Monday 30 September 2019

अखेर भाजप- शिवसेनेचं जमलंच

युती झाल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर
जागांचा तिढा मात्र कायम


मुंबई,दि.30 - शिवेसना- भाजप आणि रिपाइं महायुतीची घोषणा झाली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमात हे युतीचे पत्र जाहीर करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ताक्षराने हे पत्र छापण्यात आले आहे. या पत्रामध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे. पण, जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. परंतु, 124 जागांवर शिवसेनेला राजी करण्यात आल्याची माहीती आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अजूनही भाजप- शिवसेना युतीतील जागावाटाप बाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता.

डॉ. मनमोहन सिंग यांनी नाकारले पाकिस्तानचे निमंत्रण


Former Prime Minister Manmohan Singh's invitation was rejected by Pakistan | पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले
नवी दिल्ली. दि.30- पाकिस्तानातील कर्तारपूर कॅारिडॅारच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानने भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित केले होते. मात्र, पाकिस्तानने दिलेले निमंत्रण मनमोहन सिंग यांच्याकडून नाकरण्यात आले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आम्ही भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॅारिडॅारच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. मात्र, निमंत्रण देण्याच्या आधीच मनमोहन सिंग यांनी उद्घाटनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुनानक जयंतीच्या  पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे.

आमदार अग्रवालांच्या हातात भाजपचा झेंडा

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश
नागपूर, दि.३० - गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते व गोंदिया विधानसभा मतदारसंघातील सलग तीनदा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी आज सोमवारला (दि.३०) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आ.अग्रवालांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम येथील रामदासपेठ स्थित होटल सेंटर पाँईट येथे पार पडला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार खोमेश रहांगडाले, उमादेवी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. गोंदियातून ४०० ते ५०० कार्यकर्त्यांसह आमदार अग्रवाल दुपारी गोंदियावरून भाजप प्रवेशासाठी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, माजी महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती शकील मंसुरी यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी नागपूर येथे अग्रवालांच्या भाजप प्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.

शिवस्मारकामध्ये 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार


Chhatrapati Shivsamkara corruption worth Rs 1,000 crore; Critics accuse CM of serious opposition | छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

विरोधकांचा मुख्यमंत्री यांचेवर आरोप
दक्षता समितीने दाद दिली नाही तर प्रकरण न्यायालयात नेणार

मुंबई,दि.30 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या विभागाकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. यासंबंधाने केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून त्यांनी दाद दिली नाही तर प्रकरण कोर्टात नेणाऱ असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासंबंधाने आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सादर केली. मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो असं सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तरही दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही. उलट पवारांवर  ईडीचा गुन्हा दाखल करून हा विषय पुढे ढकलला आणि शिवस्मारक घोटाळा बाजुला गेला असेही नवाब मलिक म्हणाले. एल अण्ड टी या कंपनीने भरलेल्या ३ हजार ८०० कोटी रूपयांच्या निविदेची रक्कम वाटाघाटीद्वारे २ हजार ५०० कोटीं रूपयांपर्यंत कमी करण्याला विभागीय लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली होती. गंभीर बाब म्हणजे या प्रकल्पाची निविदेतील किंमत २ हजार ६९२.५० कोटी होती. पंरतु एल अण्ड टी कंपनीची निविदेतील बोली ही ३ हजार ८२६ कोटी म्हणजेच जवळपास ४२ टक्के अधिक होती. त्यामुळे ख-या अर्थाने या प्रकल्पाची फेरनिविदा होणे आवश्यक होते. आराखडा बदलून ही रक्कम अंदाजीत रकमेच्या १ हजार कोटींपेक्षाही कमी झाली आहे. परंतु एल अण्ड टी ने आधीच फुगवलेली रक्कम आम्ही वाटाघाटीतून कमी केली आणि शासनाचा फायदा करून दिला असे सरकारकडून भासवले जात आहे. परंतु वस्तुतः यात १ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम काढण्याचा सरकारचा हा डिझाईन करुन भ्रष्टाचार करण्याचा डाव होता असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पत्र दिले आहे. शिवाय कॅगचे अधिकारी सांगत आहेत. मुख्यमंत्री याच्या खात्यात भ्रष्टाचार झाला आहे. मात्र यामध्ये इतर पक्षांसह शिवसेनाही गप्प आहे. शिवस्मारकाच्या कामात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे सरकारचे कारस्थान आहे.  . 

वंचितचे उमेदवार जाहीर

गोंदिया.दि.30- वंचित बहुजन आघाडीची राज्य विधानसभेच्या निवडणुकीची दुसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पाच मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे.
एमआयएमशी फारकत घेत वंचितने कुरघोडी करीत उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील एकूण जागांपैकी 180 उमेदवार घोषित करून आपली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 60- तुमसर मतदार संघातून विजय शहारे, 61- भंडारा मतदार संघातून एड. नितीन  बोरकर, 63- अर्जूनीमोर मतदार संघातून  रीता लांजेवार, 64- तिरोडा मतदार संघातून संदीप राजकुमार पोगामे तर 66- आमगाव-देवरी मतदार संघातून सुभाष रामरामे यांच्या नावाचा समावेश आहे.

ठाण्यात शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नाही


Vidhan Sabha 2019 - A loyal Shiv Sena will not promote the BJP; Shiv Sainiks Stand in Thane | निष्ठावान शिवसैनिक भाजपाचा प्रचार करणार नाही; ठाण्यात शिवसैनिकांनी घेतली भूमिका 

ठाणे,दि.30- ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी, असा आग्रह शिवसेनेतील निष्ठावान मंडळींनी धरला आहे. ही जागा भाजपला दिल्यास निवडणुकीत भाजपला सहकार्य न करण्याचा इशारा या मंडळींनी दिला आहे. यासंदर्भात टेंभी नाक्यावरील कार्यालयात एक बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय मोठ बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे. तसेच वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुध्दा या मंडळींनी केली आहे. त्यामुळे ठाण्याचे आव्हान भाजपला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. तर 2019 च्या लोकसभेत युतीचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून 1 लाख 30 हजार मतदान झालं होतं. मात्र विधानसभेत शिवसैनिकांनी या मतदारसंघात दावा केलेला आहे. ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

युतीमुळे शिवसेनेत गटबाजी उफाळली


Video: Two groups fall in Shiv Sena due to coalition ?; ShivSainik who believed in Balasaheb became angry | Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

कल्याण,दि.30 -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. भाजपसोबत युती केल्याने पारंपारिक शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण शहरात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण शहर शिवसेना शाखेत या नाराज शिवसैनिकांनी बैठक घेतली.
यामध्ये कल्याण पूर्व, पश्चिम विधानसभेचे प्रमुख अरविंद मोरे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक रमेश जाधव, शिव वाहतूक सेनेचे उपशहर प्रमुख महेश भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. कल्याण पूर्वमध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर कल्याण पश्चिममध्ये विद्यमान नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार आहेत. युती झाली तर या दोन्ही जागा भाजपाच्या वाट्याला येतील त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले हे मतदारसंघ भाजपाचा गड बनू लागलेत असं शिवसैनिकांना वाटतं. त्यामुळे शिवसैनिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा भाजपचा कुटिल डाव असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं सांगत शिवसेना शहर कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीत शिवसैनिकांनी दिलेल्या विशेष घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असो या घोषणेने अनेकांच्या भूवया उंचावल्या. या घोषणेवरुन कुठेतरी शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट वेगळा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतो.

पुन्हा केंद्राची रिझर्व्ह बॅंकेच्या 30 हजार कोटीवर नजर


Image result for रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

नवीदिल्ली,दि.30- केंद्रातील मोदी सरकार पुन्हा  रिझर्व्ह बॅकेकडून 30 हजार कोटीच्या लाभांश मागणीची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मधील वित्तीय तुट भरून  काढण्यासाठी ही मागणी करण्यात येणार असल्याचे बोलले जाते.
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करात मोठी कपात केल्याने केंद्राचा महसूल घटला आहे. परिणामी, महसूली तूट वाढल्याने साहजिकच केंद्राच्या तिजोरीवर ताण पडला आहे. तिजोरीवरील हा ताण कमी करण्यासाठी सरकार रिझर्व्ह बॅकेकडून ही तुट भरून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहीती आहे.

चंद्रकात पाटील यांना ब्राम्हण महासंघाचा तीव्र विरोध


Vidhan Sabha 2019 brhaman mahasangh oppose chandrakant patil's Candidacy | Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विराेध

पुणे, दि.30 -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातून निवडणुक लढविण्याची तयारी चालली आहे. कोथरूड मतदारसंघातून ते निवडणुक लढविण्यास उत्सुक असून त्या मतदार संघात मेघा कुलकर्णी या आमदार आहेत. त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची कुणकुण लागताच ब्राम्हण महासंघाने पाटील यांना तीव्र विरोध केला आहे. प्रसंगी श्री पाटील यांचे विरोधात ब्राम्हण महासंघाने बंडखोर उमेदवार उभा करण्याची तयारी चालविली आहे.
या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची संख्या मोठी आहे. कोल्हापूरच्या मंदीरातून ब्राम्हण समाजाला हाकलणाऱ्या, दादाजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्याला न्याय न देणाऱ्य़ा पुण्याबाहेरील ब्राम्हणद्वेष्टी व्यक्तीला पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राम्हण समाज त्याचा विरोध करील, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे. जातीय आरक्षणाचे समर्थन करून खुल्या प्रवर्गातील लोकांना संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे की नाही याचा विचार करावाच लागेल, असे महासंघाचे म्हणणे आहे. प्रसंगी ब्राम्हण समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली जात असल्याचे सुद्धा सांगण्यात येते.

नातेवाईकच निघाला वृद्ध महिलेचा खरा मारेकरी

अर्जुनी-मोर,दि.30 - गेल्या 10 सप्टेंबर रोजी तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथे घडलेल्या लक्ष्मीबाई शिलेवर हत्या प्रकरणी मज महिलेच्या नातेवाईकालाच अर्जूनी मोर पोलिसांनी अटक केली आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
 तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील लक्ष्मीबाई हनुमैया शिलेवर वय 65 वर्ष या वृद्ध महिलेचा दिनांक 10 सप्टेंबरच्या   रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान गळा आवळून खून करून रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. मृत वृद्ध महिला ही अवेध दारूचा व्यवसाय करीत असल्याची माहीती आहे. फिर्यादी प्रशांत रामलू शिलेवर याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून पामेश्वर किसन कापगचे याला 12 सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटके केली होती. मात्र, आरोपी कडून तपासात माहिती न मिळाल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश निरसया उत्तमवार वय 32 वर्ष राहणार सावरटोला हल्ली मुक्काम मानेगाव सडक याने खून करून गुन्हा केल्याचे समजताच ठाणेदार महादेव तोदले याचे नेतृत्वातील पथकाने मानेगाव सडकला आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या घरात चौकशी केली असता सदर आरोपी हा करमभाड तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर ग्रामीण येथे असल्याचा माहिती मिळाली. आरोपीचा सासरा सुरेश पल्लेवार यांचे घराची झडती घेऊन सदर आरोपीस 26 सप्टेंबरच्या रात्री दीड वाजता ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सदर खूनाची कबुली दिली. कर्जाचे पैसे देण्यासाठी लक्ष्मीबाईचा गळा दाबून खून केल्याचे त्यांनी  सांगितले. आरोपीने चोरून नेलेला ऐवज मानेगाव जवळील पोहरा गावाजवळ नाल्याच्या पुलाखाली लपवून ठेवल्याने ते जप्त करण्यात आले. 

...अखेर आमदार गोपालदास अग्रवाल यांचा कॉंग्रेसला बायबाय



कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी कडे फॅक्स 
आमदारकी ही सोडली

गोंदिया,दि.30 – 27 वर्षे कॉंग्रेसच्या छत्रछायेत राज्यातील राजकारणात आमदार राहणारे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अखेर कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधीकडे पाठविला.सोबतच अग्रवाल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पाठविला आहे.राजीनामा देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःअग्रवाल यांना दुरध्वनी करुन चर्चा केली आणि पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री हे मुंबईवरुन नागपूरला फक्त आमदार अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशासाठी येत आहेत हे मात्र विशेष.
गेल्या अनेक महिन्यापासून गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार अग्रवाल यांच्या तळ्यातमळ्यात राजकारणाचे वादळ चांगलेच घोंगावत होते. यामुळे गोंदिया कॉंग्रेसचे सर्वेसर्वा समजल्या जाणाऱ्या अग्रवाल यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे भाजपमधील नेते सुद्धा कमालीचे अस्वस्थ झाले होते. परंतु, भाजपच्या वरिष्ठ स्तरावर अत्यंत नियोजनबद्ध रीत्या खिचडी शिजत असताना विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वी अत्यंत मात्र हालचाल न करण्याची काळजी घेऊन कॉग्रेससह भाजपच्या नेत्यांची सुद्धा धाकधुक वाढविण्यात आली होती. शेवटी आज आमदार अग्रवाल यांनी या सर्व परिस्थितीवर मात करून भाजपमध्ये आपली जागा पक्की करत 52 वर्षातील कॉग्रेस पक्षामधील कार्यकाळाचा त्याग केला. उल्लेखनीय म्हणजे गेली 27 वर्षे आमदार अग्रवाल यांनी कॉंग्रेसच्या छायेत आपले राजकारण शिखरावर नेले होते.आज पक्ष सोडण्यापुर्वी प्रताप लाॅन येथे आयोजित समर्थक कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात काँग्रेस सोडून भाजपप्रवेश करीत असल्याचे जाहिर करतांना त्यांना अश्रू अनावर झाले.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,शहर अध्यक्ष अशोक चौधरी,पंचायत समितीच्या सभापती,उपसभापती,बाजार समितीचे उपसभापती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कवर्धामधील चकमकीत महिला नक्षलीचा खात्मा

रायपूर(वृत्तसंस्था)दि.30ः- छत्तीसगडमधील कवर्धा येथील सुरतिया गावाजवळ रविवारला पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जुगनी या नक्षलवादी महिलेचा खात्मा झाला.
 घटनास्थळावरून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.याशिवाय पोलिसांना चकमक झालेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मोठ्याप्रमाणावर साहित्य देखील जप्त करण्यात यश आले आहे. सुरतिया गावाजवळ नक्षलवाद्यी सक्रीय असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी या परिसरात वेढा दिला होता. त्यानंतर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार सुरू करण्यात आला व चकमकीस सुरूवात झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात महिला नक्षली जुगनी हिचा खात्मा झाला. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर दंतेवाडा जिल्ह्यात दोन आणि बीजापुरमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत, तर काहीजण आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आ.अग्रवालांचा आज भाजप प्रवेश

गोंदिया,दि.३०ः गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल हे आज सोमवारला(दि.३०) मुबंईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांना आ.अग्रवालांनी आपण काँग्रेस सोडत असल्याचे शनिवारलाच सांगितले.त्यानंतर रविवारला प्रताप लान येथे समर्थकांची बैठक घेत त्यांनी उद्या भाजप प्रवेश करायचे आहे आपण सर्व जाण्यासाठी तयार रहावे अशी सुचना दिली .गेल्या अनेक दिवसापासून अग्रवाल भाजपमध्ये जाणार ही चर्चा असून राजकारण तापले आहे.भाजपमध्येही अग्रवालांच्या प्रवेशाचे स्पष्ट संकेत आले आहेत.ते शुक्रवारला  भाजप तर्फे आपला उमेदवारी अर्ज गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी दाखल करणार आहेत.

Sunday 29 September 2019

जिल्हास्तरीय योग स्पर्धेत देवरीच्या स्पर्धकांची बाजी


देवरी: २९

बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती अंतर्गत व गोंदिया जिल्हा योग असोसिएशन अंतर्गत जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा सिंधी शिक्षण संस्था गोंदिया येथे आज 29 ला पार पडली असून स्पर्धेमध्ये देवरी येथील स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करित बाजी मारली. सदर स्पर्धेमधे वयोगट 8-13 मुले मधे कुणाल चुटे प्रथम , हर्षित चुटे 13-18 द्वितीय,
रोहित ब्रामहनकर 18-25 त्रुतीय,
रोशनी कळमकर 25-35 द्वितीय ,
पुरुष वयोगटात 35-50 प्रमोद कळमकर प्रथम या प्रकारे स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.

सदर स्पर्धकांना योग शिक्षक प्रमोद कलमकर आणि रोशनी कलमकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

योग समिति देवरीच्यावतिने  विजेता स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या भंडारा-गोंदियातील उमेदवारांच्या नावाची घोषणा ३ ऑक्टोंबरला?


खा.पटेलांनीच घेतल्या ७ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
गोंदिया व आमगाव मतदारसंघावरही पदाधिकाèयांनी केला दावा
तुमसरमध्ये राजु कारेमोरे व अनिल बावनकर,तिरोड्यात माजी आमदार बनसोड व राजलक्ष्मी तुरकरमध्ये चुरस
गोंदियाची जागा मिळाल्यास विजय शिवणकर राहणार उमेदवार?

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.२९ः– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारासंह त्यांच्या समर्थकांचा आढावा आज रविवारला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेलांनी गोंदियातील जलाराम लॉन येथे घेतला.खा.पटेलांनी भंडारा जिल्ह्यातील भंडारा,तुमसर व साकोली तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,तिरोडा,आमगाव व अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे असे स्पष्ट निर्देश देत उमेदवाराच्या नावाची घोषणा ही ३ ऑक्टोंबरला करण्यात येईल असे संकेत दिले आहेत.जेव्हा मुलाखती घेतल्या जात होत्या त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ज्यामध्ये माजी खासदार,माजी आमदारासंह प्रफुल पटेलांनतंर ज्यांचे नाव येते  ते सर्व सभागृहात बसून होते.तर प्रफुलभाई मात्र एकटेच उमेदवारांच्या मुलाखती घेत होते.या मुलाखतीच्यावेळी सभागृहात माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,माजी म्हाडाचे सभापती नरेश माहेश्वरी,माजी.जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,धनजंय दलालासंह आदी अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकाèयांनी मात्र आजच्या मुलाखतीच्या प्रकियेवरच नाराजी व्यक्त करीत सर्वच उमेदवारांना एकासोबत बोलविण्याएैवजी एका एका उमेदवाराकडून पटेलांनी म्हणने एैकायला हवे होते अशी प्रतिक्रिया दिली.तर राष्ट्रवादी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा कमजोर झाला असून जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे नसलेल्या अधिकाराचाही परिणाम पक्षसंघटनेच्या मजबुतीवर पडल्याची भावना अनेकांनी सभागृहात प्रतिनिधीकडे बोलून दाखविली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोपर्यंत आपल्या हातातील अधिकार जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व पक्षाच्या इतर नेत्यांकडे दोन्ही जिल्ह्यात देणार नाहीत,तोपर्यंत पक्षाच्या संघटनेत बळ येणार नाही,आता पुर्वीसारखे दिवस राहिले नसल्याचेही अनेक कार्यकर्ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच उमेदवाराच्या निवडीसंदर्भात घेतलेल्या या बैठकीमध्ये गोंदियातील काँग्रेसचे आमदार हे भाजपमध्ये चालल्याने या मतदारसंघात काँग्रेस दुबळी ठरली आहे,तसेच काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असा आग्रह या मतदारसंघातील पदाधिकारी व नेत्यांनी पटेलांकडे केला.त्यावर पटेलांनी गोंदियाची जागा काँग्रेसकडे असल्याने जागावाटपात राज्यपातळीवर जो निर्णय होईल त्यानुसारच मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणुक लढवेल असे सांगत तुमच्या भावना प्रदेशाध्यक्षांकडे पोचविल्या जाणार असल्याचे सांगितले.तशीच परिस्थिती गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केली.आम्ही गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही.हा मतदारसंघ काँग्रेसला दिला जातो,आम्ही काय करायचे असे म्हणत एका लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावी ही भूमीका घेत आमगाव-देवरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात देण्याची मागणी केली.या मतदारसंघात बाजार समितीचे रमेश ताराम हे एकमेव राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार आहेत.

अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्यात असून या ठिकाणी सुध्दा मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे हे एकमेव प्रबळ दावेदार आहेत.तर तिरोडा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या ताब्यात असून या मतदारसंघात मात्र मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार व महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनीही उमेदवारी मागितली असून मागच्या निवडणुकीत बनसोड अपक्ष रिंगणात राहत ४० हजार मते घेतल्याने पटेलासमोर पेच निर्माण झालेला आहे.तुमसर मतदारसंघात १३ जणांनी उमेदवारी मागितली,त्यामध्ये माजी खासदार कुकडेंचाही समावेश असला तरी राजू कारेमोरे व माजी आमदार अनिल बावनकर यांच्यापैकीच कुणा एकाच्या गळ्यात उंमेदवारी पडणार असल्याचे बघावयास मिळाले.भंडारा व साकोली येथील इच्छुकांनीही उमेदवारी सादर केल्या मात्र पाहिजे तसा प्रतिसाद या मतदारसंघात नसल्याचे जाणवले.

21 हजाराच्या दारूसह होंडा एक्टिवा जप्त


अर्जुनी मोरगाव पोलिसांची कार्यवाही

अर्जुनी मोरगाव ,दिं29- सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोमात सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व दारूबंदी असलेल्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दौड नगर येथे गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागत असून  त्याठिकाणी तपासणी नाका बसविण्यात आला आहे आज दिनांक 29 सप्टेंबरला ठाणेदार महादेव तोदले यांच्या दौऱ्यादरम्यान होंडा ॲक्टिवा दुचाकी एम एच 33 एक्स 81 3 3 क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपी भरून दारू वाहतूक करताना आढळून आला.  पाठलाग दरम्यान आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी 21 हजाराच्या दारूसह 30 हजाराची एक्टिवा गाडी असा असा एकूण 51 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई करताना ठाणेदार महादेव तोडले यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार निकोडे, ग्रामसेवक पोटावी व तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

माजी आमदार रामरतन राऊत भाजपच्या वाटेवर?



जनचर्चांनी घेतला वेग 
गोंदिया, दि.29 –  66 आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघाची निवडणुक जाहीर होताच प्रतिस्पर्धी उमेदवांना घेऊन अऩेक राजकीय चर्चांनी वेग घेतला आहे. विद्यमान आमदार संजय पुराम यांच्या कथित विडीओ वायरल झाल्यापासून त्यांची तिकीट धोक्यात आल्याचे संकेत भाजपकडून मिळत  आहेत. परिणामी, आता भाजपचा उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांना पडला असताना माजी आमदार रामरतन राऊत यांना भाजप गळाला लावत असल्यांच्या चर्चांना ऊत आला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि नामांकन पत्र दाखल करण्याच्या तोंडार विद्यमान आमदार संजय पुराम यांच्या कथित डांसबार मधील विडिओ वायरल करण्यात आला. यामुळे आ. पुराम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंबंधाने आमदार पुराम यांनी तो ‘मी नव्हेच’ची भूमिका घेत सदर विडीओ बनावट असून विरोधकांनी त्यांची प्रतिमी मलिन करण्याच्या उद्देशाने षडयंत्र रचल्याचा आरोप दोन दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.  याविरुद्ध आमदार पुराम यांनी देवरी पोलिसात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. ही एक घटना कमी म्हणून की काय तिकडे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांना सुद्धा विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने पक्षांतर्गतच विरोधकच या आमदारांचा गेम तर करत नसावे ना ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे श्री. पुराम यांची उमेदवारी धोक्या
त आल्याचे संकेत मिळत आहेत. सध्यातरी भाजपच्या वतीने आमदार संजय पुराम हेच आमचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर मात्र वेगवेगळी नावे चर्चिली जात आहे. हा प्रकार संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी जाणीवपूर्वक केला जात असल्याचा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे. या उमेदवारीच्या शर्यतीत देवरी तालुक्यातील एका कर्मचाऱ्याचा नाव सुध्दा चर्चेत आले आहे. सदर शिक्षक हा संजय पुराम यांचा कट्टर विरोधक असून सामाजिक क्षेत्राच त्याची चांगली पकड असल्याचे सांगण्यात येते.
कॉंग्रेसच्या वतीने सहसराम कोरोटी यांनी उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत आघाडी घेतल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे नाराज राऊत यांचेवर भाजपने जाळे टाकले आहे. तसेही श्री राऊत कॉग्रेसने तिकीट नाकारल्यास बंडखोरी करणार हे उघड आहे. यापूर्वी सुद्धा अनेक स्थानिक निवडणुकीत स्वपक्षाला राऊत यांनी वाऱ्यावर टाकून भाजपला मदत केल्याचा आरोप त्यांचे जुने सहकारी करीत आहेत. श्री. राऊत यांचेमुळे भाजपला अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये लाभ झाला असून व यापूर्वीसुद्धा श्री राऊत यांचेमुळे श्री भेरसिंग नागपुरे यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली होती, असाही एक मतप्रवाह वाहत आहे. याला भरीसभर म्हणून गोंदियाचे आमदार यांचे पक्षांतर याचेही जोडून पाहिले जात आहे. या सर्वांची उतराई करता यावी सहसराम कोरेटी यांच्या सारख्या तगड्या उमेदवारावर मात करता यावी, यासाठी भाजपचा डोळा श्री राउत यांचेवर असण्याची शक्यता सर्वत्र चर्चिली जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंकडून अधिकृत कोणीही बोलायला तयार नसल्याने चर्चा या चर्चा सुद्धा ठरू शकतात.
दरम्यान, राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षात आघाडी असून जोपर्यंत दोन्ही पक्षातील वरिष्ठ पातळीवरून तिकीट वाटपासंबंधी अधिकृत घोषणा केली जात नाही, तो पर्यंत स्थानिक पातळीवर कोणालाही चर्चा करण्याचे अधिकार अद्यापही मिळाले नाही. असे असताना कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार सहसराम कोरेटी हे मलाच तिकीट मिळाल्याचे सांगून कालपासून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. श्री कोरेटी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोन करून मला तिकीट मिळाळ्याचे सांगत आपल्याला बैठकीला यायचे आहे असा संदेश दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्री प्रफुल पटेल यांचे कडे तक्रार केली असून उमेदवारी संबंधाने अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याने श्री कोरेटी यांच्या वर्तनावर तीव्र हरकत घेतल्याची माहिती आहे. हा पक्षांतर्गत शिस्त भंगाचा प्रकार असून या प्रकारामुळे कोरेटी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Image may contain: 1 person, closeup

Thursday 26 September 2019

शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निंबावासीयांचा निर्णय़

गोरेगाव(मनोज सरोजकर)दि.२६:-येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहगाव तिल्ली केंद्रातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा निंबाच्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदनाव्दारे विनंती करुन सुध्दा या अधिकाऱ्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने (दि.२७) शुक्रवारपासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय आज(दि.२६) गुरुवारला झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
मोहगाव तिल्ली केंद्रातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहली ते ७ वी पर्यंत शिकवणी वर्ग सुरू असुन ११५ पटसंख्या आहे. त्यामुळे ५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत.त्यापैकी दोन सहाय्यक शिक्षक, १ मुख्याध्यापकाचे पद भरण्यात आले.मात्र सहाय्यक शिक्षक डी.आर.मरस्कोल्हे हे कोणत्याही प्रकारची सुचना न देता सतत गैरहजर राहत असल्याने एकट्या सहाय्यक शिक्षकाला पहीली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अनेकदा पंचायत समितीच्या चकरा मारत गटशिक्षणाधिकार्यांंना शिक्षकांची मागणी केली. पण शिक्षक मिळाले नाही, सरतेशेवटी शिक्षणाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून शिक्षकांची मागणी केली. त्यातही अधिका-यांनी दुर्लक्ष केले. शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची मागणी जिल्हा परिषद पुर्ण करीत नाही. तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षकांची मागणी पूर्ण होणार नाही. शाळेत विद्यार्थी जाणार नसल्याने शाळा ही ओसाड पडणार आहे. कार्यरत शिक्षकांना वेळकाढूपणा करावे लागणार आहे. शाळा बंद पडली तरी चालेल परंतु शासन जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती करीत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव शिवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र बहेकार,पालक विजय पटले, संजय शहारे, विजय कोचे,शामलाल कुमडे,देवचंद परसगाये, महादेव बघेले, घनशाम भगत,सुरज मसे, विजय शिवणकर, हिरालाल चनाप, मदनलाल कोंटागले,शिला कोचे,गौतमा जनबंधु, ललिता कोचे, अर्चना साखरे यांनी पत्रकात म्हटले आहे

लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे- उपविभागीयअधिकारी राठोड

निवडणुक यंत्रणा सज्ज

देवरी,दि. 26- निवडणुक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी जागरूक राहून मतदान प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. यासाठी महिला, पुरुष आणि युवा मतदारांनी अग्रक्रमाने मतदान  करावे, असे आवाहन देवरीचे उपविभागीय अधिकारी तथा 66- आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड यांनी केले आहे.
पत्रकारांसाठी बोलाविलेल्या सभेत माहिती देताना श्री राठोड यांनी सांगितले की, 66- आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघातील सदस्य निवडीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. उद्या 27 तारखेपासून नामांकन दाखल करण्याला सुरवात होत आहे. नामांकन दाखल करण्याची अंतीम तारीख 4 ऑक्टोबर असून दुसऱ्याच दिवसी म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची छाऩनी करण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोबर रोजी नामाकंन मागे घेता येणार असून प्रत्यक्ष मतदान हे 21 ऑक्टोबर आणि मतगणना ही 24 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
या मतदारसंघात निवडणुक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. या प्रक्रियेमध्ये  एकूण 2 लाख 66 हजार 422 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 1 लाख 33 हजार 660 पुरुष आणि 1 लाख 33 हजार 62 महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी एकूण 310 मतदान केंंद्र तयार करण्यात आले असून त्यांनी  24 झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय अतिरिक्त 3 झोनल अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. ही निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजारावर निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा यंत्रणेचे सुमारे पाचशे कर्मचारी असणार आहेत.
मतदारांना आपली ओळख पटवून देण्यासाठी एकूण 11 प्रकारची शासकीय दस्त वापरता येणार आहेत. यामध्ये मतदार ओळख पत्र, पॅन कार्ड. आधारकार्ड, पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बॅंकेची पासबूक, मनरेगाचे जॉबकार्ड, पेशनकार्ड, श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड, शासकीय सेवा कार्ड,आरजीआय ने दिलेले स्मार्टकार्ड यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर वृध्द आणि दिव्यांग मतदारासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अशा मतदारांना मतदान सुलभरीत्या करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर व्हील चेअर, भिंग आणि स्वयंसेवकाची सोय करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे देवरी येथे पूर्णतः दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यावर विचार सुरू असल्याचेही श्री राठोड यांनी सांगितले. 

तुमसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून

तुमसर,दि.26ःदुचाकीवरून जात असलेल्या कुख्यात गुंडाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास काली मंदिराजवळील रस्त्यावर घडली. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
बाबू बॅनर्जी (३५) रा. तुमसर असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी तो एका साथीदारासह दुचाकीवरून जात होता. दरम्यान, काली मंदिराजवळ अज्ञात इसमांनी त्याला अडविले. त्यानंतर त्याच्या पोटावर, मानेवर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. या घटनेनंतर त्याच्या साथीदार पळून गेल्याची माहिती आहे. रक्तबंबाळ अवस्थेत बाबू खाली कोसळला. व तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी झाली होती. तुमसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविले.

माजी मंत्री अहिरांच्या ताफ्याला अपघात,दोन ठार-तीन जखमी

चंद्रपूर दि.२६ : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाला आज चंद्रपूर-नागपूर मार्गावर जामनजीक सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना सकाळी घडली.
या अपघातात अहीर मात्र सुखरुप बचावले आहेत.असून 3 सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहे.आज सकाळी 7:30 वाजता अहिर हे दिल्ली जाण्याकरिता नागपूर विमातळावर पोहोचण्याकरिता चंद्रपूर निवासस्थानाहून निघाले असताना, जाम च्या काही किलोमीटर आधी त्यांच्या ताफ्यामधील सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या गाडीला एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने धडक दिली. यामध्ये 3 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.मात्र अहिर हे समोरच्या गाडीत असल्याने ते सुखरूप आहे. अपघात होताच अहिर यांनी तात्काळ गंभीर जखमी सुरक्षारक्षकांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले.

ककोडीच्या स्वस्तधान्य दुकानदारानी केली मारहाण

सुभाष सोनवाने
चिचगड,दि.26:-तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या बाबतीत महसुल प्रशासनाकडे अनेक तक्रारी असतानाही त्या तक्रारींची दखल घ्यायला प्रशासन व लोकप्रतिनिधी तयार दिसून येत नाही.त्यातच आपल काही होत नसल्याचे बघून रेशन दुकानदारांनीही मनमानी कामकाज सुरु केल्याचा प्रकार बघावयास मिळत आहे.
त्याचे असे की, ककोडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने एका महिलेला रेशन धान्याची पावती ज्या दिवशी दिली त्यादिवशी त्या महिलेला धान्य न दिल्याने सदर महिला दुसर्या दिवशी धान्यकरीता गेली असता दुकानदारांने दिलेल्या पावतीला पाणी लागल्याने त्यावरील आकडे स्पष्ट दिसत नसल्याने सदर लाभार्थी महिलेला थांबायला सांगितले. हा प्रकार त्याठिकाणी हजर असलेल्या बजरंग दलाचा सदस्य शैलेश ताम्रकर यांने ज्यादिवशी पावती दिली त्याच दिवशी धान्य का दिले नाही, अशी विचारणा केली. यावरुनस्वस्तधान्य दुकानदार व शैलेश ताम्रकर यांच्या वाद निर्माण होऊन तो मारहाणीपर्यंत गेला. नेहमीच आमच्या कामात अडथळ निर्माण करतो असे म्हणत स्वस्तधान्य दुकानदार व त्या दुकानातील एका इसमाने शैलेशला बेदम मारहाण केली. यात शैलेशच्या डोक्यावर मार लागल्याने रक्तबंबाळ झाले. या मारहाणीची माहिती लगेच चिचगड पोलिसांनी देण्यात आल्यानंतर चिचगडचे पोलिस निरिक्षकांनी शैलेशला चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला. या मारहाण प्रकरणात चिचगड पोलिसांनी  भजनसींग भाटीया , बबलु भाटीया, बबलु भाटीया(मुलगा), ननकु भाटीया, सुरजीत सींग भाटीया यांच्यावर भारतीय दंड संहीता अधीनीय्यम १८६० अंतर्गत कलम- १४३,१४७,१४९,३२४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केले असून याप्रकरणात काहींनी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात बजरंग दलाच्या नावावर शैलेश ताम्रकर हा इतरांना त्रास देत असल्याची चर्चा समोर आली आहे

Wednesday 25 September 2019

मुलाच्यां वस्तिगृहातिल पाऊल व्यसन मुक्तीकडे




चिचगड: 25- बालकांना व्यसना पासून मुक्त रहावे आणि त्यांनी आपले आयुष्य सुकर करावे,आपले बालक कोणत्याही प्रकारच्या व्यासना च्या आहारी जाऊ नये याकरिता एक प्रयत्न म्हणून शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह चिचगड चे गृहपाल के. बी. देशकर यांच्या प्रयत्नांनी मागच्या 2 वर्षा पासून वसतिगृह 100टक्के व्यसन मुक्त झालेले आहे.
गृहपाल के. बी. देशकर आणि सलाम बॉम्बे फाउंडेशन यांच्या संयुक्त विधमाने वसतिगृहाच्या विध्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.
प्रसंगी सलाम बॉम्बे चे जितेंद्र पारधी यांनी मुलांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन वसतीगृहाचा नायक जितेश बंजार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि समारोप खिलेन कोडापे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसतिगृहाच्या सर्व विदयार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

ग्राहकांचे सहकार्य व आर्थिक शिस्तीमुळे अर्बन बँक प्रगतीपथावर – महेशकुमार जैन

भंडारा,दि.25- सभासद ठेवीदार व ग्राहकवर्गाच्या सहकार्यामुळे दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बँकेने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला असून दि. ३१ मार्च २०१९ रोजी बँकेच्या ठेवी रूपये ५०८.८८ कोटी झालेल्या आहेत. सर्व सभासदांचे बँकेप्रती असलेल्या विश्वासाचे हे प्रतिक आहे. सभासदांचे सहकार्य व विश्वासाचे आधारावर ठेवीदार व ग्राहकांचे उन्नतीकरीता सामाजिक भान ठेवून पारदर्शक व आर्थिक शिस्त कायम ठेवून कार्यक्षेत्रातील गरजू व्य्नतींच्या उन्नतीकरीता बँक नेहमीच प्रयत्नशिल आहे. सर्व संचालक व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व परिश्रमामुळे तसेच कर्जदार सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे मागील आर्थिक वर्षाचे तुलनेत बँकेचे भागभांडवलात रूपये ३८ लाखांनी वाढ झालेली असून सन २०१८- १९ मध्ये बँकेला एकूण नफा रूपये १.०६ करोड झाला आहे. निव्वळ नफ्याच्या ६०.२४ ट्नके लाभांस बँकेच्या सभासदांना देण्यात आला.

सर्व सभासद, ग्राहक व सर्व कर्मचाèयांच्या सहकार्यामुळे हे श्नय झाले आहे. संचालक मंडळ त्यासाठी सर्वांचे आभारी असल्याचे गौरवोदगार बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जैन यांनी याप्रसंगी व्य्नत केलेत. दि भंडारा अर्बन बँकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी ते बोलत होते. दि भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा २२ सप्टेंबरला मंगलमुर्ती सभागृह, खात रोड भंडारा येथे संस्थेचे अध्यक्ष महेशकुमार जैन यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेला मोठया प्रमाणात संस्थेचे सभासद, हितqचतक, ग्राहक वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रांरभी दिवंगत थोर विभुती, सभासद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सभेला उपस्थित मान्यवर भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भंडारा नगरपरिषदेचे अध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार आनंदराव वंजारी, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, गोंदिया जिल्हा सिंधू नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नानकराम अनवानी, भंडारा जिल्हा बँकेचे संचालक राजूजी हेडाऊ, अ‍ॅड. धनराज खोब्रागडे, सुभाष आकरे, नगरसेवक बसीर पटेल, समीर शेख, विनोद मानापूरे, अनिल लांजेवार, आशिष पात्रे, बँकेचे संचालक शेखर बोरसे, जिल्हा सहकारी प्रशिक्षण बोर्डाचे प्रशिक्षक नंदनवार यांचा शालश्रीफ ळ देवून सत्कार करण्यात आला.
सभेला बँकेचे उपाध्यक्ष हिरालाल बांगडकर, संचालक नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, अ‍ॅड. जयंत वैरागडे, गोपीचंद थावानी, विलास काटेखाये, चिंतामन मेहर, डॉ. जगदिश निंबार्ते, पांडूरंग खाटीक, दिनेश गिरेपूंजे, उद्धव डोरले, महेंद्र गडकरी, हेमंत महाकाळकर, लिलाधर वाडीभस्मे, उदय मोगलेवार, अ‍ॅड. विनयमोहन पशिने, सुमीत हेडा, संचालिका ज्योती बावणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हरीष मदान उपस्थित होते. सभेत मार्च २०१९ मध्ये १० वीच्या परिक्षेत ९०टक्केपेक्षा जास्त व १२ वीच्या परिक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाèया व क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त सभासदांच्या ३४ पाल्यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.सभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतल्याबाबत बँकेचे उपाध्यक्ष हिरालाल बांगडकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता केली. सभेचे कामकाज यशस्वी पार पाडण्याकरीता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीष मदान, व्यवस्थापक आर.व्ही. मेश्राम, सौ. पी.आर. हार्डीकर, पी.बी. बावणे, ए.एन. हुमणे, व्ही.एस. भोंगाडे, बी.के. कारेमोरे, कु. जे. एस. शहारे, एन.डी. डोंगरे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शिखर बँक घोटाळाः शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई(वृत्तसंस्था)दि.25: – महाराष्ट्र राज्य सहकारी   बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी  मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला काहीही सहभाग नसतांना ईडीने गुन्हा दाखल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आपला न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगत जनताच सरकारच्या या कुटीलनितीला पर्दापाश करतील असे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्य कर्जे दिल्याने राज्याची शिखर बँक असणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अडचणीत सापडली आणि त्यावर रिझर्व्ह बँकेला प्रशासक नेमावा लागला होता. यासंदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही असा आरोप करत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केले होते.राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या आरोपांची कसून चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला आपला अंतिम निकाल अलीकडेच जाहीर केला आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने नुकताच एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅकांचे तत्कालीन संचालक, पेण सहकारी बॅकेचे तत्कालीन संचालक व तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्यासह तत्कालीन मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व अन्य सरकारी अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संचालक मंडळवावर कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, मधुकरराव चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, माणिकराव पाटील,भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील, मदन पाटील, अमरसिंह पंडीत, शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, राजन तेली, प्रसाद तनपुरे, सुरेश देशमुख, शिवाजीराव नलावडे,शिवसेनेचे आनंदराव अडसुळ यांच्यासह जिल्हा बँकांच्या अध्यक्षांचाही समावेश आहे.तर गुलाबराव शेळके, पांडुरंग फुंडकर या दिवंगत राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2019 बेरारटाईम्स अंक





Monday 23 September 2019

अनियमित बस फेऱ्यांचा मागितला अहवाल

गोंदिया:23
मानव विकास कार्यक्रम सन 2019-20 बसफेऱ्यांचे वेळापत्रक कोलंडल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना असह्य त्रास सहन करावा लागेल असल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली आणि सदर बस फेऱ्यांचा वेळापत्रक कोलमडल्या बाबद आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गोंदिया, साकोली , तिरोडा यांना बस फेऱ्या वेळेवर न सोडल्यामुळे  विद्यार्थ्यांना गैरसोय होत असल्यामुळे बस वेळेवर सुटतील आणि पोहचतील या प्रमाणे नियोजन करण्याचे आदेश सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा मानव विकास समिती ने दिलेले आहे आणि असा अहवाल सादर करण्याचे धाकीत दिले आहे.

Sunday 22 September 2019

साडेसात हजार खोट्या ' कास्ट व्हँलिडिटी ' रद्द करा- आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी

आदिवासी विकास विभागातील १०० कोटीचा घोटाळा दडपला.

आदिवासी विद्यार्थी संघाचा आरोप


गोंदिया,दि.22 - राज्यातील अनुसूचीत जमातींच्या नामसदृश्याचा गैरफायदा घेऊन आर्थिकदृष्ट्या बलदंड असलेल्या गैरआदिवासींनी  बनावट जातप्रमाणपत्र मिळविले. परंतु, आता बनावट जातवैद्यता प्रमाणपत्रही मिळविल्याचे उघडकीस आले आहे. शे - दोनशे नव्हे तर तब्बल ७ हजार ५४५ बनावट जातवैधता प्रमाणपत्रे खुद्द औरंगाबाद अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी  समितीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हे बनावट जातवैद्यता प्रमाणपत्र तत्कालिन सहआयुक्त तथा उपाध्यक्ष कै.श्री.व.सू.पाटील यांनी दि.६ सप्टेंबर २०१० ते ५ आँक्टोबर २०११ या कालावधीत दिल्याचे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे तत्कालिन आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी आदिवासी विकास विभागाचे सचिव यांना ८ मार्च २०१६ रोजी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, या साडेसात हजार खोट्या' कास्ट व्हँलिडिटी ' रद्द करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघ यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास विभागाचे मंत्री,मुख्यसचिव व आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांना मंत्रालयात निवेदन दिले  आहे.
बनावट शिक्के बनवून  रेकार्ड तयार करणे , बोगस कागदपत्रे , बनावट गृहचौकशी अहवाल , उपविभागीय अधिका-यांनी नाकारण्यात आलेली जातीचे प्रमाणपत्र अपिले मान्य करणे, तक्रारदाराने सबळ पुरावे देवूनही बनावट पुराव्याच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आल्याचे नमूद केले आहे. यात समिती कार्यालयातील पोलिस शिपाई, पोलिस उपअधीक्षक व कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी दोषी असून संगनमताने बनावट कागदपत्रे ,बनावट शालेय नोंदी,बनावट जमातीची प्रमाणपत्रे इत्यादी बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन बिगर आदिवासी अर्जदारास वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहे. 
ही समिती प्रत्येक  महिन्याला कमीत कमी एक हजार बनावट वैधता प्रमाणपत्र वाटत होती.या करीता तत्कालिन सहआयुक्त तथा उपाध्यक्ष कै.व.सू.पाटील यांनी घरीच कार्यालय थाटले होते. ३ ते ४ लाख रुपये घेऊन वैधता प्रमाणपत्र देत होते.जे अर्जदार तीन चार लाख रुपये देवू शकत नव्हते.अशांची कामे होत नव्हती.पोलीस दक्षता पथकांचा सिंहाचा वाटा असून पोलीस कर्मचारी व कार्यालयातील कर्मचारी महिन्याला कमीत कमी चार ते पाच लाख व अधिकारी रुपये २५ लाखापर्यंत कमाई करीत होते.या मध्ये कमीत कमी १०० कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.असे निवेदनात नमूद आहे.
औरंगाबाद , बीड, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील खुल्या जातीच्या लोकांकडून लाच घेऊन वैधता प्रमाणपत्र दिलेली आहे. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष व.सु.पाटील यांच्या दिनांक ६ सप्टेंबर २०१० ते ५ आँक्टोबर २०११ या कालावधीत औरंगाबाद समिती कडून निर्गमित केलेल्या सर्वच्या सर्व ७ हजार५४५ प्रकरणांचे तात्काळ पुनर्विलोकन करण्यासाठी विशेष समिती स्थापन करुन रिव्ह्यूव घ्यावा .अर्जदारांना पुन्हा वैधता प्रमाणपत्र निर्गमित होत नाही तोपर्यंत , यापुर्वीच्या त्यांना चुकीच्या पद्धतीने निर्गमित केलेल्या सर्वच्या सर्व वैधता प्रमाणपत्रावर अत्यंत तातडीने निर्बंध , स्थगिती आणावी.वेळप्रसंगी उच्च न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडून स्थगिती देण्यासाठी विनंती करावी.या कालावधीत औरंगाबाद समिती कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्वच्या सर्व अधिकारी, कर्मचारी , पोलीस दक्षता पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांसहीत सामायिक विभागीय चौकशी सुरु करुन दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शासनामार्फत कडक कारवाई स्वतंत्ररित्या करण्यात यावी अशाही शिफारसी आहेत.पण या अहवालाला आदिवासी विकास विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.आज साडेतीन वर्ष लोटून गेले तरी मात्र एवढ्या गंभीर असलेल्या अहवालावर आदिवासी विकास विभाग मूग गिळून बसला व अहवालच दडपून टाकल्याचा गंभीर आरोप आदिवासी विद्यार्थी संघाने केला आहे.
हा अहवाल दडपल्यामुळे आदिवासी समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे.३ ते ४ लाख रुपये घेऊन ज्या गैरआदिवासींना बनावट जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले,आज त्यांचे रक्तनात्यातील पाल्य वैद्यकीय व तत्सम प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र मागत आहे.ते जर समितीकडून मिळत नसल्यास मा.न्यायालयात दाद मागत आहे.आणि त्या माध्यमातून जातवैधता प्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या राखीव जागेवर वैद्यकीय प्रवेश मिळवत आहे.जोपर्यंत गैरआदिवासींना दिलेले प्रथम वैधता प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत रक्तनात्यातील त्या पाल्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द होणार नाही.
त्यामुळे औरंगाबाद विभागात ६ सप्टेंबर २०१० ते ५ आँक्टोंबर २०११ दरम्यान निर्गमित केलेल्या ७ हजार ५४५ खोट्या 'कास्ट व्हँलिडिटी' तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि दोषी असणारे अधिकारी , कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने केली आहे.
निवेदन देतांना आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नैताम, माजी सचिव गजानन कुमरे, विनोद मडावी,प्रभू इवनाते आदि उपस्थित होते.

Saturday 21 September 2019

सुंदरीदंड येथे जनजागरण मेळावा

देवरी पोलिस विभागाचा उपक्रम

देवरी,दि.21 - गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीने देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरीदंड (मुरपार) येथे आज शनिवारी (दि.21) एक दिवसीय जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव हे होते. यावेळी नक्षलसेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश भास्कर, देवरीचे तलाठी सचिन तितरे,तालुका कृषी अधिकारी जमदाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे आणि देवरी उपविभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली आज तालुक्यातील सुंदरीदंड (मुरपार) येथे पोलिस विभागाच्या वतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात  महसूल, आरोग्य आणि कृषी विभागाने सुद्धा आपला सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना तलाठी तितरे यांनी ईव्हीएम मशिन आणि व्ही व्ही पॅट मशिनविषयी मार्गदर्शऩ करून मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. श्री. जमदाडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना आणि कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी नक्षलसेलचे नागेश भास्कर यांनी नक्षल चळवळीची दुष्परिणामाविषयी नागरिकांचे सविस्तर मार्गदर्शन करून नक्षल चळवळीने लोकांचे कोणकोणते नुकसान होतात, याची माहिती देत नक्षल चळवळीचा भंडाफोड केला. नक्षल्यांच्या विघातक कृत्याची माहिती देत नागरिकांनी नक्षल चळवळीपासून दूर राहण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. डॉ, सुनील येरणे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक माहिती दिली. दरम्यान, या शिबीरामध्ये 118 जणांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. ठाणेदार बच्छाव यांनी पोलिस आणि नागरिक यांच्यात सलोख्याचे संबंध कसे निर्माण होतील यावर मार्गदर्शन केले. पोलिसांना आपले मित्र मानून आपल्या मनातील पोलिसांविषयी असलेली भीती दूर करण्याचे आवाहन सुद्धा श्री. बच्छाव यांनी केले.
यावेळी नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी देवरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

नवीदिल्ली,दि.21- महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता असलेल्या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज भारत निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रासह हरयाणा राज्यातही एकाचवेळी निवडणुक घेण्यात येणार असून ही निवडणुक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुका जाहीर झाल्याने आता आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या निवडणुकीमध्ये प्लॅस्टिक बंदी पहिल्यांदाच अमलात आणली जाणार आहे.
आज भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. त्याप्रमाणे,  निवडणुकीची अधिसूचना ही 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नामाकंन दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून नामांकन पत्राची छाननी  ही 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.  नामांकन मागे घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर असून प्रत्यक्ष मतदान 21 तारखेला होईल. तर मतमोजणी ही 24 ऑक्टोबरला करण्यात येणार असून निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त अरोरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा असून या जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुक घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे उमेदवाराला या निवडणुकीत प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी लावण्यात आली आहे. दिवाळी च्या आधी या निवडणुकीचा निकाल येणार असल्याने कोणत्या पक्षाला फटाके फोडण्याची संधी राज्याचे मतदार देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे राज्यात या निवडणुकीला घेऊन आघाडीत जागा वाटपाचा तिडा जवळपास सुटल्यात जमा असून सत्ताधारी पक्षांच्या युतीचे गुपीत अद्याप तरी बाहेर आले नसल्याने संभ्रमाची स्थिती कायम आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या समरामध्ये उडी घेणार असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यात बेबनाव झाल्याचे याचा फायदा कोणत्या गटाला मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने आता आघाडी आणि युतीच्या यात्रा आता गुंडाळाव्या लागणार आहेत.


लोकप्रतिनिधींच्या दबावात कंत्राटी मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्यांना ठेंगा

गोंदिया,दि.20-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांच्या राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या तक्रारीचे स्वरुप बघता ज्या पंचायत समितीमध्ये किंवा एका विशिष्ट ठिकाणी अधिक कालावधी झाला असेल त्या ठिकाणाहून त्यांचे नियुक्तीचे ठिकणा बदलविण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले होते.त्या अनुषंगानेच नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी १३ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार गोंदिया जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांनी १६ सप्टेंबरला बैठक घेत एकाच ठिकाणी अधिक कार्यकाळ झालेले व तक्रारी असलेल्यां मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचाèयांच्या तत्काल बदल्या करण्याचे निर्देश मग्रारोहयो उपजिल्हाधिकारी यांना दिले होते.त्यानुसार 17 सप्टेंबरला पुन्हा झालेल्या एका बैठकीत कंत्राटी कर्मचार्यांना त्यांच्या बदल्या होणार असून आचारसहिंतेचा व बदल्यांचा काही संबध नसल्याचे स्पष्ठ सांगण्यात आले होते.त्यानंतर मात्र एकाच ठिकाणी दबा धरुन बसलेल्या काहींनी आपली बदली थांबावी यासाठी लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली,त्यामध्ये माजी पालकमंत्र्याकडेही काही गेले.माजी पालकमंत्र्यासह विद्यमान आमदारांनी अधिकार्यांना मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्याच करु नका असा संदेश दिल्याने त्या बदल्यांनाच ठेंगा दाखविण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा गवगवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतानाच त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र पारदर्शकतेला फाटा देत एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष असलेल्यासाठी अधिकार्यांनाच बदल्या करु नका असे संदेश देत असल्याच्या चर्चेने फडणवीस सरकारच्या व जिल्हाधिकारी कार्यालयातील पारदर्शक कार्यक्रमालाच आजपर्यंत तिलांजली देण्याचे काम होत आले असून विद्यमान जिल्हाधिकारी सुध्दा या संघटित कंत्राटी मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्या करु शकले नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.त्यातच काही कंत्राटी कर्मचारी यांनी आज बदल्या थांबल्या बद्दल माजी पालकमंत्र्यांना भेटून आभार मानल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पारदर्शक योजनेला अपारदर्शकतेची झालर लागल्याचे बोलले जात आहे.

बस फेरी बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे बेहाल




आमगाव,दि.21 : येथे शैक्षणिक महाविद्यालय असून शिक्षण घेण्यासाठी खेड्यापाड्यातुन अनेक विद्यार्थी एसटी बसने ये जा करतात. मात्र देवरी मार्गावरील सायंकाळच्या वेळेतील बस फेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
 बस अभावी विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी ८ वाजत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी बस सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. महामंडळाच्या बसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सोय झाली. मात्र आता याच विभागाच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आमगाव येथे विविध शाळा आणि महाविद्यालय असल्याने २५ ते ३० कि.मी.अंतरावरील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी बसने ये-जा करतात. मात्र मागील काही दिवसांपासून देवरी मार्गावरील सायंकाळची बस फेरी आगाराने बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सालेकसा, डोमाटोला, कालीसरार, हरदोली, पाऊलदौना हा परिसर जंगल व्याप्त आहे. या परिसरातील विद्यार्थी बसने शिक्षणासाठी आमगावला येतात. शाळा सुटल्यावर बसने परत जातात. मात्र बस वेळेवर येत नसल्याने शाळेत पोहचायला उशीर होतो. तर शाळा सुटल्यावर बसची वाट पाहात राहावे लागते. अशातच सायंकाळी पाच वाजताची देवरी बसफेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.डोमाटोला व चिचगड बस साडेसहा वाजताच्या सुमारास येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास आठ नऊ वाजता. जेव्हापर्यंत बस येत नाही तेव्हापर्यंत शिक्षकांना सुध्दा आपली जबाबदारी म्हणून बसस्थानकावर थांबावे लागते.विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याने पालकांची सुध्दा चिंता वाढली आहे. तर विद्यार्थी घरी उशीरा पोहचत असल्याने त्यांना सुध्दा अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. आगारात बसेसची संख्या कमी झाल्याने या मार्गावरील बस फेरी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मागील पंधरा दिवसांपासून ही समस्या आहे पण याची अद्याप लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने दखल घेतली नाही.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...