Friday 13 September 2019

सरपंच महा सेवा संघाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन

गोंदिया /देवरी १३-
 गोंदिया जिल्हा आणि तालुका आमगाव  सरपंच महा सेवा संघा च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जिल्हाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पालकमंत्री  आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .
सदर निवेदन मार्फत मनरेगा च्या प्रलंबित रोड रस्त्याचे देयके त्वरित ७ दिवसाच्या देण्यात यावे,  २०१७-१८ व २०१८-१९ मधील मनरेगाच्या कुशल कामाचा निधी मिळत नाही तो पर्यंत नवीन कामाची मागणी करण्यात येणार नाही  आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पूर्वी निधी प्राप्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार करण्यात येणार असे स्पष्ट मागण्या  सदर निवेदनातून करण्यात आलेले आहेत .
सदर निवेदन देते वेळी जिल्हापरिषद सदस्य सुरेश हर्षे,  गंगाधर परशुरामकर ,गोंदिया जिल्हा सरपंच महासंघाचे अध्यक्ष कमल येरणे सरचिटणीस नितीन टेम्भरे, जिल्हा समन्वयक नरेंद्र शिवणकर , आमगाव तालुका अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर , सरपंच सुनंदा उके , शोभाताई मेश्राम , अनिता ताई आंगरे , भारती येडे, सुनीता तुरकर , रामेश्वर शेंडे, आणि मोठ्या प्रमाणात साहित्य पुरवठा धारक उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...