Thursday 26 September 2019

शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निंबावासीयांचा निर्णय़

गोरेगाव(मनोज सरोजकर)दि.२६:-येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहगाव तिल्ली केंद्रातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा निंबाच्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदनाव्दारे विनंती करुन सुध्दा या अधिकाऱ्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने (दि.२७) शुक्रवारपासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय आज(दि.२६) गुरुवारला झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
मोहगाव तिल्ली केंद्रातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहली ते ७ वी पर्यंत शिकवणी वर्ग सुरू असुन ११५ पटसंख्या आहे. त्यामुळे ५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत.त्यापैकी दोन सहाय्यक शिक्षक, १ मुख्याध्यापकाचे पद भरण्यात आले.मात्र सहाय्यक शिक्षक डी.आर.मरस्कोल्हे हे कोणत्याही प्रकारची सुचना न देता सतत गैरहजर राहत असल्याने एकट्या सहाय्यक शिक्षकाला पहीली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अनेकदा पंचायत समितीच्या चकरा मारत गटशिक्षणाधिकार्यांंना शिक्षकांची मागणी केली. पण शिक्षक मिळाले नाही, सरतेशेवटी शिक्षणाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून शिक्षकांची मागणी केली. त्यातही अधिका-यांनी दुर्लक्ष केले. शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची मागणी जिल्हा परिषद पुर्ण करीत नाही. तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षकांची मागणी पूर्ण होणार नाही. शाळेत विद्यार्थी जाणार नसल्याने शाळा ही ओसाड पडणार आहे. कार्यरत शिक्षकांना वेळकाढूपणा करावे लागणार आहे. शाळा बंद पडली तरी चालेल परंतु शासन जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती करीत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव शिवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र बहेकार,पालक विजय पटले, संजय शहारे, विजय कोचे,शामलाल कुमडे,देवचंद परसगाये, महादेव बघेले, घनशाम भगत,सुरज मसे, विजय शिवणकर, हिरालाल चनाप, मदनलाल कोंटागले,शिला कोचे,गौतमा जनबंधु, ललिता कोचे, अर्चना साखरे यांनी पत्रकात म्हटले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...