Wednesday 29 January 2020

शेडेपार शाळेत दोन स्नेहसंमेलनाचे आयोजन

देवरी,जि.29- गणतंत्र दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील शेडेपार येथील जिल्हा परिषद शाळे, दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यश्र इश्वरदास हटवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे उपाध्यक्ष रंजना सरजारे यांचेसह इतर सदस्य उपस्थित होते.
 या समेलनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्पर्धा व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या.  तसेच संगीत खुर्ची, चमचा गोळी पोता दौड या स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान, महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. 
 याशिवाय  विद्यार्थ्यांसह गावकऱ्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन  एम के चव्हाण सर यांनी केले. उपस्थितांचे आभार डी डी उईके यांनी मानले
 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक  अरविंद नंदगावळी,ए व्ही मेश्राम, खंगार मॅडम, निखाडे मॅडम आदींनी सहकार्य केले  

Friday 24 January 2020

देवरी येथे कॉंग्रेसचा महिला मेळावा संपन्न

देवरी, दि.24-  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका शाखेच्या वतीने काल गुरूवारी एका भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदार सहसराम कोरेटे यांचा सत्कारही करण्यात आला.
कोरेटे भवनात आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यत्र तथा जिप सदस्य उषा शहारे ह्या होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार कोरेटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सीमा कोरेटे,  जिप सदस्य माधुरी कुंभरे,माजी पंस उपसभापती संगीता भेलावे, पंस सदस्य अर्चना ताराम,  माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन,तालुका राष्ट्रवादी महिलाध्यक्ष पारबता चांदेवार, सुभद्रा अगळे, प्रमिला उपराडे, छब्बू उके, अरुणा बहेकार. देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित आमदारांचा शालव श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थि त होत्या.




संसदीय समितीतील महाराष्ट्रातील चार पैकी तीन खासदार गैरहजर

नागपूर,दि.24 : सध्याची केंद्राची पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची असल्याने त्यात सुधारणा करावी, अशी सूचना विदर्भातील शेतकरी व त्यांच्या संघटनांच्या नेत्यांनी सांसदीय समितीकडे केली.सांसदीय समितीतील ३१ पैकी फक्त ११ सदस्यच नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या समितीत राज्यातील चार खासदारांचा समावेश आहे. यापैकी अमरावतीच्या नवनीत राणा यांचा अपवाद सोडला तर नारायण राणे (भाजप), विनायक राऊत (सेना) आणि अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) हे गैरहजर होते.
केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेबाबत शेतकरी आणि शेतकरी नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी खासदार पर्वतगौडा यांच्या नेतृत्वात ११ सदस्यीय सांसदयीय समिती आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर नागपूरला आली आहे. या समितीशी शेतकरी नेते विजय जावंधिया, माकपचे सतीश नवले, भाकपचे श्री. क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष  पाशा पटेल, नितीन राऊत,अविनाश काकडे आणि किशोर तिवारी आदी नेत्यांनी चर्चा केली. प्रमुख मुद्दा हा पीक विमा योजना हाच होता व ती शेतकऱ्यांच्या हिताची नाही तर कंपन्यांच्या फायद्याची आहे, असे या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या उदाहरणासह समिती सदस्यांना पटवून दिले. या योजनेतील त्रूटी दूर करून संपूर्ण शेतकऱ्यांना ती लागू करावी व विम्याची रक्कम सरकारने भरावी, अशी मागणी या नेत्यांनी समितीकडे केली. समितीच्या एका सदस्याने पीक विम्याच्या नियमात बदल करून ती योजना राजस्थानमध्ये राबवल्याची माहिती दिली. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने ती राबवावी, अशी मागणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे विजय जावंधिया यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या हत्याच असल्याचा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला. या समितीच्या दिवसभर बैठका झाल्या. येथील राष्ट्रीय कृषी संस्थांना ते शुक्रवारी भेट देणार आहेत.

शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढली

नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारने तडकाफडकी हटविली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रा तील सत्ताबदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या बाबतीत असे काहीही झालेले नाही. पवारांची सुरक्षा काढण्याचे कुठलेही कारण सरकारने दिलेले नाही, असे दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

शिक्षण सभापती अंबुुले चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात

गोंदिया,दि.24ः-गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांना आज(दि.24)दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात कार्यालयीन काम करीत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखानी चौकशीसाठी आपल्यासोबत नेल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे.दरम्यान अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

Wednesday 22 January 2020

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा.

 महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड चे वतीने निवडणूक  अधिकाऱ्यांना निवेदन. 

 गेवराई,दि.22 : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कार्यातून जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करून त्याऐवजी इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी,अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीडचे वतीने निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
 निवडणूक निर्वाचन विभागाने निवडणूक संबंधित कार्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यात कार्यरत असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ म्हणून नेमणूक देण्यात आलेल्या आहेत.
शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शिक्षकांना निवडणूक व जनगणना या राष्ट्रीय कार्याशिवाय इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत, तसेच मा.उच्च न्यायालयाने सुद्धा रिट याचिकेसंदर्भात निकाल देतांना स्पष्ट केले आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सुद्धा पत्र काढून जाहीर केलेले असताना वर्षात वारंवार मतदार याद्यांची कामे शिक्षकांवर सोपविण्यात येतात, तसेच सध्या हायब्रीड बीएलओ ॲप वर माहिती भरण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करावी लागत असल्याने दोन महिन्यांपासून जिप शिक्षक शाळा व विद्यार्थ्यांपासून दूर आहेत.  एवढेच नव्हे तर मोठ्या शाळेवरील दोन-दोन शिक्षकांना आणि द्विशिक्षकी शाळेमधील एका शिक्षकाला अशा नेमणुका दिल्यामुळे शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत.
दोन दिवसापूर्वी अहमदनगर,परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना बीएलओ च्या कामातून मुक्त केले आहे, त्यामुळे शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार विचार-विनिमय करून व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओची कामे रद्द करून कार्यमुक्त करावे, अशा आशयाचे निवेदन निवडणूक विभागाला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन बीड चे वतीने देण्यात आले.
   असे असताना शिक्षण विभागात गेल्या आठ महिन्यांपासून वरिष्ठ वेतन श्रेणी, स्थायित्व यादी, हिंदी मराठी भाषा सूट यादी, उच्च शिक्षण परीक्षा परवानगी, मेडिकल बिल इत्यादी फाईली धूळ खात पडल्या आहेत. मात्र अद्याप पर्यंत कोणतेच प्रकरण निकाली काढण्यात आले नाही. याबाबत शिक्षकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. जानेवारी महिना अखेर पर्यंत वरील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन बीड चे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष श्री विष्णु आडे, राज्य सहकोषाध्यक्ष श्री कैलास आरबड, राज्य समन्वयक श्री प्रशांत सुरवासे, लिंबाजी सोणपसरे राज्य प्रवक्ते श्री शिवाजी खुडे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सर्जेराव चव्हाण, विशाल घोलप, अण्णासाहेब घोडके,  जितेंद्र औतने,प्रकाश मुंढे,राहुल उंडाळे,अजय पवार, भूषण टेके, नितीन फसले, सोनाजी बनकर, मुकुंद रसाळ,महेश पघळ,हनुमान होके,दयावान कुटे, भिवराज कोकणे,अतीस गाढवे,सुनील वारे,आनंद सरवदे,जावेद शेख,शेख मुख्तार,रावसाहेब तिडके, तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र दहिफळे,माणिक राठोड,विकास खेडकर,अमोल काळे, अशोक भोजने, राहुल काकणाळे, श्री पवार,मुकेश शिंदे, रमेश रुद्रे, नारायण नरसाळे, आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

मिसीपिर्री येथे पहिली कार्यशाळा आज संपन्न

देवरी,दि. 22 - देवरी पंचायत समितीच्या कृषीविभागामार्फत तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिक आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या श्रृंखलेमध्ये आज तालुक्यातील मिसिपिर्री ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिप सदस्य माधुरी कुंभरे यांचे अध्यक्षतेत देवरी आमगाव विधानसभेचे सदस्य सहसराम कोरेटे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती गणे श सोनबोईर, मिसपिर्रीचे सरपंच कुंभरे, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी वाघमारे, उमेद विभागाचे येटरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
संचलन विस्तार अधिकारी व्ही एस बोकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषी विस्तार अधिकारी चुंचुवार यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणांची निवड, किटकनाशके आणि खते माफक दरात आणि योग्य निवज, निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी आणि पिक पद्धतीत बदल या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळा पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आल्या आहेत. पुराडा (पुराडा जि.प.सर्कल), मुरदोली (गोटाबोडी जि.प.सर्कल),  म्हैसुली (भर्रेगाव जि.प.सर्कल),आणि आंभोरा (चिचगड जि.प. सर्कल) येथे अनुक्रमे 23, 28, 29 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. तरी या कार्यशाळांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देवरीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांनी केले आहे.

अखेर त्या बेपत्ता युवकाचा मृत्यूदेह आढळला


देवरी प्रतिनिधी,दि.22- गेल्या 16 जानेवारी रोजी उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असेलला युवक अचानक मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झाला होता. त्या युवकाचे प्रेत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धुकेश्वरी तलावात आज सकाळी आढळून आला. देवरी पोलिसात मर्ग दाखल असून पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शाखाली सुरू आहे.
मृताचे नाव विजय यशवंत भेलावे (वय 38) राहणार वॉर्ड क्र. 15 देवरी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा पोटाच्या आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे उपचारासाठी कुटुंबीयांनी त्याला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या 16 तारखेच्या मध्यरात्री विजय हा दवाखान्यातून बेपत्ता झाल्याची फिर्याद  विजयच्या कुटुंबीयांनी देवरी पोलिसात दाखल केली होती. आज सकाळी विजयच्या मृतदेह शहरातील धुकेश्वरी तलावात तरंगताना दिसला. मृत विजयच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आप्तेष्ट आहेत, मृतदेहाटी उत्तरीय तपासणी करून शव कुटंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.


जंगल सफारीसाठी पर्यटकांना आकर्षित करतोय पितांबरटोला गेट


गोंदिया,दि.22ः- राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर देवरी नजिक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील पितांबरटोला गेट हे वन्यजीवप्रेमी व जंगल सफारीची आवड असणाèया पर्यटकांसाठी फारच सोयीस्कर ठरत आहे. विविध प्रकारच्या प्रजातींच्या वृक्षांनी आच्छादलेल्या घनदाट जंगलातून भ्रंमती करीत असताना वेगळाच आनंद व अनुभव प्राप्त होतो. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के तर भंडारा जिल्ह्यात ३० टक्के जागेत व्यापला आहे. प्रवेशासाठी एकूण ९ गेट असून त्यापैकीच एक पितांबरटोला गेट हे २०१३-१४ पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागपूर-रायपूरच्या दिशेने प्रवास करणाèया प्रवाशांसाठी एकदा तरी या गेटमधून जंगल सफारीचा आनंद घेतला तर परत या ठिकाणी येण्याचा मोह आवरता येणार नाही, हे निश्चितच.
राज्यातील सहापैकी ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-न्यु नागझिरा व बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. नागपूर हे या व्याघ्रभूमीचे प्रवेशद्वार आहे. विदर्भात जंगलाची विपुलता आहे. विदर्भात मोहफूल, तेंदुपत्ता गोळा करताना स्थानिकांकडून काही भागांत आगी लावल्या जातात. त्यामुळे वन्यजिवांवर त्याचा परिणाम पडतो आणि वन्यजिव हे जंगलानजिकच्या गावाकडे धाव घेतात.गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-न्यु नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचा विचार केल्यास ९ प्रवेशद्वार आहेत.त्यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला लागून असलेला देवरी तालुक्यातील पितांबरटोला हा प्रवेशद्वार हळूहळू पर्यटकांच्या जंगल सफारीचा केंद्र होऊ लागलेला आहे.
या व्याघ्रप्रकल्पात गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांसह विविध जातीच्या फुलपाखरांची संख्या वाढत असल्याने ते सुध्दा पर्यटकांना आकर्षित करीत आहे.पिताबंरटोला हे प्रवेशद्वार तर जंगलसफारीसाठी उत्तम असल्याचे काही पर्यटकांचेच नव्हे तर प्रत्यक्ष भेट दिल्यावरही जाणवते.विविध प्रजातींच्या झाडे बघण्याची संधी पर्यटकांना मिळते. सोबतच बिबट, रानगवेसारखे वन्यप्राण्याची सकाळच्या सफारीच्या दरम्यान प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच होणारे दर्शन पर्यटकांना पुन्हा येण्याचे संकेत देणारे असतात. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या उसंचालिका पुनम पाटे यांनी सांगितले की येत्या काही वर्षात गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे पर्यंटकांसाठी मोठे महत्वाचे ठरणार असून नागझिरा व कोका जंगलात वाघांची वाढती संख्या आणि नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गाला विभागून असलेल्या या अभयारण्यातील पिताबंरटोला हे प्रवेशद्वार छत्तीसगडच्या पर्यटकांसाठी महत्वाचे ठरणार आहे. तर या प्रवेशद्वार असलेल्या भागाचे सहा. वनसंरक्षक प्रदप पाटील यांनी सांगितले की, गेल्या दोन तीन वर्षात या प्रवेशद्वार परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होर्डींगच्या माध्यमातून पर्यटकांना माहिती दिली जात आहे, त्यासाठी या गावातील स्थानिक युवक जे गाईड म्हणून याठिकाणी कार्यरत आहेत,त्यांची महत्वाची भूमिका आहे. गावातील नागरिकांनीही इकोटुरिझमला महत्व देण्यास सुरवात केल्याने आणि वन्यप्राण्यांच्या सरक्षणासाठीही सहकार्य करु लागल्याने आजच्या घडीला या भागात ७ ते८ बिबट, १०-१२ अस्वल आणि ३०-३५ च्या संख्येत रागनवे असून इतर वन्यप्राण्यांचीही मोठी संख्या आहे. प्रवेशद्वाराशेजारील भागातच पर्यटकांना बिबट्याचे दर्शन मात्र हमखास होत असल्याने छतिसगडच्या पर्यटकांची हे प्रवेशद्वार पसंतीला उतरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वन विभागाने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्या निमित्ताने पितांबरटोला गेटवर जाण्याचा व वनभ्रंमतीचा योग जुळून आला.वनपरिक्षेत्राधिकारी बालाजी दिघोले यांनी व्याघ्रप्रकल्पाच्या पाहणीदरम्यान विविध माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी २ किमी अंतरावर पितांबरटोला या छोट्याश्या गावाजवळ हे गेट आहे. वनभ्रंमतीसाठी निघालो तेव्हा सफारीच्या नियोजित वेळेपेक्षा उशिर झाला होता. तरी या नविन गेट मधून जंगल भ्रंमतीचा उत्साह व जिज्ञासा होती. प्रत्येक जण वाहनातून जंगलाकडे निहारत होता. कोणता वन्यप्राणी तर दिसत नाही, याकडे सगळयाची नजर लागून होती. तरी मात्र या सर्व गोष्टीत या परिसरातील जंगल फारच सुंदर व वेड लावणारे होते. वाहनात आमच्या सोबत वनरक्षक कांचन कावळे व याठिकाणी असलेल्या प्रशिक्षित गाईड यांनी जंगलाची माहिती देत पर्यटकांसाठी कसे महत्वाचे प्रवेशद्वार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. या जंगलात मोठया प्रमाणात असलेल्या मोह व संजीवनी बुटी म्हणजेच करू वृक्ष व इतर वृक्षांची माहिती देत होते. वाघ, बिबट, अस्वल यांना कोणते वृक्ष आवडतात, वनाला आगीपासून बचावासाठी उपाययोजना व इतर अशी बरीच वैज्ञानिक कारण असलेली माहिती त्यांनी दिली.

22 ते 28 जानेवारी 2020 बेरार टाईम्स अंक click berartimes.com





Tuesday 21 January 2020

आदिवासी गोवारी जमात मिशन देवरी महिला आघाडी च्या वतीने हळदीकुंकू

देवरी: २२
आदिवासी गोवारी जमात मिशन देवरी महिला आघाडी च्या वतीने दि. 18 जाने. ला सावित्रीमाई फुले व राष्र्टमाता जिजाऊ जयंती निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी पुष्पा सरवरे तर उदघाटक म्हणुन ज्ञानेश्वरी सखरे होत्या.मेळाव्याला प्रा.सुनंदा भुरे यांनी अंधश्रद्धेवर ,प्रा. नम्रता सुर्यवंशी यांनी आदि.गोवारी जमातीची दशा दिशा व संघर्ष तसेच संस्कृती शिक्षणाचे महत्व सांगितले.प्रा.सुषमा चांदेवार यांनी सावित्री आणि जिजाऊ यांचे राष्र्टनिर्मिती साठी योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले.संचलन अनिता फुन्ने तर आभार ममता वगारे यानी केले .यावेळी महिलांकडुन उखाणे सादर करण्यात आले.यासाठी पुनम वाघाडे,सुषमा गजबे.गुणवंता शहारे,शिला फुन्ने,मंदा नागोसे,मिना राउत प्रभा काळसर्पे,सुषमा ठाकरे,मनिषा चौधरी,ज्योती नेवारे,बेबी शहारे,जसवंता काळसर्पे,मोनाली ठाकरे,सरिता फदाले,मिरा शहारे,प्रभा फुन्ने,पुष्पा वाघाडे,प्रिया राऊत,पुष्पा काळसर्पे,प्रणाली भोंडे,ज्योती नेवारे,जया शहारे .उषा कोहळे,व इतर महिलांनी सहकार्य केले.

भाजप महीला आघाडी तर्फे हळदीकुंकु च्या कार्यक्रमाचे आयोजन



देवरी:22: तालुका महीला भाजपा आघाडी तर्फे शहरातील भाजप कार्यालयात हजारो महीलांच्या उपस्थितित महीलानीं हळदी कुंकुचा कार्यक्रम साजरा केला.
या कार्यक्रमाप्रसंगी अद्यक्ष म्हनुन सौ.सविता पुराम, व प्रमुख अतिथी म्हनुन महीला आघाडी तालुका अद्यक्ष सौ.नुतन कोये,नगरपंचायत अद्यक्षा श्रीमती  कौशल्या बाई कुंभरे,प्रद्नाताई संगीडवार,मायाताई निर्वान,सुनंदाताई बहेकार,देवकीताई मरई,व हजारो महीला कार्यकर्ते उपस्थित होत्या.
 कार्यक्रमाप्रसंगी महीलानां मार्गदर्शन करतानीं सौ.सविता पुराम यानीं पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वानाच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया मकरसंक्रांतीनिमित्त सविता पुराम यानीं कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. मकरसंक्रांतीनिमित्त आसपासच्या तसेच परिचयाच्या स्त्रियांना घरी बोलावून हळदीकुंकू आणि तिळगूळ देऊन वाण वाटण्याची प्रथा आजही सुरूच आहे. फरक केवळ एवढाच की आधुनिक युगात ही प्रथासुद्धा आधुनिक झाली आहे. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकरसंक्रांतीनिमित्त दोन क्षण विरंगुळ्याचे मिळाल्याने त्यासुद्धा यात उत्साहाने सहभागी होत असतात. घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत पेलताना बरेचदा तिला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी वर्षातून एकदा तरी येणारी मकरसंक्रींत त्यांना विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणारी ठरते. घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे असे कार्यक्रमाप्रसंगी पुराम यानीं सांगीतले.
 याच कार्यक्रमाप्रसंगी महीला आघाडी तालुका अद्यक्षा नुतन कोये यानीं कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करतानीं सांगीतले की अनेक महिला मंडळ हळदीकुंकवाच्या निमित्ताने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमही राबवतात. पूर्वी हळदीकुंकवासोबतच वाण म्हणून मातीचे सुगडे, हिरव्या बांगड्या, काळे मणी, जोडवे ही सौभाग्य लेणी दिली जात होती. आता यात बराच बदल झाला आहे. प्लॅस्टिक व स्टीलच्या वाट्या, प्लेट ,चमचे, प्लॅस्टिकच्या बरण्या, डबे तसेच पावडरचे डबे, शॉम्पूची पाकीटं, साबण, रुमाल यासारख्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू देण्याकडे स्त्रियांचा अधिक कल दिसून येतो. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सर्व भाजप महीला आघाडी च्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतला.

Friday 17 January 2020

केंद्रस्तरीय क्रीडा समेंलनाचे चिल्हाटीत उदघाटन

ककोडी(देवरी),दि.17ः देवरी तालुक्यातील चिल्हाटी (ककोडी) येथे तिन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन(दि.16) करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सहषराम कोरोटे यांचा हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई कुभंरे,पंचायत समिती सभापती सुनंदाताई बहेकार, उप सभापती गणेश सोनबोईर,सरपंच ईमलाबाई बडाबाग, ग्राम पंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.आमदार कोरेटेनी आपल्या भाषणात शासनाने शेतकरीकरीता सिंचन व्यवस्थेकडे लक्ष दिले असून सरसकट कर्ज माफी (दोन लाख रुपयांची) करीत बेरोजगारी दुर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केल्याचा उल्लेख केला. तसेच माधुरीताई कुंभरे यांनी हे समेंलन विद्यार्थ्यासाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगतिले.या समेलनाचा समारोप उद्या(दि.18)होणार आहे.

Wednesday 15 January 2020

ओझा, द प्रिस्ट ऑफ ट्रायबल हे लघुचित्रपट आदिवासी संस्कृती साठी पोषक

देवरी15 : अतिदुर्गम, जंगलाने व्याप्त,आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या चिचगड परिसरातील आदिवासी संस्कृती मधील वनोपौषधी,आयुर्वेदिक उपचार पद्धती पासून मानवाची सेवा करणाऱ्या ओझा, म्हणजेच आदिवासी पुजारी यांचे वर एक लघुचित्रपट शा. आ. मुलांचे आणि मुलींचे वसतीगृह चिचगड येथील गृहपाल किशोर देशकर आणि कुमुद देशकर यांनी चित्रित केलेला लघु चित्रपट प्रकाशित केलेला आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट म्हैसूली(चिचगड)नावाच्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावखेड्या मध्ये चित्रित करण्यात आलेला असुन हा  लघुचित्रपट पूणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येथे सुध्दा पाठविण्यात आलेला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज कोवे असून निर्माता कुमुद देशकर, लेखक आणि प्रस्तुतकर्ता किशोर देशकर आहेत. या लघुचित्रपटामधील सर्व कलाकार स्थानिक आहेत.

15 ते 21 जानेवारी 2020 बेरार टाईम्स अंक click berartimes.com





सत्यशोधक पध्दतीने लग्न सोहळा,भेटवस्तुंची रक्कम शिष्यवृत्ती निधीत



जेंगठे व गायकवाड कुटुबियांच्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा
ब्रम्हपुरी(खेमेंद्र कटरे)दि.15- लग्न हा ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. कुणी ही आठवण संस्मरणीय करण्यासाठी ढगांच्या निळाईच्या रंगात विवाहाच्या आणाभाका घेतात तर कुणी लग्न करतो,ते अथांग पाण्याच्या खोलीत जलराजाच्या साक्षीने विवाहाचा स्विकार करतात.तर कुणी पैसाचा अखंड चुराडा करत अनेक राजेशाही जेवणाच्या फैरी झाडत विवाह बंधन स्विकारतात. प्रश्न ज्याचा त्याचा आणि आवड ज्याची त्याची!पण या सगळ्या गोष्टिंना फाटा देत वैचारिकतेचा वारसा जपत समाजाच्या जाचक रुढींना फाटा देत एक अनोखे लग्न नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे ११ जानेवारीला पार पडले.ज्यामध्ये वधूपक्षाच्या समंतीने विवाहसोहळ्यात होणारा सर्व खर्च आणि विवाह सोहळ्यात आलेली रक्कम ही शिष्यवृत्ती निधी म्हणून गोळा करुन गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला गेल्याने या सोहळ्याची चर्चा सोबतच प्रशंसाही केली जाऊ लागली आहे.
शंशाक ज्योती नामदेवराव जेंगठे(ब्रम्हपुरी) आणि कांचन ज्योती दत्तात्रय गायकवाड(औरगांबाद)या अमेरीकेत अभियंत्याची नोकरी करीत असलेल्या जोडप्याने व त्यांची आईवडिलांनी लग्नावर लाखो रुपयांचा खर्च करण्याची स्पर्धा सुरु असतानाच या जोडप्याचे ङ्कसत्यशोधक पध्दतीनेङ्क विवाह करत जात,धर्म,जाचक रुढी,परंपरा,रिती-रिवाज यांच्या काळानुरूप बदल करत समाजाला नवा मार्ग दाखविला आहे.या विवाहसोहळ्याच्या सभागृहातील प्रवेशद्वारावरच नागभीड तालुक्यातील झाडबोरी येथील आशिष चौधरी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा आकर्षणाची केंद्र ठरली होती.विवाहसोहळ्यात येणाèया प्रत्येकाला ही रांगोळी नवा संदेश देत होती.विवाहाच्या सुरवातीलाच वधु व वरपक्षाच्यावतीने प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती निधीकरीता असलेल्या पेटीत टाकले.विशेष म्हणजे ज्यांनी वधुवरांना भेट देण्यासाठी वस्तु आणल्या त्या सर्वांना नम्रपुर्वक परत करण्यात आल्या,तर ज्यांनी रोखरक्कमेचे पॅकेट आणले ते पॅकेट स्वतःन स्विकारता ते शिष्यवृत्ती मदत पेटीत स्वतःच भेटकत्र्याला टाकायला सांगत वधुवरांना फक्त आशिर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते.हा विवाह सोहळा जुन्या चालिरीतांना फाटा देत महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पध्दतीने लावण्यात आला हे विशेष होते.त्यातच या विवाहसोहळ्याला आलेल्या प्रतिष्ठित सामाजिक व्यqक्तचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सर्व प्रकाराने या सोहळ्याची मात्र सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
या लग्नाची सुरवात क्रांतीसुर्य महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. या लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या प्रियजनांना ओबीसी सत्यशोधक चळवळीतील विचारवंत असलेले प्रा.नामदेवराव जेंगठे लिखित सत्यशोधक विवाह पध्दती ही पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आली.मंगलकार्यालयाच्या दोन्ही बाजूला धर्म माणुसकी जात मानवतेचा संदेश विवाह सोहळ्यास येणाèया मित्र परिवारांना देणारे.हसतमुख जोडप्यांच्या पालकांचे कटआऊट्स पण सहजपणे मोठे विचार मांडणारे होते.सत्यशोधक विचार समाजाला देणाèया फुले दाम्पत्याची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा समतेचा आणि माणुसकीचा पुरस्कार करणारीच होती.समाजाचा विकास आणि वैचारीक परिवर्तन करण्यासाठी हे पालकांनी उचलेल्या पावलांना या तरुण पिढीकडून मिळालेले बळ,याचे खरचं कौतूक वाटते!महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी सत्यशोधक विचारातून काळाप्रमाणे बदल घडविण्यास स्वत:पासून सुरवात करणाèया या जोडप्यास तसेच।उत्तरोत्तर अशीच मानवतेची सेवा करण्यासाठीत्यांच्या सहजीवनासाठी शुभेच्छा!
या कार्यक्रमाला बहुजन संघर्षंचे संपादक नागेश चौधरी,पुष्पा चौधरी,प्रमोद मुन,शरद वानखेडे,पांडुरंग काकडे,गोविंद वरवाडे,ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुल देशकर,माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या,प्राचार्य एन.एस.कोकोडे,अ‍ॅड गोविंद भेंडारकर,प्रा.श्याम झाडे,वामनराव वझाडे,गिरधर लडके,दिगबंर पारधी,भाऊराव राऊतसह आदी गणमान्य मंडळीची उपस्थिती लाभली होती.

Tuesday 14 January 2020

सूविधा केंद्रासंदर्भात शिक्षक समितीचे तहसीलदारांना निवेदन

20 जानेवारीला 11 केंद्रावर सेतूकेंद्र लावण्याचे आश्वासन
गोंदिया,दि.14 :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरी तर्फे तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरीता लागणारा जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला संदर्भात केंद्रनिहाय सूविधा केंद्र आयोजित करण्याची  मागणी केली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत  ओबीसी, व्हीजेएनटी  1 ते 10 पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती लागू केली आहे. त्या अंतर्गत लागणारा जातीचा दाखला व उत्पन्नाच्या दाखल्याकरिता विद्यार्थी ,पालक व शिक्षकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत आहे  तसेच पालकांना आर्थिक भुर्दंड सुद्धा बसत आहे  यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा  देवरीच्या  शिष्टमंडळाने तहसीलदार विजय बोरुडे  यांना भेटून 11 केंद्रात शिबिर  आयोजित करण्याची  मागणी केली. दरम्यान तहसीलदार बोरुडे यांनी  शिक्षक समितीच्या  निवेदनाची दखल घेत  देवरी अंतर्गत येणाऱ्या 11  केंद्रावर  20 जानेवारीला शिबिर आयोजित केले आहे. या  शिबिराचा फायदा  तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा  व त्याकरिता लागणारे दस्तावेज  जमा करण्याकरता  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात असे आवाहन  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखेतर्फे करण्यात आले. यावेळी  समितीचे तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, सरचिटणीस विनोद बहेकार, जिल्हासहसचिव संदीप तिडके, जिल्हा उपाध्यक्ष जी. एम. बैस, राहुल गणवीर, जिल्हा प्रतिनिधी मिथुन चव्हाण उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार- सहसराम कोरेटे

देवरी तालुक्यातील मुल्ला येथे एका कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना आमदार कोरेटे
देवरी,दि.14- आपल्या आशीर्वादाने मी राज्याच्या विधानसभेत पोचलो. मी खोटी आश्वासने देणार नाही. कोणत्याही कामाचे कार्यारंभ आदेश असल्याशिवाय भूमिपूजन करणे हा माझा स्वभाव नाही. मात्र, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कामासाठी मी सदैव झिजत राहीन, सिंचनाच्या कामांना माझे प्राधान्य राहील. आपण मला आमदार केले. आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन देवरी आमगाव विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त आमदार सहसराम कोरेटे यांनी गेल्या रविवारी (दि.12) केले.
ते तालुक्यातील मुल्ला येथे आयोजित एका सत्कार समारंभात आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंह पवार हे होते. मंचावर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष तथा जि.प.सदस्य उषा शहारे, माजी पंचायत समिती सभापती वसंत पुराम, मुल्लाच्या उपसरपंच सीमा मडावी, गावतंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ गौपाले, ग्रा.पं.सदस्य चंदन घासले, सेवानिवृत्त शिक्षख दिलीप श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच सीमा नाईक यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे संचालन नंदू वंजारी यांनी केले. उपस्थितांचे आभार बागडे यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 12 January 2020

ब्लॉसम महोत्सव 2020 थाटात साजरा

देवरी: 12
आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात दर्जेदार, कृतीयुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये 11 वे ब्लॉसम महोत्सव 2020 थाटात पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी देवरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार कमलेश बच्छाव, कॅनरा बँकचे सहाय्यक मॅनेजर विवेक पटले, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, प्राचार्य डॉ सुजित टेटे आदी मंचावर उपस्थित होते.
3 दिवशीय महोत्सवामध्ये विज्ञान प्रदर्शन, गणित, मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र, कार्यानुभव आदी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. विविध लोकनृत्य आणि सामाजिक, सांस्कृतिक संदेश देणारे नृत्य प्रदर्शन साजरे करण्यात आले.
विशेष म्हणजे या मंचावर ब्लॉसम सुपर मॉम आणि सुपर डॅड या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये पालकांनी आपली नृत्यकला प्रदर्शित केली आणि सर्वांचे मन मोहून घेतले.
यामध्ये सरिता थोटे प्रथम, मेघा काळे द्वितीय, सुपर डॅड मध्ये किशोर देशकर प्रथम, जितेंद्र काणतोडे द्वितीय, प्रमोद कळमकर तृतीय क्रमांक पटकावला.ब्लॉसम महोत्सव २०२० चे परीक्षण डान्स विदर्भ डान्स चे अध्यक्ष आशीष धुर्वे आणि प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले.
गरबा स्पर्धेत पल्लवी खंडाईत प्रथम, रांगोळी स्पर्धेत ज्योती टेम्भरे प्रथम , दिवाळी स्पर्धेत योगिता शहारे प्रथम आले असून या सर्वांच्या प्राचार्य डॉ सुजित टेटे सर सर्वमान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून राम गायधने, अवनिशकुमार झा, सुरेश भदाडे, मुकेश खरोले, निर्मल अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले , वैशाली टेटे, विश्वाप्रित निकोडे यांनी केले असून शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

Saturday 11 January 2020

भाजपचे उत्पन्न तब्बल 134 टक्क्यांनी वाढले


BJP's income 2018-19 of Rs 2410 crore | भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी


नवीदिल्ली,दि.11-  भारतीय जनता पक्षाचे वर्ष 2018-19 वर्षासाठीचे उत्पन्न 2 हजार 410 कोटी, तर 2017-18 वर्षात ते 1027 कोटी रुपये होते. उत्पन्न वाढीचा हा वेग तब्बल 134 टक्के आहे.
 2018-19 वर्षासाठीच्या आपल्या वार्षिक अंकेक्षणात भाजपने हे उत्पन्न घोषित केले असून निवडणूक आयोगाकडेही हा अहवाल सादर केला आहे. त्याच म्हटले आहे की, या उत्पन्नात 1 हजार 450 कोटी रुपये हे इलेक्टोरल बाँडद्वारे मिळालेले आहेत.
भाजपने 2017-18 वर्षात 210 कोटी रुपये इलेक्टोरल बॉडद्वारे  मिळाल्याचे म्हटले होते. 2018-2019 वर्षात एकूण खर्च हा 1 हजार 5 कोटी रुपये झाल्याचे पक्षाने म्हटले. 2017-18 वर्षात हा खर्च 758 कोटी रुपये होता. खर्चातील ही वाढ  तब्बल 34 टक्के आहे. काँग्रेसला 2018-19 वर्षात 918 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले तर 470 कोटी रुपये खर्च झाला, असे अंकेक्षण अहवालात म्हटले आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 2018-19 वर्षात काँग्रेसला 383 कोटी रुपये इलेक्टोरल बाँडद्वारे मिळाले. 2017-18 वर्षात काँग्रेसला या बाँडद्वारे अवघे पाच कोटी मिळाले होते.
वर्षा 2018-19 वर्षासाठीचा वार्षिक उत्पन्न व खर्चाचा तपशील भाजपने 31 मार्च 2019 रोजी दाखल केला असून त्यात 2 हजार 410 कोटी रुपये शुल्क आणि वर्गणीतून1कोटी89 लाख रुपये मिळाले आहेत. ऐच्छिक योगदान (इलेक्टोरल बाँडसह 2 हजार 354 कोटी रुपये बँकेतून मिळालेले व्याज 54 कोटी आणि उतर उत्पन्न 24 लाख रुपये. ऐच्छिक योगदानातून म्हणजे आजीवन सहयोग निधीतून 24 कोटी 64 लाख रुपये, मोर्चे व बैठकांतून अनुक्रमे 68 आणि 93 लाख रुपये इलेक्टोरल बाँडद्वारे. 1 हजार 450 कोटी 89 लाख आणि इतर योगदानातून 876 कोटी 87 लाख रुपये मिळाल्याचे भाजपने म्हटले आहे.

Friday 10 January 2020

लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दि. 10 : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणीसाठा वापराबरोबरच गरजे एवढ्या पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणीविषयक योजनांचा समन्वय करुन पाण्याचे नियोजन करण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्हा आढावा बैठकीत दिली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे सर्वश्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर उपस्थित होते.
बैठकीत आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लातूर जिल्ह्यातील विविध समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने उदगीर येथील प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत तसेच एमआयडीसी उभारण्याबाबत, बोरचुरी गावातील तेरू धरण प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न, उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथील पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणे आणि उदगीर येथे आरटीओचे उपकार्यालय उभारणी करणे, याबरोबरच देवणी गायीच्या वंशसंवर्धनासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय संशोधन केंद्र अथवा महाविद्यालयाची मागणी यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी माता रमाई सिंचन योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याची मागणी केली. तसेच लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी नवीन इमारती बांधण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर निधी मिळावा आणि आरोग्य विभागाच्या उर्वरित राहिलेल्या कामासाठी शासनाकडून वेळेत निधी प्राप्त व्हावा याही मागण्या केल्या. त्याचबरोबरच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणंद रस्ते निर्मितीसाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. लातूर जिल्ह्यातील गायरान जमिनीवर ‘सामाजिक वनीकरण’ मार्फत वृक्ष लागवड आदी संदर्भात मागणी केली.
आमदार अभिमन्यू पवार यांनी भूकंपग्रस्त ठिकाणी कुटुंबातील वाढलेल्या सदस्यांप्रमाणे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी. या ठिकाणी घरकुलांसाठी शासनामार्फत मदत व्हावी. या बरोबरच कारला व कुमठा या गावांचा भूकंप पुनर्वसनात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी फळबागाप्रमाणे भाजीपाला नुकसान भरपाई मिळावी तसेच औसा येथील खादी ग्राम उद्योग व्यवसाय प्रकल्प पूर्ववत सुरू करण्याची मागणी श्री.पवार यांनी केली. स्मशानभूमीसाठी शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर येथील विमानतळावरील धावपट्टीची दुरुस्ती करणे, कासारशिरसी याठिकाणी प्रशासकीय कामकाजासाठी आठवड्यातून तीन दिवस तहसिल कार्यालयाची मागणी केली. लातूर जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेल्या संदर्भाची माहिती यावेळी दिली.
बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या प्रश्नांवर निर्देश देताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, वर्षानुवर्षे जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या समस्या तेथेच तत्काळ वेळेत सोडवण्यात याव्यात. पीक विमा संदर्भात वेळ पडल्यास विमा कंपन्यासोबत शासनस्तरावर समन्वय साधून तत्परतेने पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या हिताच्या दूरगामी परिणाम करणाऱ्या योजना शासनस्तरावर आखण्यात येत असून यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. गायरान जमिनीचा वापर एमआयडीसीसाठी करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून श्री.ठाकरे म्हणाले की, रोजगार हमी योजनेत अधिक पारदर्शकपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दूध संकलन अंतर्गत दूध भुकटी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच पाणी समस्या संदर्भात श्री.ठाकरे म्हणाले की पाझर तलाव निधी, कृष्णा खोरे आधी संदर्भात कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तो अहवाल महाराष्ट्र जल परिषदेकडे पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात असून देवणी या ठिकाणी गाईचे आंतरराष्ट्रीय पशु संशोधन केंद्रामार्फत दर्जेदार देवणी गायीचे वाण संवर्धनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

दोन वर्षात सगळ्यात जास्त आत्महत्या बेरोजगारांच्या,महाराष्ट्रात सर्वाधिक




दिल्ली(वृत्तसंस्था)दि.10 : आर्थिक अडचणींमुळे आत्महत्त्या हा विषय निघाला म्हणजे आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो शेतकरी. पण आपल्या या कल्पनेला राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीने धक्का दिला आहे. गेल्या २ वर्षात सर्वात जास आत्महत्त्या बेरोजगारांनी केल्या आहेत.या आकडेवारीनुसार, २०१७-१८ या वर्षात १२,९३६ बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. हा आकडा एकूण आत्महत्यांपैकी ९.६ टक्के आहे. तर याच काळात १०,३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा एकूण आत्महत्यांपैकी ७.७ टक्के आहे.आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक (३४.७ टक्के) प्रमाण आहे. त्यानंतर कर्नाटक (२३.२), तेलंगाणा (८.८), आंध्र प्रदेश (६.४) आणि मध्य प्रदेश (६.३ ) या राज्यांचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा आणि चंदीगड येथे शेतीसंबंधित आत्महत्यांची नोंद शून्य आहे.
देशातील एकूण आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार, २०१७ या वर्षात १ लाख २९ हजार ८८७ तर २०१८मध्ये १ लाख ३४ हजार ५१६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८ या वर्षात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सन २०१७ मध्ये एकूण आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी १२,२४१ (९.४ टक्के) तर १०,६५५ शेतकऱ्यांनी (८.२ टक्के) आत्महत्त्या केल्या आहेत. २०१६ मध्ये एकूण (१,३१,००८) आत्महत्यांपैकी शेतकऱ्यांनी ८.७ टक्के (११,३७९) आत्महत्या केल्या आहेत. २०१५ मध्ये एकूण (१,३३,६२३) आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी ८.२ टक्के (१०,९१२) तर शेतकऱ्यांनी ९.४ टक्के (१२,६०२) आत्महत्या केल्या होत्या. तर सन २०१४मध्ये सरकारी आकडेवारीनुसार, एकूण आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी ७.५ टक्के तर शेतकऱ्यांनी ४.३ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आत्महत्या करणाऱ्या बेरोजगारांमध्ये ८२ टक्के पुरुष आहेत. त्यातही सर्वाधिक केरळ (१,५८५) त्यानंतर तामिळनाडू (१,५७९), महाराष्ट्र (१,२६०), कर्नाटक (१,०९४) आणि उत्तर प्रदेशात (९०२) बेरोजगारांनी आत्महत्या केल्या होत्या.शेती क्षेत्रात ५,७६३ शेतकऱ्यांनी आणि ४,५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८मध्ये शेती क्षेत्रातील आत्महत्यांपैकी ५,४५७ पुरुष तर ३०६ महिलांनी आत्महत्या आहेत. तर शेतमजुरांमध्ये ४,०७१ पुरुषांनी आणि ५१५ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत.

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा




पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.10 : नागरिकत्व संशाेधन कायदा ( सीएए) हा गैरसंविधानिक कायदा असून काळा कायदा आहे. या कायद्याच्या विराेधात आम्ही गांधी शांती यात्रा महाराष्ट्रातून सुरु केली आहे. ही यात्रा भारताच्या विविध राज्यांमधून दिल्लीतील राज घाटावर जाणार आहे. सरकारने सीएए हा कायदा मागे घ्यावा अन्यथा आम्ही राजघाटावर आंदाेलन सुरु ठेवणार आहाेत असा निर्धार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला. पुण्यात गांधीभवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते.
राष्ट्रमंच, फ्रेंड ऑफ डेमोक्रसी, शेतकरी जागर मंच या संघटनांकडून गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून या यात्रेला सुरुवात झाली. आज ही यात्रा पुण्यातील गांधी भवन येथे आली. यावेळी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा यांनी सरकारवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले, देशात आज अशांती आहे. सीएए या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच्या विराेधात युवक रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यापीठ आंदाेलनाची केंद्रे बनली आहेत.विद्यार्थ्यांच्या आंदाेलनांचं दमण भाजप शासित राज्यांमध्ये हाेत आहे. गांधींच्या विचारांच्या विपरीत सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्ही ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाहीला महात्मा गांधीजी यांच्या अहिंसेच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. तर केंद्राचा नागरिकत्व सुधारणा करणारा कायदा हा देशाचा विभाजन करणारा असून, आम्ही पुन्हा एकदा महात्मा गांधी यांची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे बोलताना दिला.
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री व पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महात्मा गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेटवे येथे गुरुवारी सकाळी हिरवा झेंडा दाखविला. केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत असल्याचा आरोप करुन दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जे काही झाले ते योग्य नव्हते. त्या घटनेचा संपुर्ण देशात विरोध होत आहे. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे, असे पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर, भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर हजर होते.

देसाईगंज येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी होणार

गडचिरोली,दि.10–ः देसाईगंज शहरातील २०१२ मध्ये एकुण ११४ घरकुल वाटपात घोटाळा झाल्या प्रकरणी देसाईगंज येथील कनिष्ठ न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने या प्रकरणात तत्कालीन पदाधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
यामुळे नगर पालिका क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार माजी नगराध्यक्ष हिरालाल मोटवानी यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देसाईगंज पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र देसाईगंज पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने मोटवानी यांनी अखेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात धाव घेऊन २९ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यातक्रारीच्या अनुषंगाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय(कनिष्ठ स्तर) यांनी देसाईगंज पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

गडचांदूर नगर परिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम विजयी

चंद्रपूर,दि.10 :- जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषद निवडणूकीने भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेत्यांना धक्का देत जनतेने नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या आहेत.
 चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलवीणारी ठरली असून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांनी घेतलेल्या जाहीर सभात त्यांनी दिलेल्या आश्वासनाला भीक न घालता गडचांदूरकरानी भाजपला चक्क नाकारल्याचे चित्र निकालात स्पष्ट झाले आहे.यामधे काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सविता टेकाम या निवडून आल्या असून पक्षीय बलाबल असे आहे.काँग्रेस-5, राष्ट्रवदी-4.. शिवसेना-5, शेतकरी सं.-1, व भाजपा-2. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्योती कंठाळें ह्या प्रभाग क्रमांक ७ मधे विजयी झाल्याच्या घोषणा होत्या मात्र फेरमोजणीत त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले.

ना.वड्डेटीवारांची नाराजी दूर




मुंबई,दि.10 : अपेक्षेप्रमाणे मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वडेट्टीवार यांना आता मदत आणि पुनर्वसन खाते देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केले. थोरात यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेत वडेट्टीवार यांच्या नाराजीविषयी चर्चा केली. त्याच वेळी वडेट्टीवार यांना मदत आणि पुनर्वसन खाते देण्याचा निर्णय झाला.
मंत्रिमंडळा विस्तारानंतर वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप आणि पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे विभाग न मिळाल्याने वडेट्टीवार कमीलीचे नाराज झाले होते. विस्तारानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिला गैरहजर राहून वडेट्टीवार यांनी आपली नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनातही वडेट्टीवार फिरकले नाहीत. मात्र, आपण व्यक्तीगत कारणामुळे अधिवेशनाला येऊ शकलो नाही असे वडटे्टीवार यांनी स्पष्ट केले होते.

मी माझ्यासाठी नाराज नव्हतो- वडेट्टीवार
मात्र, मी पक्षावर नाराज नव्हतो, तर आपल्या पक्षाला मिळालेल्या खात्यांबाबत नाराज होतो असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. वडेट्टीवार यांना आता मिळालेले मदत व पुनर्वसन खात्याचा संबंध ग्रामीण भागाशी येतो. या खात्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येत असतो. या खात्यामार्फत शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम होत असून शेतकऱ्यांना मदत करता यावी याचसाठी आपण या खात्यासाठी आग्रही असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Thursday 9 January 2020

एकोडी धान खरेदी केंद्राला आमदार फुकेंची भेट

साकोली,दि.09ःः तालुक्यातील एकोडी येथील शासकीय धान खरेदी केंद्राला भेट देत आमदार परिणय फुके यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अंकुर फुटलेल्या धानाची पाहणी केली.
यावेळी पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी करुन केंद्रपरिसरात असलेले सर्व धान खरेदी करण्याचे निर्देश देण्याबाबत चर्चा केली.यावेळी माजी आमदार बाळा काशिवार,जिल्हा परिषद सदस्य नेपालभाऊ रंगारी,राजेश बांते,सभापती उषाताई डोंगरावर,उपसभापती वर्षाताई कापगते,रमेश खेडीकर,एकोडी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सतीश समरीत,यादव कापगते,भोजराम कापगते,भाष्कर चिरवतकर तसेच एकोडी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गँगस्टर एजाज युसुफ लकडावालाला अटक गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पोलीसांच्या कामगिरीबद्दल केले अभिनंदन
मुंबई, दि. ९ : गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीसांचे अभिनंदन केले.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देशमुख बोलत होते. यावेळी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संतोष रस्तोगी उपस्थित होते.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर सहभागी असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोकासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलीसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती त्यांनी दिली.
शिफा शेख ही लकडावालाची मुलगी आहे. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला पासपोर्ट ॲक्टनुसार अटक करण्यात आली. तेथून लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलीसांच्या प्रयत्नातून लकडावालाला काल रात्री अटक करण्यात यश आले, अशी माहिती मंत्री श्री. देशमुख यांनी दिली.कोरेगाव – भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच याप्रकरणी भूमिका मांडेन, असे मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कोरेगाव- भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारीत केली. कोरेगाव-भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेन, असेही ते म्हणाले.
जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही, नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे, या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक लावला, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊ, असे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
न्यायमुर्ती लोया प्रकरणाबाबत काही लोकांचा भेटीसाठी फोन आला होता. त्यांच्याशी चर्चा करुन तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच या प्रकरणाबाबत निर्णय घेऊ. तसेच डिआयजी निशिकांत मोरे प्रकरणामध्ये मोटार ट्रान्सपोर्टचा वाहन चालक असलेला दिनकर साळवे हा पिडीत मुलीच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्याची संपूर्ण चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सत्ताधाऱ्यांची सूचना धुडकावत;’ओबीसी जनगणनेचा’ ठराव मंजूर

मुंबई,दि.08 – देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी शिफारस केंद्र सरकारला करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः मांडला. आणि तो एकमताने मंजूरही करवून घेतला. विशेष म्हणजे हा ठराव आजच न घेता आधी कामकाजामध्ये ठरवून पुढील अधिवेशनात घ्यावा अशी सूचना केली,परंतु अजित पवार व अनिल परब या मंत्र्यांनी कामकाज पधद्तीनुसार सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवून पुढच्या अधिवेशनात मांडण्याची सुचना केली.त्यावर विधानसभाध्यक्ष नाना पटोलेंनेही तठस्थ भुमिका घेत हा ठराव आजच मंजुर करून घेण्याचा निर्णय घेतला.त्यावर मंत्री छगण भुजबळ यांनी पाठिंबा दिला.विधानसभेत ओबीसी जनगणनेचा ठराव मंजुर करणारा राज्यही महाराष्ट्र ठरला असून एकीकडे विजय वड्डेटीवार ओबीसी मंत्रालय मिळाल्याने नाराज असतानाच विधानसभाध्यक्षांनी मात्र आपण ओबीसीचे सच्चे कार्यकर्ते असल्याचे ठराव मंजूर करवून दाखवून दिल्याने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघासह ओबीसी सेवा संघ व इतर ओबीसी संघटनांनी नाना पटोलेंचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाजाच्या पद्धतीचा रूढी व परंपरा यांचा दाखला देत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज व्हावे असे मत व्यक्त केले.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा ठराव मांडण्याचे ठरलेले नव्हते.त्यामुळे आज हा ठराव मांडू नये विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडावा अशी सूचना अजित पवार यांनी केली.संसदीय कामकाज मंत्री शिवसेनेचे अनिल परब यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तरीही अध्यक्ष पटोले हे याच अधिवेशनात ठराव मांडण्यावर ठाम राहिले. पटोले यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार पाठिंबा दिला यानिमित्ताने सत्तारूढ पक्षातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले. तसेच सत्तापक्षाच्या सूचनेला फाटा देत अध्यक्षांनी स्वतः हून ठराव मांडला आणि त्यात सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषणही झाले. दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात आले.” दरम्यान, केवळ 20 मिनिटांच्या या अधिवेशनात एससी एसटी  आरक्षण मुदतवाढीचे विधेयक संमत झाले.विधीमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदतवाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला.भारतीय संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 संसदेत संमत झाले. त्यानंतर आता राज्यांकडून या विधेयकाला पाठिंबा देणारे ठराव केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्याही विधीमंडळाने या विधेयकाला पाठिंब्याचा ठराव संमत केला. यासाठी विधीमंडळाचे 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले.आपल्या अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांनी आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाईल आणि काम करेल असे सांगितले. तसेच सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध राहिल, असेही नमूद केले. यावेळी नाना पटोले यांनी आपण ओबीसींचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने वारंवार ओबीसींचा आकडा नक्की किती हे विचारले. त्यामुळे ओबीसींबाबत एक प्रस्ताव आणत आहोत. त्यालाही संमती द्यावी अशी विनंती सभागृहाला केली.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संविधान सभेतील चर्चांचा संदर्भ देऊन आरक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणावरील मताचाही उल्लेख केला.

छत्तीसगढ़ के राजनांदगांव जिले में फिर नक्सली उत्पात

राजनांदगांव,8 जनवरीः- छत्तीसगढ़ के राजनांदगांव में एक बार फिर नक्सली उत्पात शुरू हो गया है | यहां के मानपुर इलाके के औंधी थाना क्षेत्र में हार्डकोर नक्सलियों ने जमकर उत्पात मचाया। उन्होंने सरखेड़ा और गौतमपुर पेदोड़ी के बीच सड़क निर्माण में लगे कई वाहनों को आग के हवाले कर दिया | इस घटना में दो हाइवा पूरी तरह से जलकर राख में तब्दील हो गई | जानकारी के मुताबिक हाईवा समेत अन्य वाहन लैंड मार्क कंस्ट्रक्शन कंपनी की बताई जा रही है।
राजनांदगांव में लंबे समय से शांति छाई हुई थी | मध्यप्रदेश और महाराष्ट्र की सरहद पर स्थित छत्तीसगढ़ के राजनांदगांव में पुलिस और केंद्रीय सुरक्षा बलों के जवानों ने नक्सलियों पर अच्छा-खासा दबाव बनाया हुआ था | बताया जाता है कि लगातार पेट्रोलिंग और मैदानी कार्रवाई के चलते नक्सलियों के कई दलम भूमिगत हो गए थे | लेकिन इस घटना के बाद एक बार फिर नक्सलियों ने इस इलाके में अपने पैर पसारना शुरू कर दिया है | फ़िलहाल पुलिस और केंद्रीय सुरक्षा बलों के जवानों ने जंगलों में डेरा डाला हुआ है |

देशव्यापी आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यात कर्मचार्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया,दि.08-  राज्यातील कर्मचाऱ्यांनी आज पुकारलेल्या संपाला गोंदिया जिल्ह्यात शंभर टक्के पाठिंबा मिळाला असून भर पावसातही कर्मचार्यांनी आंदोलन केले.जिल्ह्यातील पंचायत समिती,तहसिल कार्यालय,बँका,पोस्ट,आयकर विभाग,दुरसंचार विभागासह विविध कार्यालयासमोर कर्मचार्यांनी केंद्रसरकारविरोधात घोषणा दिल्या.त्यानंतर सर्व संघटंनाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी(सामान्य) सुनिता बेलपात्रे यांना दिले.
देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल , खाजगीकरण,उदारीकरण, कंत्राटीकरण, आणि जनविरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशातील श्रमीक, जनता, कामगार – कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने देशभरातील 11 केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक – शेतकरी शेतमजूर या संघटनांच्या देशातील २0 कोटी औद्योगीक कामगार – कर्मचारी, श्रमीक वर्गाने आज  ८ जानेवारीला एक दिवसीय देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले होते.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय व राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, आऊटसोर्सिंग, कंत्राटी व अल्पवेतनी कर्मचारी,पोस्ट विभाग,आयकर विभागासह,अंगणवाडी सेविका,बालवाडी सेविका,आरोग्यसेविकाही सहभागी झाल्या होत्या.विशेष म्हणजे सकाळपासूनच पावसाने सुरवात केल्यानंतरही सर्व कर्मचारी आपआपल्या कार्यालयासमोर भरपावसात निदर्शने करीत होती.तर येथील प्रशासकीय कार्यालयात गोंदिया शहरातील सर्व कर्मचारी एकत्रित झाले होते.

आंदोलन हे जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे,पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणणे, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत देण्यात यावी. स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावे.औषधे, खते,बियाणेचे किंमती नियंत्रनात आणणे,
केंद्र व राज्य सरकारचे विविध विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, रद्द व व्यपगत करण्यात आलेली पदे पुनर्जिवित करणे,डीसीपीएस मधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रुपये दहा लक्ष सानुग्रह अनुदान लागु करणे,बक्षी समितीचा दुसरा खंड प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी दुर करणे, केंद्राप्रमाणे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते लागू करणे.जानेवारी१९ चा महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै१९ पासून थकीत महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील सर्व प्रस्ताव विना अट निकाली काढून रिक्त पदे तात्काळ भरणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबाबतचा ग्रामविकास विभागाचा ९ सप्टेंबर१९ चा शासन आदेश रद्द करणे,उत्कृष्ठ कामासाठी पूर्वीप्रमाणे आगाऊ वेतन वाढी लागू करणे, केंद्र शासनाने विहीत केल्यानुसार ५ दिवसाचा आठवडा लागु करणे, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, कंत्राटी, ग्रामरोजगार सेवक, व संगणक परीचालक कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे,सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मीती करून जिल्हा परीषद संवर्गातुन रिक्त पदे तात्काळ भरणे, मागील काळात सरकारचे “सकारात्मक चर्चा व नकारात्मक धोरणामुळे ” शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे,
ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार नगर परीषद कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन भत्ते व सुधारीत आकृती बंध लागू करणे,अंगणवाडी कार्यकर्ती/मदतनीस व आशा सेविका यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन वेतनश्रेणी लागु करणे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जीने बदल मागे घेणे, देशातील सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरन निर्णय बंद करणे,औद्योगिक उद्योगांचे परराज्यात होणारे स्थलांतर बंद करणे, बंद पडलेले कारखानदारी सुरू करून नवीन उद्योगधंद्यांना चालना देणे, आयआयटी पार्क हबला चालना देऊन शिक्षणावर लाखो रुपये खर्च झालेल्या युवकांची बेरोजगारी कमी करणे या प्रमुख मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात जिल्हा परीषदेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत / उद्योग , कृषी तांत्रीक, पशु चिकीत्सा, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, अंगणवाडी सुपरवायझर,वनविभाग, शिक्षक शिक्षकेत्तर, नर्सेस, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक, लेखा विभाग, वाहन चालक, परीचर, मैल कामगार,पोस्ट कर्मचारी,आयकर कर्मचारी तसेच जिल्हा परीषद संवर्गातील कर्मचारी संघटनासह सर्व विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, संघटना सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे  निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष पी.जी.शहारे, सरचिटणीस शैलेश बैस, उपाध्यक्ष कार्तिक चौहान, कोषाध्यक्ष अजय खरवडे,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्हा सचिव आशिष रामटेके,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, दयानंद फटिंग,कविता बागडे,लक्ष्मण ठाकरे,विस्तार अधिकारी कर्मचारी संघटनेचे विनोद चौधरी,राजू लदरे,गुणवंत ठाकूर,सुभाष खत्री,संतोष तोमर,इंजि.गोवर्धन बिसेन,इंजि.वासुदेव रामटेककर,संतोष तुरकर,अजय कोठेवार,लिलाधर तिबुडे,राजेश कुंभलवार,संध्या रेटर,सालेकस्यात जि.एस.पवार,तेजस्विनी चेटुले,रहागंडाले,सडक अर्जुनीत किशोर डोंगरवार,भाकप नेते व अगंणवाडी कर्मचारी नेते हौसलाल रहांगडाले,रामचंद्र पाटिल,मिलिंद गणवीर,शालू कुथे,शकुंतला फर्टिंग,आम्रकला डोंगरे,शेखर कनौजिया,चरणदास भावे,करुणा गणवीर,कल्पना डोंगरे,क्रांति गणवीर,सी.के.ठाकरे,विवेक काकडे,डाॅ.परवेज सय्यद,संगिता अंबुले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ गोंदिया” संघटनेचे गठण

➡जिल्हाध्यक्षपदी संदिप तिडके तर सरचिटणीसपदी रवि अंबूले यांची निवड
➡ ओबीसी समाजाच्या हिस्सेदारीसाठी शेवटपर्यंत लढा देवू…ओबीसी कर्मचारी बांधवांचा निर्धार
गोंदिया,दि.09ः- राष्‍ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया शाखेचे संघटन करण्यासाठी जिल्हांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची सभा शिक्षक पतसंस्था गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी व ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले पाहिजे व स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आदी मागण्यासाठी जिल्हास्तरावर राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघ शाखा गोंदियाचे गठण करण्याचा निर्णय घेतला.
ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शिक्षक पतसंस्थेचे संचालक संदीप तिडके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.तर जिल्हा सरचिटणीस रवी अंबूले,कार्यालयीन चिटणीस हेमंत पटले,उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर व एन.बी.बिसेन, कार्याध्यक्षपदी केदार गोटेफोडे, किशोर डोंगरवार ,जिल्हा सहसचिव सतीश दमाहे, लिकेश हिरापुरे व प्रमोद शहारे, कोषाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम, सहकोषाध्यक्ष रेशीम कापगते, सूरेंद्र गौतम व शितल कनपटे, संघटक राज कडव, प्रसिद्धीप्रमुख विनोद लिचडे, मुकेश रहांगडाले, लाखेश्वर लंजे, तुषार सिंगणजूडे, संतोष बारेवार, महिला प्रतीनीधी संगीताताई पाथोडे, मुख्य सल्लागार म्हणून एस यु वंजारी, वीरेंद्र कटरे, एल.यू.खोब्रागडे, नूतन बांगरे, डी. टी.कावळे,हरिराम येळणे, महेंद्र सोनेवाने, कमलेश बिसेन, विनोद चौधरी (जि.प), अजय खरवडे यांचा समावेश जिल्हा कार्यकारीणीत करण्यात आला.त्याचप्रमाणे तालुकास्तरावर संघटन तयार करण्यासाठी आणि जिल्हा व तालुक्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तालुकासमन्वयक तयार करण्यात आले.त्यात सालेकसा तालुका अंतर्गत जी.सी.बघेले, राजकुमार बसोने, जयेश लिल्हारे देवरी तालुका अंतर्गत मोहन बिसेन, वीरेंद्र खोटेले, दीपक कापसे, प्रमोद निखाडे आमगाव तालुका अंतर्गत सुरेंद्र मेंढे, महेंद्र चव्हाण, डि.व्हि.बहेकार सडक अर्जुनी अंतर्गत ठाणेंद्र गोरेलाल तुरकर, वीरेंद्र भिवगडे, बाळू वालदे, गोंदिया तालुका अंतर्गत मोरेश्वर बडवाईक, प्रमोद बघेले, नरेंद्र गौतम, सुनील बावनकर, वाय. डी.पटले, अशोक तवाडे, गोरेगाव तालुका उमेश रहांगडाले, उत्तम टेंभरे, राजू भरणे, अर्जुनी मोरगाव तालुका दिलीप लोधी, रमेश संग्रामे, आशीष कापगते, कृष्णा कहालकर,तिरोडा तालुका एम.आर. पारधी, अशोक बिसेन, एस रहांगडाले आदी पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रा.बी.एम.करमकर,अशोक बोरकर, सावन कटरे, सावन डोये, खेमेंद्र कटरे, गुरुदास येडेवार, बी.आर.पटले ,भूमेश्वर चव्हाण ,शालिकराम मेंढे, रवी भांडारकर ,संतोष वैद्य, प्रकाश अगडे, कैलास भेलावे, मनोहर कटरे, किशोर बहेकार, राजकुमार चौधरी, गणेश चूटे, हेमंत बिसेन, विवेक निखाडे, पि.यू सिंगनजुडे , गुणीराम ठाकरे, सी.बी.बिसेन,अमित घावडे, शिशिर कटरे, सुनील भोंगाळे,विनायक येडेवार,महेंद्र बिसेन,श्री.बडवाईक यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...