायत, शाळामध्ये तंत्रज्ञानाचे धडे देणे गरजेचे आहे. परंतु, डिजिटल शाळा झालेल्या गोंदिया जिल्हातील चित्र काही वेगळेच आहे. मोठा गाजावाजा करीत  १००%  डिजिटल शाळा करून आकडेवारीच्या खेळात निष्णात असलेला शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या नावावर फक्त श्रेय लाटण्यापुरतेच सक्रिय असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून  येत आहे.  देवरी तालुका हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु, शोकांतिका अशी आहे कि १००% डिजिटल झालेल्या शाळेमध्ये आजही पुरवठा सुद्धा खंडित आहे .
 परिणामी,ग्रामीण भागातील विद्यार्थी या डिजिटल संकल्पनेला पूर्णतः मुकला आहे. अनेक शाळेतील डिडीटल यंत्रणा सुद्धा धूळखात कचऱ्यात पडली असल्याचे सांगण्यात येते. जि.प. शाळेतील विद्यार्थी तर सोडा किती अध्यापक वर्ग माहिती तंत्रज्ञानात जागरूक झाला आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यात भरीसभर म्हणून अधिकाऱ्यांची या तालुक्याप्रती असलेल्या उदासिनतेने यात आणखी भर टाकली आहे.




देवरी पंचायत समितीमध्ये अद्यापही 6 पदे रिक्त


 गशिअचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर
देवरी,दि.20 - प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडून सक्ती करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. आधीच कर्मचाऱ्यांचा वानवा असताना आणखी कर्मचारी संख्या कमी करण्यात आली, तर देवरी सारख्या दुर्गम आणि मागास तालुक्याचा विकास कसा करणार?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी शासन-प्रशासनाला केला आहे. उल्लेखनीय म्हणजे येथील गटशिक्षणाधिकारी यांचा कार्यभार प्रभारीच्या खांद्यावर देऊन शिक्षणाचा गाडा हाकला जात आहे, हे महत्त्वाचे.
सविस्तर असे की, देवरी तालुका हा आदिवासी बहुल,नक्षलग्रस्त आणि मागास अशी ओळख असलेला तालुका आहे. या तालुक्याचा विकास स्थानिक संस्थांकडून अपेक्षित आहे. यासाठी तालुकास्तरावर असलेल्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये 46 कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. सन 2019च्या प्रशासकीय आणि विनंती बदलीपूर्वी केवळ37 कर्मचाऱ्यांच्या भरवशावर येथील कामकाज सुरू होते. मात्र, मे 2019च्या बदली प्रकरणानंतर या पंचायत समितीतून एकूण 5 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. याउलट, येथे केवळ 4 कर्मचारी बदलीने पाठविण्यात आले. यापैकी एक कर्मचारी अद्याप येथे रुजू होणे बाकी आहे. देवरी येथून स्थानांतरीत झालेल्या 5कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याला मुक्त करण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांना कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यमुक्त करण्यात आले नाही. असे असताना जिप प्रशासनाने पंसला संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची ताकीद गेल्या ऑगस्ट महिन्यात दिल्याची माहिती आहे. जर या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले तर येथे पुन्हा 6 कर्मचाऱ्यांचे पद रिक्त राहतील. याचा परिणाम, तालुक्याच्या विकासावर पडणार, हे विसरून चालणार नाही. तरी या मागास तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी या कार्यालयातील रिक्तपदे भरण्याची मागणी पुढे आली आहे.

Tuesday 17 December 2019

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १८ डिसेंबरला गडचिरोली दौऱ्यावर

गडचिरोली,दि.१७: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवारी १८ डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी सकाळी १०.१५ वाजता श्री.कोश्यारी यांच्या हस्ते अहेरी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत्‍ महिला बचत गटांद्वारे संचालित उडाण सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित सोलर प्लेट व बल्ब निर्मितीच्या उद्योगाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते अहेरी येथील एकलव्य निवासी विद्यालयाला भेट देतील. त्यानंतर श्री.कोश्यारी हे गडचिरोलीला येणार असून, दुपारी १ वाजता येथील महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. शिवाय नियोजन भवनात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करुन नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.
अहेरी येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ.रामदास आंबटकर, प्रा.अनिल सोले, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, पंचायत समिती सभापती सुरेखा अलाम, विशेष अतिथी म्हणून राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त संजीवकुमार, राज्यपालांचे उपसचिव रणजितकुमार, जीवनोन्नती अभियानाच्या सीईओ श्रीमती आर.विमला, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रधान संचालक राहुल गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
असा आहे राज्यपालांचा दौरा
बुधवारी १८ डिसेंबरला सकाळी ९.१० वाजता राज्यपाल कोश्यारी हे नागपुरातून हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात पोहचल्यानंतर १०.१५ वाजता ‘उडाण’ प्रकल्पाला भेट देऊन तेथील महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते एकलव्य निवासी विद्यालयाला भेट देतील. १२.१० वाजता राज्यपाल कोश्यारी हे अहेरी येथून निघून दुपारी १२.४५ वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पोहचतील. दुपारी १ ते १.२० या कालावधीत राज्यपाल हे गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर पाऊण तास सर्किट हाऊस येथे थांबतील व २.२० ते ३.१० या कालावधीत ते नियोजन भवन येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करुन नागरिकांशीही संवाद साधतील.

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख


नवी दिल्ली, 17 :  केंद्र सनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे  नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे त्यांचा पदभार स्वीकारतील.श्री. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे. या पदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील. यापूर्वी जनरल अरूण कुमार वैद्य या मराठी अधिकाऱ्याला 1983 ते 1986 या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखपदाचा बहुमान मिळाला आहे.


केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार श्री. नरवणे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. मूळ पुण्याचे असलेले श्री. नरवणे सध्या भारतीय लष्कराचे  उपप्रमुख असून विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्याने    लष्करप्रमुख म्हणून त्यांना बढती देण्यात येत आहे.
लेजनरल मनोज नरवणे यांच्याविषयी
ले.जनरल नरवणे यांनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी  ते सैन्याच्या पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी सांभाळत होते. भारताच्या चीनशी संलग्न सुमारे 4,000 कि.मी. लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी नरवणे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.श्री. नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. ले.जनरल नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून 1980 मध्ये ते ‘7 सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पुर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. श्री. नरवणे यांनी सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पूर्ण पाडत आपले कौशल्य, वेगळेपण त्यांनी सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.

आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील

नागपूर दि. 17 :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6 हजार 600 कोटी रुपयांपैकी 2 हजार 100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 7 हजार 400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7 हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

जुगार व दारुअड्ड्यावर पोलिसांची धाड मुद्देमालासह आरोपींना अटक




गोंदिया,दि.16 : जिल्ह्यात अवैध धंदे, गुन्हे प्रतिबंधक कारवाईच्या माध्यमातून वचक घालता यावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यरत पथकाने आठवड्याभर्‍यात मोठी कारवाई करून जुगार व दारूच्या अड्ड्यावर धाडी मारून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. या कारवाईने अवैध धंदे करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणानले आहेत.
सविस्तर असे की, ९ डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग वर असतांना तुमसर येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच विजय प्रल्हाद साखरे यांच्याघरी धाड टाकून ३ हजार ८५० रुपयांची दारू तर रजत राजू साखरे याच्या घरून ५ हजार २५० रुपयाची देशी दारू हस्तगत केली. १० डिसेंबर रोजी तिरोडा पोलिस ठाणे हद्दीत डाकराम सुकडी येथे फुलचंद जगलू शेंडे याच्या शेतात हातभट्टी दारूवर धाड मारून ११ हजार रुपयांचा मुद्देमाल तर ११ व १२ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाणे हद्दीत क्षत्रिय मराठा भवन गोंदिया येथे सट्टापट्टी खेडविणार्‍या खुर्शिद याशीन सैय्यद (५२) रा. गौतमनगर याच्याकडून सट्टापट्टी व साहित्य असा एकूण ३ हजार ३२० रुपये, ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत आसोली येथे केवलदास ढेकल कांबळे याच्याकडून सट्टापट्टी व साहित्य असा एकूण २ हजार १६० रुपये, रामनगर पोलिस ठाणे हद्दीत फिरोज सरवर खान (४०) रा. शास्त्रीवार्ड याच्याकडून सट्टापट्टी व साहित्य असा एकूण १५७३ रुपये या शिवाय आमगाव पोलिस ठाणे हद्दीत आसोली येथे सुरेंद्र ईश्वरदास चंद्रिकापुरे (४५) रा. सरकारटोला याच्याकडून सट्टापट्टी व साहित्य असा एकूण २ हजार ७०५ रुपये तर गंगाझरी पोलिस ठाणे हद्दीत ईश्वर माणिकराम फरकुंडे (३१) रा. भीमनगर याच्याकडून सट्टापट्टी व साहित्य असा एकूण १० हजार ७३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या शिवाय दवनीवाडा पोलिस ठाणे हद्दीत बघोली येथे दिलीप मनिराम अंबुले याच्या घरून देशी-विदेशी दारू असा एकूण १० हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. तर १४ डिसेंबर रोजी आमगाव पोलिस ठाणे हद्दीत टेकळी शिवारातील ढाब्यावर लखन संपत सहारे (३०) रा. मोहगाव यांच्याकडून ५ हजार ४० रुपयाची देशी दारू हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रदीप अतुलकर, सपोनि. रमेश गर्जे, पोउपनि. मेश्राम, सफौ. कापगते, करपे, रहांगडाले, बैस, राऊत, पो.हवा. कृपाण, जगनाडे, फुलबांधे, गुरनुले, शेंडे, हातझाडे, गौतम यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

शेतकèयांवर पुन्हा अस्मानी संकट




गोंदिया,दि.17ः हवामान खात्याने पावसाचा कोणताही अंदाज वर्तविलेला नसतानाही रविवार, १५ डिसेंबर रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत एकूण १३०.१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने शेतात कापणी करून ठेवलेल्या व हमीभाव केंद्रावरील उघड्यावरील धानाला मोठा फटका बसणार असल्याने शेतकèयांसमोरील चिंता वाढल्या आहेत.
यंदा जिल्ह्यातील शेतकèयांना अस्मानी व सुलतानी दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. खरिपाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकèयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असताना प्रशासन सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत गुंतले होते, तर लोकप्रतिनिधी जाहीर सभांमध्ये आश्वासने देण्यात व्यस्त होते. अशातच दिवाळीसारख्या सण तोंडावर आला. मात्र शेतकèयांच्या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी शेतकèयांना नाईलाजास्तव दिवाळी सण साजरा करण्यासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यापाèयांना कमी भावात धान विकावे लागले.निवडणुका संपताच शासन व प्रशासन समस्यांकडे लक्ष देईल,अशी आशा ठेवत शेतकèयांनी शेतात शिल्लक असलेल्या धानाच्या कापणी व मळणीला सुरुवात केली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने धानपिकाला पुन्हा फटका बसला.आता धान विकण्यासाठी हमीभाव केंद्रांवर नेण्यास तयार असताना व नेलेला असताना गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व १५ डिसेंबर रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात एकूण १३०.१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, गोंदिया तालुक्यात १४.४० मिमी, गोरेगाव ३२.४०, तिरोडा २५.२०, अर्जुनी मोर १०.००, देवरी ५.४०, सालेकसा ९.६० व सडक अर्जुनी तालुक्यात ४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेल्या व हमीभाव केंद्रांवर विक्रीसाठी ठेवलेल्या धानाची पाखड होण्याची शक्यता जास्त आहे. पाखड झालेले धान संबंधित यंत्रणेकडून विकतही घेतले जात नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन घेतलेल्या खरिपाच्या पिकातून किती पैसा हाती पडेल, ही चिंता शेतकèयांना लागली आह
तुमसर-सिहोरा- बपेरा परिसरात रविवारी (दि.१५) सायंकाळी वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील पिकांसह उघड्यावर ठेवण्यात आलेल्या सहकारी राईस मिल तथा धान केंद्रावरील धानाचे नुकसान झाले. बहुतांश शेतकरी पावसाच्या घाईने मळणी करताना अर्धवट राहिलेल्या गंज्यांना उघड्यावर असल्याचे चित्रपहावयास मिळत आहे.
परिसरात धान बांधणी व मळणीचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सिंचनाची सोय असलेल्या रबी पिकांची पेरणी सुरू आहे. रविवारी संध्याकाळी व सोमवारी सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह गारांनी शेतातील तूर, लाखोळी, जवस, पोपट तथा अन्य भाजपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. धान खरेदी केंद्रावर तथा सहकारी राईस मिलांवर उघड्यावरच असलेली धानाची पोती ओलीचिंब झाल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकरी पावसाच्या घाईने मळणी करताना अर्धवट राहीलेल्या गंज्यांना उघड्यावर ठेवल्याचे चित्र आहे.

तहसिलदाराचे निवासस्थान बांधकाम विभागाच्या ताब्यातच

सडक अर्जुनी,दि.17ः डिसेंबर शासकीय कामकाज जलद गतीने व्हावे, यासाठी अधिकारी,कर्मचाèयांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासकीय निवासस्थाने तयार केली जातात. परंतु, त्यांचे हस्तांतरण रखडत असल्याने त्या इमारती असामाजिक तत्त्वांचा अड्डा होत असल्याचा प्रकार येथील तहसीलदार निवासावरून समोर आला आहे.
येथील तहसील कार्यालय परिसरत जवळपास दोन वर्षांपूर्वी तहसीलदार निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले.मात्र दोन वर्षांच्या काळात येथे अधिकारी वा कर्मचारी राहायला आले नसल्याने, तसेच संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने आजघडीला ही निवासस्थान असामाजिक तत्त्वांचा अड्डा होत चालल्याचे दिसत आहे. निवासस्थान परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून खिडक्या व दरवाजांचे मोठे नुकसान झाले आहे. मद्यपींसाठी ही जागा खुला बार झाली असल्याने दारूच्या बाटल्यांचा खच येथे दिसून येतो.यासंदर्भात तहसीलदार उषा चौधरी यांना विचारणा केली त्यांनी सांगितले की, बांधकाम विभागाने अद्यापही तहसील कार्यालयालाइमारतीचे हस्तांतरण केलेले नाही, तरबांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश लांजेवार यांना विचारणा केली असता त्यांनी, बांधकाम पूर्ण झाले असले तरी विद्युतीकरण झाले नसल्याने सदर निवासस्थानाचे हस्तांतरण रखडले असल्याचे सांगितले. यावरून शासनाच्या निधीचा शासनाच्याच यंत्रणेद्वारे कसा अपव्यय केला जातो,हे निदर्शनास येत आहे.

Sunday 15 December 2019

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नागपूर(विशेष प्रतिनिधी)दि.15- समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नावाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात उद्यापासून सुरू होत आहे. पुढील आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज नागपुरात आगमन झाले.उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना स्थगिती देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथून प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र किती प्रकल्पांना स्थगिती दिली ते तर सांगा. मुंबईतील आरे मेट्रो कारशेड वगळता कुठल्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी हे सरकार पुढील 50 वर्षे टिकेल असा विश्वास बोलून दाखवला. राज्यतील सर्वसामाऩ्य जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला प्रशासनाच्या कामाचा अनुभव नसला तरी माझ्यात आत्मविश्वास आहे. राज्यतील सर्व जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला ‘चहापान’ प्रथा आहे, ‘बहिष्कार चहापान’ ही नवी प्रथा होते आहे. चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातील नेत्यांनी तरी चहापानावर बहिष्कार घालायला नको होता. आपले पंतप्रधान चहावाले होते, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते, विशेष म्हणजे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही आमची भूमिका स्पष्ट आहे.  सावरकरांच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण गोंधळ उडवा, तणावाखाली ठेवा, देशभरात परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
  • शिवस्मारक घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करू.
  • सावरकरांचा मुद्दा उचलून लक्ष विचलीत केले जात आहे.
  • देशात अशांतता का पसरली आहे, त्याकडे आधी पाहा.
  • कोणत्याही विकास कामाना स्थगिती नाही.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणारच, पण नेहमीसाठी चिंतामुक्तही करणार.
  • तिजोरीच्या चाव्या आता माझ्या हाती.
  • राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सत्यचित्र राज्यासमोर आणणार.

देवरी येथे रोगनिदान शिबीराचे आयोजन यशस्वी


देवरी,दि.15- स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गोंदियाच्या हिलींग हॅण्ड्स क्रिटीकल केअर रूग्णालयाच्या वतीने एक दिवसीय रोगनिदान शिबीराचे यशस्वी आयोजन आज रविवारी (दि.15) करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये परिसरातील दमा, हृदयरोग, संधीवात, लकवा रक्तशर्करा, थायराईड या रोगाच्या रुग्णाचे निदान आणि उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांना मोफत औषधींचे वाटप सुद्धा करण्यात आले. या शिबीराचे आयोजन देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते युगेश छोटेलाल बिसेन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या शिबीरामध्ये  डॉ. विनोद मोहबे यांनी रुग्णाची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुनील पारधी, दिलीप दखने, मनोज बघेले, मुकूल बघेले आदींनी सहकार्य केले.

Friday 13 December 2019

कोंढाळा घटनेतील आरोपीला कठोर शिक्षेसाठी गडचिरोलीत निघाली निषेध रॅली

गडचिरोली,दि.12ःनर्सेस संघटनेच्या नेतृत्वात व इतर सामाजीक संघटनांच्या सहकार्याने कोंढाळा येथील परिचारीकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधीकारी कार्यालय अशा निषेध रॅलीचे आयोजन करुन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फेत पाठविण्यात आले.
या निषेध मोर्च्यात महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटनेचे पदाधीकारी, जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोलीचे सचिव रमेश जेंगठे, हरिदास कोटरंगे, सुखदेव जेंगटे, संतोष मोहुर्ले, नरेश महाडोरे, माळी महिला संघटना गडचिरोली तालुकाचे अध्यक्षा सुधा चौधरी, सचिव अल्का गुरनुले, सदस्य मिना जेंगठे, संजीवनी कोटरंगे, ज्योती जेंगटे, वंदना मोहुर्ले, प्रभा सोनुले, मंगला मांदाडे, मनिषा निकोडे, अंधश्रध्दा निर्मुलन समिती गडचिरोलीचे उध्दव डांगे, विलास निंबोरकर, आधार विश्व फाऊंडेशनच्या सौ. साळवे यांच्यासह अनेक सामाजिक संघटेनेचे पदाधीकारी,नर्सेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिकित्सा न केल्यानेच बहुजन समाज बौद्धिक गुलामगिरीत-डॉ.आ.ह.साळुंखे

गोंदिया,दि.12ः धार्मिक ग्रंथ व ऋषीमुनींनी सांगिलेल्या बाबी ह्याच अंतिम सत्य, असे आपण मानत राहिलो. कारण येथे माणसाला चिकित्सा करण्याचा अधिकार नव्हता. म्हणूनच आपल्या पूर्वजांना अज्ञान व गरिबीच्या गर्तेत शेकडो वर्षे घालवावी लागली. जोपर्यंत धर्म व परंपरेची चिकित्सा होणार नाही; तोपर्यंत बौद्धिक गुलामगिरीच्या तुरुंगातून बहुजन समाजाची सुटका होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यीक डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले.येथील संथागारात बोलण्याची संधी मिळणे हे माझ्या आयुष्यातील अच्युत्त आनंदाचे क्षण आहे.येथील ग्रंथालयाला धम्मपालाचे दिलेले नाव हे सुध्दा महत्वाचे असून जगभर विचार पोचविण्यासाठी धम्मपालांने केलेल्या कार्याचा उल्लेख करीत त्यांच्या नावाने असलेले ग्रंथालयात थांबण्याचा आनंदही वेगळाच असल्याची भावना व्यक्त केली.
येथील संथागार सभागृहात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज गुरुवारला(दि.12) ‘विवेक जागर’ या कार्यक्रमांतर्गत डॉ.आ.ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रभाकर गजभिये, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अर्जुन जाधव, संजय शेंडे,विमा राहुलकर,ओबीसी संघर्ष कृती समिती महिलाध्यक्ष पुष्पा खोटेले,सविंधान मैत्री संघाच्या प्रमिला सिंद्रामे,सयोंजक उमेश उदापूरे उपस्थित होते.यावेळी संथागार,ओबीसी संघर्ष कृती समिती,सविंधान मैत्रीसंघासह अनेक सामाजिक संघटनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.आ.ह.साळुंखे पुढे म्हणाले की,राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवण्याचे काम सध्या सुरू आहे.त्यालाही उत्तर देण्यासाठी दुसरीकडे आपलीही मुले प्रबोधनातून तयार होत आहेत.प्रत्येकाचे वेगळेपण असून निसर्गाने मानवाला दुहेरी भूमिका दिली आहे.७०० कोटी लोक जगात असून त्यापैकी कुणासोबतही आपल्या हाताते ठसे जुळत नाही, तेवढे वेगळेपण दिले आहे.माणूस हा एकटा जगू शकत नाही, एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय जगूही शकत नाही.झुंडीला विवेक नसतो उदिष्ठ नसतो अशा परिस्थितीत आपण विवेक नसलेल्या भावी पिढीच्या हातात समाज दिला तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.एकमेकात ऐक्य नसल्याने विदेशी आक्रमणात आपला समाज पराभूत झाला हा इतिहास आहे.त्यामुळे एैक्य टिकवून ठेवण्यासाठी सविंधान महत्वपुर्ण आहे.परंतु सध्या सविंधानाचेच रक्षण करण्याची वेळ आली असून जोपर्यंत आपण सविंधानाचे रक्षण करणार नाही.तोपर्यंत स्वातंत्र्य जपण्यासाठी आपल्याला किमंत मोजावी लागणार असल्याचे म्हणाले.
गौतम बुद्धाने व्यक्ती म्हणून स्वत:ला अलिप्त केले होते. त्यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामी’ असे सांगितले. म्हणजे ‘मी ज्ञानी माणसाला शरण जातो’ असा त्याचा अर्थ होतो. महात्मा बसवेश्वरांनीही ‘हा आमचा हा आमचा’ असा बंधुत्वाचा संदेश दिला. केवळ ज्ञान आणि एखाद्या विचाराच्या मुळाशी जाण्याच्या लालसेनेच चीनमधील बौद्ध भिक्खू हयूएन त्संग याने हाल अपेष्टा सहन करीत, लांब प्रवास करीत भारताचा दौरा केला. जोपर्यंत आपण ज्ञानावरची निष्ठा जपणार नाही;तोपर्यंत पर्यायी संस्कृती उभी करता येणार नाही, असे डॉ.साळुंखे म्हणाले.
३-४ हजार वर्षे बहुजनांना कसलाही अधिकार नव्हता. त्यामुळे आमच्या पूर्वजांना अंधकारमय आयुष्य  जगावं लागले. आता यातून डोकं मुक्त करण्याची वेळ आली आहे. धर्म, परंपरेची चिकित्सा केल्याशिवाय बहुजनांची बौद्धिक तुरुंगातून मुक्तता होणार नाही. चिकित्सा केल्यामुळेच युरोपची प्रगती झाली. अरिस्टॉटलचा सिद्धांत गॅलिलिओने खोडून काढला, धर्मग्रंथांनी सांगितलेला सिद्धांत कोपरनिकसने खोटा ठरवीत पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे सांगिते आणि कोपरनिकसच्या पुढे जाऊन ‘पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते’ असं केपलरने सांगितले, असे डॉ.साळुंखे यांनी स्पष्ट केले. चार्वाकाने माणूस हा विवेक व बुद्धी यामुळे वेगळा आहे. त्यामुळे धर्मग्रंथांनी सांगितलेले स्वीकारणार नाही. स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे, असं सांगितले.शंकेचे निराकरण करने,प्रश्न विचारणे हा गुन्हा समजला जात असे परंतु त्यापुढे जाऊन गौतम बुद्धाने इतरांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे सांगितले आणि हीच गोष्ट बहुजनांसाठी क्रांतिकारक ठरत आहे, असे डॉ.आ.ह.साळुंखे यांनी विविध दाखले देत स्पष्ट केले.सोबतच चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला तर बदनामी,छळ केला जातो.मारण्याचेही प्रयत्न केले जातात,न्याय चिकित्सेमुळे वाढत जाते.चिकित्सा जपायची की नाही हे समाजाला ठरवावे लागणार आहे.गैरवाजवी अतिक्रमण स्विकारणार नाही आणि दुसर्यावरही होऊ देणार नाही, हे जपले तर स्वातंत्र्य व अभिव्यक्ती जपले जाऊ शकते असेही सांगतानाच मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका तर ती पुरुषापेक्षाही कर्तबगार होऊ शकते हे अडीचहजार वर्षापुर्वीच गौतम बुध्दांनी सांगितल्याचे डाॅ.साळुंखे म्हणाले.

डॉ.साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले ह्या भारतीय स्त्री जीवनातील मोठा अपवाद असल्याचे सांगून त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांमुळेच आजच्या महिलांची प्रगती झाल्याचे प्रतिपादन केले. अलिकडेच झालेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतातील बहुसंख्य तरुणांकडे नव्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य नसेल. त्यामुळे २०३० पर्यंत या तरुणांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असेल. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य टिकवायचे असेल, तर भावी पिढीला कोणता विचार देणार आहोत, याचा गंभीरपणे विचार व्हावा, असे ठाम मत डॉ.साळुंखे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्रा.अर्जुन जाधव यांनी हा व्यक्तीचा सत्कार करत नसून विचारांचा सत्कार आहे.हा विचारांचा पाया हजाराेवर्षापासून रुजलेला असून त्या विचारांना पोचविण्याचे काम गेल्या ४० वर्षापासून आ.ह.साळुंखे सातत्याने करीत आहेत.ते वारकरी संप्रदायाचे असून संंस्कृतभाषेत रुची असल्याने त्यात सखोल अभ्यास करून लेखण केले.संस्कृत भाषेतील अभ्यासानंतर धर्मग्रंथात समाजाबद्दल काय लिहिले आहे आणि काय सांगितले जाते हे सत्य काय हे पटवून देण्याचे काम सुरू केले.विश्वकोष तयार करण्याच्या कार्यात त्यांना संधी मिळाली असून १०० हून अधिक लेख विश्वकोषात लिहिल्याचे सांगितले तसेच  ५५ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत असे सांगितले.यावेळी प्रभाकर गजभिये यांनी अध्यक्षीय भाषणात १४ आक्टोबंर १९५६ च्या धम्मक्रांतीमुळे आज आम्ही याठिकाणी एकत्र येऊ शकलो.अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आता कुठे राहिली सविंधानाने दिलेले हक्क अधिकार हिसकावले जात आहेत.त्यामुळे सर्वांना संघटित होण्याची वेळ आल्याचे म्हणाले.
याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ.आ.ह.साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाला डी.डी.मेश्राम,सुनिल तरोणे,क्रांती ब्राम्हणकर,विजय बहेकार,अतुल सतदेवे,उमेश उदापूरे,रोशन मडामे,बबलू कटरे,प्रा.बी.एम.करमकर,खेमेंद्र कटरे,सविता बेदरकर,प्रा.प्रकाश धोटे,सावन कटरे, रमेश ब्राम्हणकर,कैलास भेलावे,लखनसिंह कटरे,डाॅ.संजिव रहांगडाले,माणिक गेडाम,युवराज गंगाराम,काशिराम हुकरे,के.बी.चव्हाण,प्रा.नामदेवराव किरसान,गुरुदास येडेवार,हरिष ब्राम्हणकर,लिलाधर गिहेपुंजे,वैशाली खोब्रागडे यांच्यासह मराठा सेवा संघ, ओबिसी सेवा संघ, संविधान मैत्री संघ, बुद्धीस्ट समाज संघ, संभाजी ब्रिगेड, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, युवा बहुजन मंच, ओबिसी संघर्ष कृती समिति, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, अवंतीबाई लोधी महासभा या आयोजन समितीच्या संघटनेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणुटोला येथे दत्तात्रय जयंती उत्साहात साजरी


देवरी,दि.13 - श्री पंच कृष्ण मंदिर महानुभाव पंथ ट्रस्टच्या वतीने गणुटोला येथे श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव गेल्या बुधवारी (दि.11) मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य गोमती तितराम ह्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  माजी पं.स. सभापती देवकी मरई, माजी सभापती सुनंदा नरेटी,सौ .शांती ऊईके, हेमलता कुंजाम आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प.पु.प.म.श्री संतोषमुनी शास्त्री, श्री क्षेत्र सुकळी/डाक यांचे प्रवचन ,प.पु ई श्री अशोकराजदादा डाकरम/सुकळी  प.पु.श्री फुलेराजदादा दर्यापुरकर मौदा,प.पु.ई.श्री संतोषजी शिवणेकर गणुटोला प.पु.ई.श्री बसंतप्रसाद तिवारी,ज्ञानीराजदादा  हेरपार यांचे प्रमुख उपस्थितीत व  श्री पंच कृष्ण मंदिर महानुभाव पंथ ट्रस्ट गणुटोला यांचे भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले  होते. दहीकाला व महाप्रसादाच्या वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  निलसिंह कुंजाम ,वासुदेव यादव ,विकास कुंजाम ,रतिराम दर्रो ,नंदकुमार आचले , सोनुजी नेताम,चंद्रपालजीऊईके आदींनी सहकार्य केले. 
संचालन लोकनाथ तितराम आणि सोनुजी नेताम यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...