Thursday, 26 September 2019

तुमसरात कुख्यात गुंडाचा निर्घृण खून

तुमसर,दि.26ःदुचाकीवरून जात असलेल्या कुख्यात गुंडाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास काली मंदिराजवळील रस्त्यावर घडली. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
बाबू बॅनर्जी (३५) रा. तुमसर असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी तो एका साथीदारासह दुचाकीवरून जात होता. दरम्यान, काली मंदिराजवळ अज्ञात इसमांनी त्याला अडविले. त्यानंतर त्याच्या पोटावर, मानेवर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. या घटनेनंतर त्याच्या साथीदार पळून गेल्याची माहिती आहे. रक्तबंबाळ अवस्थेत बाबू खाली कोसळला. व तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी झाली होती. तुमसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...