Sunday 8 December 2019

फेसबुकच्या माध्यमातून मिळाल्या दुर्गम क्षेत्रातील ४४ विद्यार्थ्यांना स्वेटर्स…


देवरी,दि.08: सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे हे आपण नेहमी ऐकतो, त्यातल्या त्यात सोशल मीडिया हे आज बहुतेकांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनले आहे.आजची युवा पिढी तर फेसबुक, व्हाट्सएप वर तासनतास घालवते.त्याबद्दल त्यांच्यावर टीका सुद्धा होते, पण याच फेसबुक च्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील अतिशय दुर्गम म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील पालांदूर जमीनदारी या क्षेत्रातील ४४ गरजु विद्यार्थ्यांना स्वेटर्स मिळाल्या.
    फेसबुकवर “आम्ही मराठी शाळा वाचवायलाच पाहिजेत” या समूहाद्वारे मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात तसेच गरजु विद्यार्थ्यांना मदत सुद्धा केली जाते. याच समुहाचे सदस्य असलेले व जि प प्राथमिक शाळा टेकरी येथे जुन महिन्यापासून सहाय्यक शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले  महेंद्र रहांगडाले यांनी या समूहामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स गरज असुन कुणी मदत करण्यास तयार असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबई पुण्यातील अनेक मंडळींनी संपर्क साधला. टेकरी शाळेला स्वेटर्स ची व्यवस्था झाल्यानंतर, पुन्हा इतर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स मिळाव्यात म्हणून महेंद्र रहांगडाले , सुरेंद्र गौतम,मोहन बिसेन यांनी अमोल साळवे, दौंड पुणे यांसोबत संपर्क करून रोपा व धोडरा या इतर दोन शाळांना सुद्धा स्वेटर्स मिळवुन दिल्या. टेकरी शाळेतील विद्यार्थ्यांना  देवकांत बनकर व त्यांचे सहकाऱ्यांनी उत्तम दर्जाच्या स्वेटर्स प्रदान केल्या तसेच धोडरा व रोपा येथील विद्यार्थ्यांना दौंड, पुणे येथे रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले अमोल साळवे व त्यांच्या जर्मनी मध्ये इंजिनिअर वास्तव्य असलेल्या भगिनी केसरकर मॅडम यांनी स्वेटर्स दान केल्या. या स्वेटर्स कुरियर व रेल्वे च्या माध्यमातुन दात्यांनी पाठवल्या. अश्याप्रकारे सोशल मीडिया च्या विधायक वापरातून ४४ अतिदुर्गम क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर्स प्राप्त झाल्या.
    विद्यार्थी व पालक झाले आनंदित…
या स्वेटर्स वाटपाचे कार्यक्रम तिन्ही शाळांचे शिक्षक पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत दि.०२/१२/२०१९ ला वाटप करण्यात आल्या. स्वेटर्स मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद तर झालाच मात्र पालकांनी सुद्धा दात्यांचे आभार मानले. स्वेटर प्रदान केलेल्या दात्यांचे पालांदूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री लन्जे सर, धोडरा शाळेचे शिक्षक व शिक्षक सहकार संघटना गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, टेकरीचे मुख्याध्यापक  मोहन बिसेन, रोपाचे मुख्याध्यापक महानु हुंडरा, सहाय्यक शिक्षक श्री चौधरी,धोडराचे मुख्याध्यापक विरेंद्र खोब्रागडे तसेच पालांदूरचे उपसरपंच  नुरचंद नाईक यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...