ठाणे,दि.30- ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी, असा आग्रह शिवसेनेतील निष्ठावान मंडळींनी धरला आहे. ही जागा भाजपला दिल्यास निवडणुकीत भाजपला सहकार्य न करण्याचा इशारा या मंडळींनी दिला आहे. यासंदर्भात टेंभी नाक्यावरील कार्यालयात एक बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय मोठ बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे. तसेच वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुध्दा या मंडळींनी केली आहे. त्यामुळे ठाण्याचे आव्हान भाजपला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. तर 2019 च्या लोकसभेत युतीचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून 1 लाख 30 हजार मतदान झालं होतं. मात्र विधानसभेत शिवसैनिकांनी या मतदारसंघात दावा केलेला आहे. ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment