Tuesday, 17 September 2019

अप्पर पोलिस अधीक्षकांची येडमागोंदीला आकस्मिक भेट



देवरी,दि.17- अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या येडमागोंदी या गावाला नुकतीच आकस्मिक भेट दिली.
या अचानक दिलेल्या भेटीत श्री.कुलकर्णी यांनी गावकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचेशी थेट संवाद साधला. आगामी निवडणुकीत मनात कोणतीही भीती न बाळगता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पोलिस आणि जनता यांच्यात थेट संवाद झाला पाहिजे असे सांगताना त्यांनी पोलिस आणि नागरिक यांच्यात मित्रत्वाचे नाते स्थापित करण्यावर भर देत दोघांमधील दुही कमी करण्याचे सुचविले. गावातील विकास आणि असलेल्या समस्यांवरही श्री कुलकर्णी यांनी चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी चिचगडचे ठाणेदार अतुल तवाडे हे सुद्धा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...