Monday, 2 December 2019

ओबीसी जनगणनेसाठी राष्ट्रीयस्तरावर आंदोलनात्मक भूमिका घेणार-डाॅ.तायवाडे

चंद्रपूर,दि.02 : १९३१ पासून म्हणजे इंग्रजी राजवटीपासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही. स्वतंत्र भारतात आजतागायत ओबीसी समाज या देशात नेमका किती आहे, ही माहिती नाही. त्यामुळे बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला देशात म्हणावे तसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. म्हणून २०२१ मधे राष्ट्रीय जनगणना होणार आहे. त्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, असे स्पष्ट मत मांडून त्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन डॉ. बबन तायवाडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विद्यार्थी महासंघ, व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ यांची राज्यस्तरीय बैठक रविवारला स्थानीक जनता शिक्षण महाविद्यालयातील श्रीलिला सभागृहात पार पडली.या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. व प्रमुख उपस्थिती समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शामभाऊ लेडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, कल्पना मानकर, अ‍ॅड. अंजली साळवे, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष शरदराव वानखेडे, प्रा. सुर्यकांत खनके, गुणेश्वर आरीकर,युवा अध्यक्ष मनोज चव्हाण आदी उपस्थित होते

.डॉ. अशोक जिवतोडे यांनी राज्याप्रमाणेच केंद्रामधे ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, देशात व राज्यात २७ टक्के ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, या मागण्या अधोरेखीत केल्या. सोबतच गावोगावी ओबीसी समाजाचे संघटन झाले पाहिजे, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, याबाबत विचार मांडले. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत चंद्रपूरमधे ओबीसी महासंघाचे जिल्हा अधिवेशन घेऊ, असे आश्वासन दिले. या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होण्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पाचवे महाअधिवेशन पंजाबमधील अमृतसर मधे घेण्याचे ठरले. या बैठकीला रामदास कामडी, शेषराव ठाकरे, दिनेश चोखारे, विजय पिदुरकर, प्रा. अनिल शिन्दे, ओमदास तूराणकर, रमेश ताजणे, प्रा. नितिन कुकडे, कार्याध्यक्ष प्रा. बबनराव राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बरडे, महासचिव विजय मालेकर, प्रा. संजय पन्नासे,अ‍ॅड. रेखाताई बाराहाते, निलेश कोडे, रुचित वांढरे, रोशन कुंभलकर, रवी टोंगे, प्रा. दादा दहीकर, प्रा. अशोक पोफळे, निकीलेश चामरे, विजय भोगेकर, तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. सहविचार बैठकीचे प्रास्ताविक सचिन राजूरकर, संचालन प्रा. रविकांत वरारकर, व आभार प्रा. विजय मालेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...