Monday 30 September 2019

...अखेर आमदार गोपालदास अग्रवाल यांचा कॉंग्रेसला बायबाय



कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सोनिया गांधी कडे फॅक्स 
आमदारकी ही सोडली

गोंदिया,दि.30 – 27 वर्षे कॉंग्रेसच्या छत्रछायेत राज्यातील राजकारणात आमदार राहणारे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अखेर कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधीकडे पाठविला.सोबतच अग्रवाल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पाठविला आहे.राजीनामा देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःअग्रवाल यांना दुरध्वनी करुन चर्चा केली आणि पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री हे मुंबईवरुन नागपूरला फक्त आमदार अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशासाठी येत आहेत हे मात्र विशेष.
गेल्या अनेक महिन्यापासून गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार अग्रवाल यांच्या तळ्यातमळ्यात राजकारणाचे वादळ चांगलेच घोंगावत होते. यामुळे गोंदिया कॉंग्रेसचे सर्वेसर्वा समजल्या जाणाऱ्या अग्रवाल यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे भाजपमधील नेते सुद्धा कमालीचे अस्वस्थ झाले होते. परंतु, भाजपच्या वरिष्ठ स्तरावर अत्यंत नियोजनबद्ध रीत्या खिचडी शिजत असताना विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वी अत्यंत मात्र हालचाल न करण्याची काळजी घेऊन कॉग्रेससह भाजपच्या नेत्यांची सुद्धा धाकधुक वाढविण्यात आली होती. शेवटी आज आमदार अग्रवाल यांनी या सर्व परिस्थितीवर मात करून भाजपमध्ये आपली जागा पक्की करत 52 वर्षातील कॉग्रेस पक्षामधील कार्यकाळाचा त्याग केला. उल्लेखनीय म्हणजे गेली 27 वर्षे आमदार अग्रवाल यांनी कॉंग्रेसच्या छायेत आपले राजकारण शिखरावर नेले होते.आज पक्ष सोडण्यापुर्वी प्रताप लाॅन येथे आयोजित समर्थक कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात काँग्रेस सोडून भाजपप्रवेश करीत असल्याचे जाहिर करतांना त्यांना अश्रू अनावर झाले.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,शहर अध्यक्ष अशोक चौधरी,पंचायत समितीच्या सभापती,उपसभापती,बाजार समितीचे उपसभापती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...