Wednesday 1 January 2020

राज्यमंत्री बच्चू कडूंचा कामचुकार अधिकाऱ्यांना दणका

अमरावती,दि.01-  वर्षाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री झालेले प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तहसिल कार्यालयाला आज दुपारी तीनच्या सुमारास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचानक भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे तहसिल कार्यालयातील अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ झाली.
यावेळी बच्चू कडूंनी तहसीलदारांना तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले. या आढावा बैठकीमध्ये तहसिल कार्यालयांतर्गत रखडलेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली. या बैठकीदरम्यान संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग या दोन विषयांवर एक तास चर्चा चालली. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागात संदर्भात वारंवार चकरा मारूनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यानंतर तात्काळ राज्यमंत्र्यांनी संजय गांधी निराधार योजनेतील सपना भोवते निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभागातील प्रमोद काळे, या दोन्ही कामचुकार अधिकारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...