Saturday 7 December 2019

तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

शहरासह ग्रामीन भागात रात्रभर विज खंडीत
देवरी : ७
देवरी शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन -तिन दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील ऑक्सिजनवर असलेला वीज पुरवठा दोन दिवसान्पासुन दहा-दहा मिनिटांनी खंडित होत असल्याने तसेच  रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खंडित वीज पुरवठय़ामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत होत असून, गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

विद्युत वितरण कंपनीच्या देवरी उपकेंद्रावरून तालुक्यातील अनेक  गावांना वीज पुरवठा होतो परंतु तांत्रिक बिघाडाने देवरी तालुका परिसरातील गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. देवरीवाशीयानां दि.६-१२-२०१९ रोज शुक्रवार ची  संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली आहे.

 तालुका नक्षलग्रस्त व आदीवासी बहुल असुन आदीवासी लोकांची संख्या जास्त असून, तालुका जगंल व्याप्त आहे. वीज पुरवठा खंडित राहत असल्याने ग्रामीन भागातील लोकानां सतत त्रास सहन करावा लागतो.
शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये , शाळा महाविद्यालयात यामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे.

विजवितरन  कंपनीच्या इंजीनियर ला संपर्क केले अस्ता तांत्रिक बिघडाचे कारण  मुख्य विज सेवा आमगाव हेड वरुन येतो व ही सेवा वनरस्त्यानीं येत असल्यामुळे कधी कधी फाल्ट मिळण्यास  विलंब होतो असे उत्तर मिळाले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...