Sunday, 15 September 2019

'ओबीसीं'ची जातनिहाय जणगणना करा- संभाजी ब्रिगेड

ब्रम्हपुरी,दि.15 - भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्व जाती, धमिंर्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव न करता विकासाच्या समान संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी संविधानात तरतुदी केल्या आहेत. मात्र, ओबीसी समाज विविध सोयींपासुन दूर आहे. १९३१ पासून अजूनही ओबीसी समाजाची जणगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसींची जातिनिहाय जणगणना करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे. यासंदर्भातील निवेदन ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना दिला आहे.
२0२१ मध्ये ओबीसींची जातनिहाय जणगणना करण्यात यावी, मंडल आयोगाची १00 टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणात २७ टक्के पुर्णत: आरक्षण देण्यात यावे, ओबीसी साठींची घटनाबाह्य नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करावी, इतर जिल्ह्यांप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करावे, शिष्यवृत्ती देण्यात यावी, शासकीय व निमशासकीय पदभरतीत ओबीसींचा समुदेश करण्यात यावा, अनुसूचित जाती व जमाती प्रमाणे ओबीसी शेतकर्‍यांना सवलती देण्यात याव्या, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष(उ) जगदीश उर्फ मोंटु पिलारे, जिल्हा सचिव सुनील पाथोडे, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष सुधीर पिलारे, ब्रम्हपुरी शहराध्यक्ष सोनु नाकतोडे, प्रफुल्ल करंडे, शहर सचिव राकेश शेंडे, मंगल पारधी, धनु नाकतोडे, पराग राऊत, पंकज राऊत, आदीत्य तोंडरे, अवतार नाकतोडे व संभाजी ब्रिगेडचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...