Sunday, 8 September 2019

गुरूंनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करावे- अतुल कुलकर्णी


तालुका पत्रकार संघाने केला गुरूजनांचा सत्का

देवरी,दि.09- जीवनात गुरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधनांचा भरपूर वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी. आजच्या बालकातून उद्याचे अधिकारी, लोकसेवक घडून देशाला यशाचे शिखर गाठता येईल. गुरूजनांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण न देता त्यांना स्पर्धेच्या युगात कसे टिकता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देवरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देवरी येथे बोलताना केले.
ते देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात गेल्या शुक्रवारी तालुका पत्रकारसंघाच्या वतीने आयोजित शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष  अॅड. प्रशांत संगीडवार, अॅड. श्रावण उके, देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक आणि स्थानिक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून उत्तम सेवा देणारे लिखनलाल कटरे, योगेंद्र बोंबार्डे, तेजनाथ मते आणि मंगलमूर्ती सोयाम प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री कटरे यांनी विद्यमान शिक्षक मंगलमूर्ती सोयाम यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रसंशा केली. ते म्हणाले की, आम्ही ज्या रोपट्याला खतपाणी घालून मोठे केले, ते तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष झाले होते. मात्र गेल्या 10 वर्षापूर्वी ते वटवृक्ष कोसळल्याने मनाला तीव्र वेदना होत होत्या. अशा स्थितीत ही शाळा पुन्हा जीवंत झाल्याचे कानावर येताच माझे मन पुन्हा हिरवेगार झाले. त्यामुळे या शाळेला नवसंजीवनी देणाऱ्या गुरूंना भेटण्यासाठी मी लालायित झालो होतो. देवरी पत्रकार संघातील माझ्या जून्या शिष्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्या बद्दल मी पत्रकार संघाला आशीर्वाद देतो, अशा तीव्र भावना श्री कटरे यांनी बोलताना व्यक्त केल्या. श्री सोयाम यांनी आपल्या मनोगतामध्ये या शाळेच्या सध्यस्थितीबाबत बोलताना सध्या दोन वर्गात 88 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असून पुढील सत्राकरीता पालक आगावू प्रवेश घेत असल्याचे सांगितले.
अन्य सत्कार मूर्तींनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष अड. संगीडवार यांनी केले. संचलन सचिव सुरेश चन्ने यांनी केले. उपस्थितांचे आभार चंचल जैन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील चोपकर, सुशील जैन, सुरेश साखरे, जुबीन खान, नंदूप्रसाद शर्मा, फावींद्र हाडगे आदींनी सहकार्य केले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...