कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन
बीड.दि.04 - राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने राज्यातील विविध संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन उभारले आहे. सर्व जिल्ह्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे ठरवले असून या आंदोलनाचा पहिला टप्पा सर्व कर्मचारी 5 सप्टेंबर पासून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. उद्या शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक या दिवशी काळ्या फिती लावून काम करून शासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे आकर्षित करण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष विष्णू आडे यांनी केले आहे.
यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षकांना आवाहन केले आहे. शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, शिक्षक भारती, उर्दू शिक्षक भरती, शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट,अखिल भारतीय शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक परिषद, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी समन्वय समिती बैठकीस उपस्थित होते.सर्वांनी समन्वय समितीच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचे शिक्षकांना आवाहन केले आहे.5 तारखेपासून काळ्या फिती लावून काम व 9 तारखेला संपात सर्व शिक्षक सहभागी होणार असून संपात सहभागी होत असल्याबाबत पत्र पुढील दोन दिवसात सर्वांनी द्यावे ,असे आवाहन करण्यात आले.
या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी समन्वय समितीच्या बैठकीस आपली हजेरी लावली होती.सर्वांनी समन्वय समितीच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचे शिक्षकांना आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment