अर्जुनी मोरगाव पोलिसांची कार्यवाही
अर्जुनी मोरगाव ,दिं29- सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोमात सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व दारूबंदी असलेल्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दौड नगर येथे गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागत असून त्याठिकाणी तपासणी नाका बसविण्यात आला आहे आज दिनांक 29 सप्टेंबरला ठाणेदार महादेव तोदले यांच्या दौऱ्यादरम्यान होंडा ॲक्टिवा दुचाकी एम एच 33 एक्स 81 3 3 क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपी भरून दारू वाहतूक करताना आढळून आला. पाठलाग दरम्यान आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी 21 हजाराच्या दारूसह 30 हजाराची एक्टिवा गाडी असा असा एकूण 51 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई करताना ठाणेदार महादेव तोडले यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार निकोडे, ग्रामसेवक पोटावी व तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment