जनचर्चांनी घेतला वेग
गोंदिया, दि.29 – 66 आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघाची निवडणुक जाहीर होताच प्रतिस्पर्धी उमेदवांना घेऊन अऩेक राजकीय चर्चांनी वेग घेतला आहे. विद्यमान आमदार संजय पुराम यांच्या कथित विडीओ वायरल झाल्यापासून त्यांची तिकीट धोक्यात आल्याचे संकेत भाजपकडून मिळत आहेत. परिणामी, आता भाजपचा उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांना पडला असताना माजी आमदार रामरतन राऊत यांना भाजप गळाला लावत असल्यांच्या चर्चांना ऊत आला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि नामांकन पत्र दाखल करण्याच्या तोंडावर विद्यमान आमदार संजय पुराम यांच्या कथित डांसबार मधील विडिओ वायरल करण्यात आला. यामुळे आ. पुराम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंबंधाने आमदार पुराम यांनी तो ‘मी नव्हेच’ची भूमिका घेत सदर विडीओ बनावट असून विरोधकांनी त्यांची प्रतिमी मलिन करण्याच्या उद्देशाने षडयंत्र रचल्याचा आरोप दोन दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. याविरुद्ध आमदार पुराम यांनी देवरी पोलिसात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. ही एक घटना कमी म्हणून की काय तिकडे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांना सुद्धा विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने पक्षांतर्गतच विरोधकच या आमदारांचा गेम तर करत नसावे ना ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे श्री. पुराम यांची उमेदवारी धोक्या
त आल्याचे संकेत मिळत आहेत. सध्यातरी भाजपच्या वतीने आमदार संजय पुराम हेच आमचे पहिल्या पसंतीचे उमेदवार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर मात्र वेगवेगळी नावे चर्चिली जात आहे. हा प्रकार संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी जाणीवपूर्वक केला जात असल्याचा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे. या उमेदवारीच्या शर्यतीत देवरी तालुक्यातील एका कर्मचाऱ्याचा नाव सुध्दा चर्चेत आले आहे. सदर शिक्षक हा संजय पुराम यांचा कट्टर विरोधक असून सामाजिक क्षेत्राच त्याची चांगली पकड असल्याचे सांगण्यात येते.
कॉंग्रेसच्या वतीने सहसराम कोरोटी यांनी उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत आघाडी घेतल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे नाराज राऊत यांचेवर भाजपने जाळे टाकले आहे. तसेही श्री राऊत कॉग्रेसने तिकीट नाकारल्यास बंडखोरी करणार हे उघड आहे. यापूर्वी सुद्धा अनेक स्थानिक निवडणुकीत स्वपक्षाला राऊत यांनी वाऱ्यावर टाकून भाजपला मदत केल्याचा आरोप त्यांचे जुने सहकारी करीत आहेत. श्री. राऊत यांचेमुळे भाजपला अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये लाभ झाला असून व यापूर्वीसुद्धा श्री राऊत यांचेमुळे श्री भेरसिंग नागपुरे यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली होती, असाही एक मतप्रवाह वाहत आहे. याला भरीसभर म्हणून गोंदियाचे आमदार यांचे पक्षांतर याचेही जोडून पाहिले जात आहे. या सर्वांची उतराई करता यावी सहसराम कोरेटी यांच्या सारख्या तगड्या उमेदवारावर मात करता यावी, यासाठी भाजपचा डोळा श्री राउत यांचेवर असण्याची शक्यता सर्वत्र चर्चिली जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंकडून अधिकृत कोणीही बोलायला तयार नसल्याने चर्चा या चर्चा सुद्धा ठरू शकतात.
दरम्यान, राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षात आघाडी असून जोपर्यंत दोन्ही पक्षातील वरिष्ठ पातळीवरून तिकीट वाटपासंबंधी अधिकृत घोषणा केली जात नाही, तो पर्यंत स्थानिक पातळीवर कोणालाही चर्चा करण्याचे अधिकार अद्यापही मिळाले नाही. असे असताना कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार सहसराम कोरेटी हे मलाच तिकीट मिळाल्याचे सांगून कालपासून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. श्री कोरेटी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोन करून मला तिकीट मिळाळ्याचे सांगत आपल्याला बैठकीला यायचे आहे असा संदेश दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्री प्रफुल पटेल यांचे कडे तक्रार केली असून उमेदवारी संबंधाने अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याने श्री कोरेटी यांच्या वर्तनावर तीव्र हरकत घेतल्याची माहिती आहे. हा पक्षांतर्गत शिस्त भंगाचा प्रकार असून या प्रकारामुळे कोरेटी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment