Sunday 29 September 2019

राष्ट्रवादीच्या भंडारा-गोंदियातील उमेदवारांच्या नावाची घोषणा ३ ऑक्टोंबरला?


खा.पटेलांनीच घेतल्या ७ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
गोंदिया व आमगाव मतदारसंघावरही पदाधिकाèयांनी केला दावा
तुमसरमध्ये राजु कारेमोरे व अनिल बावनकर,तिरोड्यात माजी आमदार बनसोड व राजलक्ष्मी तुरकरमध्ये चुरस
गोंदियाची जागा मिळाल्यास विजय शिवणकर राहणार उमेदवार?

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.२९ः– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारासंह त्यांच्या समर्थकांचा आढावा आज रविवारला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेलांनी गोंदियातील जलाराम लॉन येथे घेतला.खा.पटेलांनी भंडारा जिल्ह्यातील भंडारा,तुमसर व साकोली तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,तिरोडा,आमगाव व अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे असे स्पष्ट निर्देश देत उमेदवाराच्या नावाची घोषणा ही ३ ऑक्टोंबरला करण्यात येईल असे संकेत दिले आहेत.जेव्हा मुलाखती घेतल्या जात होत्या त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ज्यामध्ये माजी खासदार,माजी आमदारासंह प्रफुल पटेलांनतंर ज्यांचे नाव येते  ते सर्व सभागृहात बसून होते.तर प्रफुलभाई मात्र एकटेच उमेदवारांच्या मुलाखती घेत होते.या मुलाखतीच्यावेळी सभागृहात माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,माजी म्हाडाचे सभापती नरेश माहेश्वरी,माजी.जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,धनजंय दलालासंह आदी अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते व पदाधिकाèयांनी मात्र आजच्या मुलाखतीच्या प्रकियेवरच नाराजी व्यक्त करीत सर्वच उमेदवारांना एकासोबत बोलविण्याएैवजी एका एका उमेदवाराकडून पटेलांनी म्हणने एैकायला हवे होते अशी प्रतिक्रिया दिली.तर राष्ट्रवादी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा कमजोर झाला असून जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे नसलेल्या अधिकाराचाही परिणाम पक्षसंघटनेच्या मजबुतीवर पडल्याची भावना अनेकांनी सभागृहात प्रतिनिधीकडे बोलून दाखविली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जोपर्यंत आपल्या हातातील अधिकार जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व पक्षाच्या इतर नेत्यांकडे दोन्ही जिल्ह्यात देणार नाहीत,तोपर्यंत पक्षाच्या संघटनेत बळ येणार नाही,आता पुर्वीसारखे दिवस राहिले नसल्याचेही अनेक कार्यकर्ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच उमेदवाराच्या निवडीसंदर्भात घेतलेल्या या बैठकीमध्ये गोंदियातील काँग्रेसचे आमदार हे भाजपमध्ये चालल्याने या मतदारसंघात काँग्रेस दुबळी ठरली आहे,तसेच काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असा आग्रह या मतदारसंघातील पदाधिकारी व नेत्यांनी पटेलांकडे केला.त्यावर पटेलांनी गोंदियाची जागा काँग्रेसकडे असल्याने जागावाटपात राज्यपातळीवर जो निर्णय होईल त्यानुसारच मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणुक लढवेल असे सांगत तुमच्या भावना प्रदेशाध्यक्षांकडे पोचविल्या जाणार असल्याचे सांगितले.तशीच परिस्थिती गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केली.आम्ही गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही.हा मतदारसंघ काँग्रेसला दिला जातो,आम्ही काय करायचे असे म्हणत एका लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावी ही भूमीका घेत आमगाव-देवरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात देण्याची मागणी केली.या मतदारसंघात बाजार समितीचे रमेश ताराम हे एकमेव राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार आहेत.

अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्यात असून या ठिकाणी सुध्दा मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे हे एकमेव प्रबळ दावेदार आहेत.तर तिरोडा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या ताब्यात असून या मतदारसंघात मात्र मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार व महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनीही उमेदवारी मागितली असून मागच्या निवडणुकीत बनसोड अपक्ष रिंगणात राहत ४० हजार मते घेतल्याने पटेलासमोर पेच निर्माण झालेला आहे.तुमसर मतदारसंघात १३ जणांनी उमेदवारी मागितली,त्यामध्ये माजी खासदार कुकडेंचाही समावेश असला तरी राजू कारेमोरे व माजी आमदार अनिल बावनकर यांच्यापैकीच कुणा एकाच्या गळ्यात उंमेदवारी पडणार असल्याचे बघावयास मिळाले.भंडारा व साकोली येथील इच्छुकांनीही उमेदवारी सादर केल्या मात्र पाहिजे तसा प्रतिसाद या मतदारसंघात नसल्याचे जाणवले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...