Wednesday, 4 September 2019

देवरी बसस्थानकावर पडले खड्डेःअपघाताची शक्यता

देवरी,दि.04-देशासह राज्यात विकासाचा डंका वाजवला जात असताना आणि बसस्थानकाच्या नुतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च होत असताना या बसस्थानकावरील रस्त्यावर मोठे जीवघेणे खड्डे गेल्या अनेक महिन्यापासून आहेत. राज्य परिवहन विभाग एखाद्या अपघातानंतर या खड्ड्यांची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल देवरीकर प्रवाशांनी केला आहे.
सविस्तर असे की, देवरी येथे राज्य परिवहन विभागाचे बसस्थानक आहे. सध्या या बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गापासून या बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यापासून फार मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप  घेतले आहेत. पावसाच्या दिवसी या खड्ड्यात पाणी साचत असल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता दिसत नाही. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे कपडे या खड्ड्यांमुळे अनेकदा खराब झाले आहेत. शिवाय सायकल वा मोटारसायकल स्वारांना सुद्धा या खड्ड्याचे चांगलेच फटके बसले आहेत. या खड्ड्यातून महामंडळाच्या बसेस ये-जा करीत असल्याने बसेसचे आणि त्यातील सामानांचे सुद्धा नुकसान झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
एकीकडे राज्यात विकासाचे डंबरू वाजविले जात असताना परिवहन विभाग मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दूर्लक्ष करून आहे. परिणामी, परिवहन विभाग एखाद्या मोठ्या अपघाताच्या प्रतिक्षेत तर नाही ना, असा सवाल ज्येष्ठ प्रवाशांसह नागरिकांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...