गोंदिया,दि.25 - गोंदिया जिल्हा जैन कलार समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या नववर्षातील 19 जानेवारी रोजी स्थानिक पिंडकेपार रोड स्थित समाजभवनात आयोजित केले जाणार आहे.
स्थानिक पिंडकेपार रोडस्थित जैन कलार समाज भवनात समाज कार्यकारिणीची सभा आज बुधवारी (दि.25) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी समाज कार्यकारिणीचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते.
या सभेत समाजाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. या वर्षीचा महिला मेळावा व स्नेहसंमेलन १९ जानेवारी ला करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच त्यामध्ये १८ जानेवारी ला दुपारी दीड वाजता महिला व युवती करीता मेंहदी स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. तर १९ जानेवारी ला महिला मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेह संमेलन घेण्यासंदर्भात निश्चित झाले. त्याच दिवशी भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांसाठी इच्छिकांनी आपापली नावे समाज कार्यकारिणीच्या सदस्यांकडे पाठविण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याशिवाय मार्च 2019 च्या 10 वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांच्या गुणपत्रिकेसह कार्यकारिणीकडे पाठविण्यासंबंधी आयोजकांनी सूचना केल्या आहेत
No comments:
Post a Comment