
देवरी पोलिसांना खबऱ्याकडून डोंगरगाव परिसरातील रामदेवबाबा ढाब्यावर काही ट्र्क चालक हे कच्चा लोखंड आपल्या ताब्यातील वाहनातून उतरवून विक्री करत असल्याची वार्ता मिळाली, त्यारून गोंदियाचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे आणि देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचे नेतृत्वातील पथकाने सदर धाडीची कार्यवाही केली. यामध्ये कमरुद्दीन शहा यांच्या मालकीच्या रामदेवबाबा ढाब्याच्या मागच्या बाजूला मोहम्मद इलियास याबूब शहा ऊर्फ मामू राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांशी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कच्च्या लोखंडाच्या गोळ्या उतरवितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईत वाहन क्र. एमएच 40 बी जी 8042 मधून 1 लाख 92 हजार 534 रुपये किमतीचे 30 हजार 60 किलो तर वाहन क्र. एमएच बीजी 8045 मधून 1 लाख 90 हजार 676 रुपय़े किमतीचे 29 हजार 770 किलो आणि घटनास्थळावरून 70 हजार 110 रुपये किमतीचे 11 हजार 685 किलो माल असा एकूण 34 लाख 53 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींविरुद्ध देवरी पोलिसात अपराध क्र. 188/19 कलम 379, 420, 407, 34, 109 भादवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment