Friday 31 August 2018

एकतर्फी प्रेमातून केली तरुणीच्या भावाची हत्या

कुही तालुक्यातील खैरलांजी गावात ही घटना घडली आहे. ही हत्या नियोजनपूर्वक करण्यात आली. आरोपीने मृत अमोल मेश्रामला गुरुवारी मध्यरात्री मद्य पाजले. अमोल मद्याच्या धुंदीत असतानाच धारदार काचेच्या सहाय्याने त्याच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले. पोलिसांच्या मते, आरोपी सूरज पाटीलचे अमोलच्या छोट्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. आरोपीने मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मागणी केली होती. परंतु, मेश्राम कुटुंबीयांनी ही मागणी नाकारली. तिचे लग्न मे 2018 मध्ये महाराष्ट्राबाहेर करण्यात आले. आरोपी या घटनेने संतप्त झाला होता. गेल्या काही दिवसांत सुरजने नियोजनपूर्वक अमोल सोबत मैत्री वाढविली होती. त्याला मद्यप्राशन करायला घेऊन जाऊन मद्यधुंद करून ही हत्या केली. वेलतूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे

माथनी टोलनाक्यावर अवैध रेती नेणाऱ्या 8 वाहनावर कारवाई

मौदा,दि.31 (प्रा.शैलेश रोषनखेडे) -ः  नागपूर ग्रामीण पोलीस  विभागातंर्गत येत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवारला सकाळी 7 वाजेच्या सुमारास माथनी टोलनाक्यावर विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या 8 ट्रकवर कारवाई करीत 2 कोटी 41 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी मोहीम चालविली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. हे ट्रक भंडारा जिल्ह्यातून रेती घेऊन नागपूरला दररोज जात असताना भंडारा महसूल विभाग व पोलिसांनी का कारवाई केली नाही, अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आज अवैधरीत्या विना रायल्टी रेती वाहून नेणाऱ्या ट्रक्सना जप्त करण्याची मोहीम अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपनिरीक्षक दुबे यांच्या चमूने केली. पकडलेले ट्रक मौदा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले असून आरोपींवर भादंवी 379 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील कारवाई निरीक्षक आशिफ शेख करत आहेत.

देवेंद्रभाऊ डोये दुसऱ्यांदा तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष

देवरी:३१( सुजित टेटे) पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत ओवारा  येथे दिनांक30/08/2018 रोज गुरुवारला ग्रामपंचायत ओवाराची विशेष आमसभा  हिरामन टेकाम सरपंच यांचे अध्यक्षतेखाली व कमल येरने उपसरपंच यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. तसेच सुभाष तागडे ग्रामसेवक यांच्या  मार्गदर्शनात पार पडली.  यामध्ये  महात्मा गांधी तंटामुक्त समीतीचे फेरबदल करुण सर्वानुमते देवेंद्रभाऊ डोये यांची अध्यक्ष पदाकरीता निवड करण्यात आली. दुसऱ्यांदा सर्वानुमते अध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली. सरपंच, उपसरपंच तसेच गावातील नागरिकांनी यावेळी त्यांचा अभिनंदन केला. 

Wednesday 29 August 2018

ओबीसी समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी मिळणार अर्थसहाय्य

वाशिम, दि. २९ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या इतर मागासवर्गीय मंत्रालय, विशेष घटक योजनेंतर्गत ओबीसी समाजातील लोकांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून ओबीसी समाजातील कुटुंबांचा अर्थिक व सामाजिक विकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न करते. चालू अर्थिक वर्षासाठी बीज भांडवल व थेट कर्ज योजने अंतर्गत पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत रुपये ५ लाखपर्यतच्या कमाल मर्यादेच्या प्रकल्पास मंजूरी देण्यात येते. मंजूर कर्ज रकमेच्या ५ टक्के हिस्सा लाभार्थी, २० टक्के महामंडळ व ७५ टक्केरक्कम बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर ६ टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर लागू राहील. कर्जाची परतफेड ५ वर्षात करायची आहे. जे व्यवसाय २५,००० रुपये पर्यंत भांडवलातून चालू शकतात, अशा छोट्या व्यवसायाकरीता थेट कर्ज योजनेअंतर्गत २५,००० रुपयेपर्यंत कर्ज २ टक्के व्याज दराने महामंडळ मंजूर करते. कर्ज परतफेडीची कालावधी ३ वर्षे आहे. कृषि व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारिक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजूरीस प्राधान्य देण्यातयेईल. कर्ज मंजुरीनंतर महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक वैधानिक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज वितरीत करण्यात येईल.जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील वय १८ ते ५० वयोगटातील, कुटूंबाचे सर्व साधनाने मिळून एकून वार्षिक उत्पन्न रुपये १ लक्षच्या आत असलेल्या कुटूंबातील व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील. अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्यात ज्ञान किंवा अनुभव असावा.अर्ज दोन प्रतीमध्ये सादर करायचा असून अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून सोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, जन्मतारखेचा दाखला, फोटो ओळखपत्र,पत्त्याचा पुरावा, व्यवसाय स्थळाची कागदपत्रे जसे भाडेपावती, भाडे करारनामा किंवा संमतीपत्र किंवा सातबारा उतारा किंवा मालमताधारकाचे कागदपत्रे, व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक वअनुभवाचे प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचा व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक परवाना/लायसन्स, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणाराकच्चामाल व यंत्रसामग्रीचे दरपत्रक इ. साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील योजना निहाय अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी गरजू युवकांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी केले आहे.

गिरी व गायधने यांना राज्य शिक्षक पुरस्कार

भंडारा :दि. २९ : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली असून यंदा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रमेशराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील ओमप्रकाश बाबुराव गायधने यांची निवड करण्यात आली आहे. 
भंडारा जिल्ह्यातील दोन शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणारे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने राज्य पुरस्कार देवून गौरविल्या जाते. यंदा भंडारा जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पवनी येथील अषित प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक अशोक रमेशराव गिरी यांना प्राथमिक विभागातून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत झाला आहे. तर तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक ओमप्रकाश बाबूराव गायधने यांना माध्यमिक विभागातून हा पुरस्कार घोषित झाला आहे.
अशोक गिरी हे खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेत शिक्षक असून त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या शाळेत विद्यार्थी इंग्रजीतून परिपाठ सादर करतात. त्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी दररोज नागरिकांची शाळेत उपस्थिती असते. पलकांमध्ये जनजागृती करून शाळेत विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सिहोरा येथील ओमप्रकाश गायधने यांनी विद्यार्थी व समाजोपयोगी उपयोगी उपक्रम राबवून आपल्या शाळेचे नाव राज्यस्तरावर नेले आहे. या दोन्ही शिक्षकांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

गोंदिया जिल्हा दुध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षासाठी अपात्र

दुधाचे शासकीय हमीभाव न दिल्याने विभागीय उपनिबंधकानी केली कारवाई

गोंदिया दि. २९(बेरार टाईम्स एक्सक्लुजीव) ::  जिल्हा दुध संघाकडून शासनाने ठरवून दिलेल्या २७ रुपये प्रति लिटरप्रमाणे दर न देता ५ रुपये कपात करून २२ रुपये प्रति लिटरप्रमाणे पशुपालक उत्पादकांना दुधाचे दर देत शासनाच्या हमीभावाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था(दुग्ध) नागपूरचे एस. एन. क्षिरसागर यांनी विद्यमान गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या संचालकांना कलम ७९ अ(३) अन्वये सहा वर्षासाठी अपात्र ठरविल्याने एकच खळबळ माजली आहे. २३ ऑगस्ट रोजी विभागीय उपनिबंधकांनी यासबंधीचा आदेश पारीत केल्यानंतर विद्यमान संचालकांनी दुग्धविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे जिल्हा दुग्धसंघ जेव्हापासून अस्तित्वात आले तेव्हापासून राजकुमार कुथे हे अध्यक्ष आहेत. ते यापुर्वी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते.नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला होता.
 शासनाने ठरवून दुधाचे ठरवून दिलेले हमीभाव गायीकरीता २७ रुपये व म्हशीकरीता ३६ रुपये प्रती लिटर असून हा दर प्राथमिक दुध संस्था व सभासद शेतकèयांना देणे बंधनकारक असतानाही संघ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत संचालक मंडळाने संस्था व शेतकèयांना ५ रुपये कमी दराने म्हणजे २२ रुपये दराने गायीच्या दुधाचे दर दिल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार दुध संस्था व सभासद शेतकèयांनी विभागीय उपनिबंधकासह,जिल्हाधिकारी व शासनाकडे केली होती.त्यानंतर दुध संघ लक्ष देत नसल्याचे बघून दुध संस्थांनी न्यायालयातही धाव घेतली.दुध उत्पादकांच्या तक्रारीच्या आधारे विभागीय उपनिबंधकांने २१ एप्रिल २०१८ रोजी पहिली सुनावणी करण्यात आली.त्यावेळी संघाच्यावतीने अ‍ॅड.अजय घारे यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असता २८ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती.त्या सुनावणीस संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे हे प्रत्यक्ष उपस्थित राहून एप्रील ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत शासन निर्देशाप्रमाणे २७ रुपये लिटर दर देण्यात आल्याचे सांगत १ डिसेंबरपासून हा दर २४ रुपये तर २१ जानेवारी २०१८ पासून २२ रुपये प्रती लिटर तर ११ एप्रिल २०१८ पासून २४ रुपये प्रती लिटर गायीचे व ३४ रुपये म्हशीच्या दुधाचे दर करण्यात आल्याचे सांगत लेखी उत्तर देण्यासाठी अवधी मागितला होता.त्यावर १० मे रोजी पुन्हा सुनवाणी घेण्यात आली असता त्यावेळी मात्र संघाच्यावतीने कर्मचारी उपासे हे हजर झाले आणि ११ मे पासून शासन निर्देशाप्रमाणे दुध उत्पादकांना दर देण्यात येईल असे सांगितले.त्यानंतर १६ मे रोजी झालेल्या सुनावनीत व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बोकडे यांनी संघाचा ठराव व दरपत्रक लेखी सादर केले.त्यामध्ये एप्रिल १७ ते मार्च १८ दरम्यान २०,३११३८ लीटर दुध संकलीत करुन १५,०४९८७ लिटर शासनास विक्री केले.तर उर्वरित दुध महानंद,भंडारा दुध संघ व चिल्लर विक्री केल्याचे सांगत एसएमपी पावडर व बटर तयार करण्यात संघाला २२.३३ लाखाचा तोटा झाल्यामुळे संघाने दुधाचे दर कमी केल्याचा उल्लेख लेखी उत्तरात दिले.त्यानंतरच्या २५ मे च्या सुनावणीत शासकीय दर देण्यात येत असल्याने नोटीस परत घेण्याची विनंती दुध संघाचे वकील एस.के.तांबडे यांनी केली.मात्र अंतिम सुनावणीला १८ जून रोजी संघातर्फे कुणीही उपस्थित झाले नाही.सर्व सुनावणींचा विचार करुन संघाला जरी तोटा झालेला असला तरी संघातर्फे दुध संस्था व उत्पादकांना शासन निर्देशित दर देता आलेले नाही.जेव्हा की हे दर संघाला बंधनकारक असताना त्या निर्णयाचे पालन न केल्यामुळे संचालक मंडळ यात जबाबदार असल्याचे ठरवत येत्या सहा वर्षासाठी संचालक पदाकरीता अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.अपात्र केलेल्या संचालकामध्ये राजकुमार कुथे,रामदयाल पारधी,रमणलाल राणे,लक्ष्मण भगत,शिवशंकर बागडकर,श्रीराम खैरे,सुर्यभान टेंभुरकर,राजाराम लांजेवार,सहसलाल आंबाडारे,निशाबाई राठोस व सपनाबाई बांते यांचा समावेश आहे.

वाचनाला पर्याय असू नये- अॅड. उके

77 व्या वाढदिवसानिमित्त शाळेला दिले ग्रंथ भेट

देवरी,दि.29- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवक आणि विद्यार्थी हा दूरदर्शन आणि संगणकाच्या जाळ्यात ओढला जात आहे. मोबाईल संस्कृतीने तर युवकांची जीवनशैली पार बदलून टाकल्याचे दिसत आहे. अनेक युवकांना सामाजिक माध्यमांचे जणू वेशनच जडले आहे. परंतु, मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी आणि ज्ञानसागरात पोहू इच्छिणाऱ्यांना वाचनाशिवाय अन्य कुठलाही पर्याय असू शकत नाही. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आज वाचन संस्कृतीचा ऱ्हास होताना पाहून मनाला वेदना होतात. आपण जर वाचलोच नाही, तर वाचणार कसे? असा सवाल ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित अॅड. डॉ. श्रावण उके यांनी युवक आणि विद्यार्थ्यांना केला आहे.
ते स्थानिक छत्रपती विद्यालयात त्यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष झामसिंग येरणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्रा. बिसेन, प्रा. मनोज भुरे,सौै. शारदा उके, प्रशांत उके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड. उके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या ग्रंथालयाला 77 ग्रंथ भेट स्वरूपात दिले. उल्लेखनीय म्हणजे अॅड. आपल्या वाढदिव
साली तालुक्यातील ग्रंथालयांना भेटस्वरुपात पुस्तके दान करीत असतात.
प्रास्ताविक आणि संचलन श्री काशिवार यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रशांत उके यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेरार टाईम्स 29 आॅगस्ट ते 4 सप्टेंबर अंक क्लिक-berartimes.com





Tuesday 28 August 2018

गोंदिया शिक्षण विभागाचा उदासीन कारभार -पायाभूत चाचणीचे पेपर कमी

गोंदिया:२८ अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणीचे आयोजन  संपूर्ण जिल्ह्यात आजपासून करण्यात आले. हि चाचणी २८/०८/२०१८ ते ३१/०८२०१८ पर्यंत असणार. शिक्षणाधिकारी यांच्या पत्र क्रमांक - जा . क्र . जिपगो /सशिअ /पा चा / २३५/२०१८ दिनांक २३/०८/२०१८ नुसार सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पायाभूत चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले  परंतु आज दि. २८/०८/२०१८ पासून सुरु झालेल्या पायाभूत चाचणीचे पेपर पटसंख्ये नुसार मिळाले नसल्यामुळे शाळेत परीक्षा घ्यायची कशी असा प्रसन्न सम्पूर्ण जिल्ह्यातील शाळेत बघावयास मिळत आहे. पाकिटात पेपर द्या, पेपर परीक्षेच्या दिवशी उघडा अश्या सूचना मिळाल्या मुळे कमी असलेल्या पेपर ची छायांकित प्रत काढायला सुद्धा वेळ मिळत नाही.  यामुळे गोंदिया शिक्षण विभागाचा उदासीन कारभार असल्याचे सिद्ध झाले आहे.शाळांनी संबंधित अधिकाऱ्यांना, केंद्र प्रमुखांना संपर्क केले असता शिक्षण विभागानी मागणीनुसार पेपर पुरविले नाही असे उत्तरे मिळतात. विशेष म्हणजे संबंधित पायाभूत चाचणी साठी पटसंख्येच्या माहिती जुलै महिन्यातच मागविण्यात आलेली होती. परंतु पुरेशा वेळ मिळूनही संबंधित अधिकारी आणि शिक्षक विभागाची उदासीनता स्पष्ट दिसत आहे. गोंदिया ला एक नंबर बनविण्यासाठी विविध अँप डाउनलोड करून फक्त १ नंबरच द्या अशी मागणी केली जात आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाकडे तसेच विध्यार्थी गुणवत्ते कडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शसनास येत आहे. फक्त अवॉर्ड्स मिळवून गोंदिया १ नंबर होणार नाही तर येथील विध्यार्थी घडणीण्याकडे लक्ष केंद्रित असायला पाहिजे.   

Sunday 26 August 2018

संविधान संरक्षणासाठी बहुजन समाज एकवटला;रॅली काढून नोंदविला निषेध

गोंदिया, दि.२५ : : ९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतरसमोर काही समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराला सत्तारूढ शासनाचा पाठिंबा असल्याचा आरोपही झाला. याशिवाय सोशल मिडियावर त्या घटनेचे छायाचित्र व व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. एकंदरीत हा बहुजनांचा अपमान असून संविधान बदलण्याचा षड्यंत्र असल्याने या विरोधात ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांनी एकत्र येऊन संविधान बचाव कृती संघाच्या माध्यमातून संविधानाच्या संरक्षणासाठी आज (दि.२५) जनजागृती रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदविला.
संविधान बचाव कृती संघाच्या माध्यमातून काढण्यात आलेली जनजागृती रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ झाली. शहरातील जयस्तंभ चौक, गांधी
प्रतिमा, चांदणी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक, उपविभागीय कार्यालयासमोर या रॅलीचे समापन सभेत झाले. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सभेला संबोधित
केले. तसेच निवेदनाच्या प्रती संबंधितांना देऊन घटनेचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे सविंधान बचाव कृती समितीचे आयोजक अतुल सतदेवे, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकरक, प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व सपांदक खेमेंद्र कटरे, आदिवासी फेडरेशनचे डॉ. नामदेव किरसान, सहसचिव खेमेंद्र कटरे, संतोष खोब्रागडे, अवंतीबाई लोधी महासभेचे अध्यक्ष शिव नागपुरे, युवा स्वाभीमानचे जीतेश राणे, विदर्भ कनेक्टचे गुरमीत चावला,  मुस्लिम छप्पर बंद शाह बिरादरी संघटनेचे अध्यक्ष जनाब अफजल शाह,जुबेर खान, बसपाचे प्रदेश सचिव दिनेश गेडाम, 
बीआरएसपीचे डी.एस. मेश्राम,आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, सविता बेदरकर,वैशाली खोब्रागडे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे,एस.यु.वंजारी,सावन डोये,लक्ष्मण नागपूरे,योगेश फुंडे,महेंद्र बिसेन,शिशिर कटरे,चौकलाल येडे,गुड्डू कटरे,प्रमिला रहागंडाले,दिनेश हुकरे,भुमेश्वर चव्हाण,पेमेंद्र चव्हाण,विनायक येडेवार,अशोक लंजे,डाॅ.रुपसेन बघेले, रवि भांडारकर,गणेश बरडे,चौकलाल येडे, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे,गौरव बिसने,प्रेमलाल साठवणे,अभिषेक चुटे, सुनील तरोणे, भाकपचे हौसलाल रहांगडाले,संतोष वैद्य, विश्वजीत बागडे, पूर्णिमा नागदेवे, अनिल गोंडाने, संजूताई खोब्रागडे, नईम खान, जीवनलाल शरणागत, भीमराव बन्सोड, एन.एल. मेश्राम, चंद्रकांत शहारे, एम.जी. गणवीर, विनोद बन्सोड, शकुंतला बोरकर, राजा चंद्रिकापुरे, कुंदा भास्कर, महेंद्र रामटेके, प्रेमलाल मेश्राम, पुरुषोत्तम नंदागवली, प्रफुल धमगाये,मेश्राम, बाबुराव जनबन्धु, अरविंद शेंडे, अनमोल भालेराव,श्याम चौरे,दिपम वासनिक, यांच्यासह विविध बहुजन संघटनांचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

त्यापुर्वी आज संविधान बचाव अभियानांतर्गत गोंदिया तालुक्यातील काटी येथून बाइक रैली पारस डोंगरे एंड भीम आर्मी ग्रुप च्यावतीने करण्यात आले होते.ती बाईक रॅली रावणवाडी,कंटगी मार्गे गोंदियात दाखल झाली.रॅलीला आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी,निलम हलमारे यांनी झेंडी दाखवली.रॅलीतील कार्यकर्त्यांना मुरपर य़ेथे विकास गेडाम,रावनवाडीत डॉ. विनोदभाऊ पटले,कटंगी चौकात जितेश टेंभरे,निलेश देशभ्रतार यांनी चहा नास्त्याची व्यवस्था करुन त्यांचे स्वागत केले.

देहव्यापार अड्डय़ावर छापा तीन महिलांसह एका पुरुषाला अटक

भंडारा,दि.26ः- शहरातील हनुमान वॉर्डात सुरू असलेल्या देहव्यापार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाने धाड मारून तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली. ही कारवाई शुक्र वारी संध्याकाळी करण्यात आली.
शहरात २0 ते ४0 वयोगटातील काही महिला देहविक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विनीता साहू व अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉडला कारवाईचे निर्देश दिले. शुक्र वारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हनुमान वॉर्डातील अक्षय संजय फुलसुंगे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी घराच्या समोरील खोलीत दोन महिला बसल्या होत्या. त्यांना तिथे असण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन आतील खोलीत प्रवेश केला असता एक पुरूष महिलेसह अर्धनग्न अवस्थेत मिळून आला. त्यांना पकडून पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्याजवळील पैसे व साहित्य असा ६ हजार ५२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाचे पोलिस निरीक्षक अरूण गुरनुले, उपनिरीक्षक सचिन गदादे, जितेंद्र आडोळे, सहाय्यक फौजदार अरूण झंझाड, अश्‍विनकुमार मेहर, रुपचंद जांगळे, प्रदिप डहारे, किशोर मेर्शाम, विनोद शिवणकर, योगिता जांगळे, सुप्रिया मेर्शाम, सचिन गाढवे यांनी केली.

झुंडशाहीसाठीच संविधानाला विरोध-कन्हैयाकुमार

नांदेड,दि.26 : काही विशिष्ट लोकांसाठी पाच हजार वर्षांपासून असंविधानिक पद्धतीने आरक्षण आहे. ते आरक्षण बंद होऊ नये यासाठीच घटनात्मक आरक्षणाला विरोध केला जात असल्याची टीका विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी केली. भारतीय संविधानाने देशाची विविधता जपली आहे. म्हणूनच, हा देश टिकून आहे. आता काहीजण संविधानाच्या मागे लागले आहेत. देशातील लोकशाही संपवून झुंडशाहीचे राज्य आणण्यासाठीच संविधानाला विरोध केला जात असल्याचे कन्हैयाकुमार यांनी सांगितले.
संविधान गौरव समिती आणि तन्जिम-ए-इन्साफ यांच्या वतीने शनिवारी रात्री येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात कन्हैयाकुमार यांची सभा झाली. प्रारंभी विषमतेचे प्रतीक म्हणून ठेवलेल्या मडक्यांची उतरंड कन्हैयाकुमार यांनी काठीने फोडली. सभेला अभूतपूर्व गर्दी होती. ही गर्दी पाहून कन्हैयाकुमार यांनी नांदेडमधील यापुढची सभा खुल्या मैदानात घेऊ, असा शब्द देवून भाषणाला सुरुवात केली. उतरंड फोडतानाचा हातातील दांडा पाहिल्यानंतर हा देश दंडुक्याने चालत नाही तर तो माणसाने चालतो, अशी टिप्पणी करीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. विविध जाती, धर्म, पंथ असलेला हा विशाल देश केवळ संविधानामुळेच टिकून आहे. भाजपानेही या संविधानाचा सन्मान करायला हवा. चहा विकणारे मोदी केवळ या संविधानामुळेच पंतप्रधान होऊ शकले. असे सांगत त्यांच्या चहा विकण्याच्या म्हणण्याबाबत मात्र मी साशंक असल्याचे सांगत फोटोची आणि मार्केटिंगची एवढी हौस असलेल्या मोदींनी चहा विकतानाचा एखादा तरी फोटो दाखवायला हवा होता, असा चिमटा कन्हैयाकुमार यांनी काढला. एका पंतप्रधानाला माझ्यासारखा विद्यार्थी जाहीरपणे प्रश्न विचारु शकतो, हीसुद्धा या संविधानाचीच ताकद असल्याचे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी थेट निवड झालेली नाही. तर निवडून आलेल्या खासदारांनी त्यांना नेता निवडून पंतप्रधानपदी बसविले आहे. मात्र आज ते देशात अध्यक्षीय पद्धत असल्यासारखे वागत आहेत. २०१९ च्या निवडणुकांना तोंड कसे द्यायचे, याची चिंता आज भाजपाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते २०२२ मध्ये आम्ही काय करणार? ते सांगत आहेत. खरे तर २०१४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठी या सरकारला निवडून दिलेले आहे. या सरकारने या चार-पाच वर्षांत देशहिताची काय कामे केलीत? हे सांगायला हवे. मात्र भाषणबाजी सोडून दुसरे काहीही केलेले नसल्याने हे आता २०२२ ची भाषा बोलत आहेत. हा खरे तर देशातील जनतेचा आणि संविधानाचाही अपमान असल्याचे कन्हैयाकुमार यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी ‘सबका साथ सबका विकास’, विदेशातून काळे धन आणणार, दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देवून ‘अच्छे दिन’ आदी विविध घोषणा केल्या होत्या. जनतेने या घोषणांच्या बळावरच तुम्हाला सत्ता दिली. आता तुम्ही जनतेसाठी काय केले ते सांगा? असा सवालही कन्हैयाकुमार यांनी केला.
पंतप्रधान मोदी हे नेहमी निवडणूक प्रचाराच्या मूडमध्ये असतात. मार्केटिंगचे उस्ताद असलेले मोदी हे प्रधानमंत्री आहेत की प्रचारमंत्री ? असा प्रश्न पडतो. असे सांगत निवडणुकीमध्ये पप्पू कोण? ते जनता ठरवेल. मात्र मागील चार वर्षांतील कारभार पाहिल्यानंतर आपण गप्पू आहात हे मात्र सिद्ध केले, अशी टीकाही कन्हैयाकुमार यांनी मोदी यांच्यावर केली. नोटाबंदीनंतर काळा पैसा का कमी झाला नाही. जनधन योजना आल्यानंतर सर्वसामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये का टाकले नाहीत, की हा सर्व पैसा अमित शहा यांच्या मुलाच्या खात्यावर टाकला? असे प्रश्न उपस्थित करीत देशातील लाखो तरुण आज बेरोजगार आहेत. तर शिक्षणापासून वंचित राहणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे.
सत्तेत आल्यानंतर शिक्षणाचे बजेट २४ टक्क्यांनी कमी केले. याचा फटका कोणाला बसणार? या देशातील वंचित, गरीब, कष्टकरी, मागासवर्गीयांनाच डॉ. बाबासाहेबांनी घटनेत सर्वांना शिक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले होते. मग देशातला मोठा वर्ग शिक्षणापासून दूर का ठेवला जात आहे? या परिस्थिती विरोधात आम्ही प्रश्न विचारणारच, असे सांगत त्यास तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर म्हणा, असेही कन्हैयाकुमार यावेळी म्हणाले.सभेच्या प्रारंभी प्रदीप नागापूरकर यांनी प्रास्ताविक, फारुख अहेमद यांनी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन नयन बाराहाते यांनी तर आभार रमेश सोनाळे यांनी मानले.

Saturday 25 August 2018

ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थीनिनी साजरा केला 'सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्प


देवरी: 25
आईएसओ मानांकन प्राप्त आणि आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनींनी ' सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्पांतर्गत देवरी पोलीस स्टेशनला भेट दिली. सदर प्रकल्पाचे आयोजन विविध शालेय संकल्पना आणि शैक्षणिक उपक्रमासाठी आद्य कर्तव्य समजणारे शाळेचे प्राचार्य सुजित टेटे  यांनी रक्षाबंधनाचा पार्श्वभूमी वर केले. मागील 3 वर्षापासून  सदर उपक्रम ब्लॉसम स्कुल पोलीस स्टेशन देवरी येथे राबवत आहे.
विद्यार्थिनीची शिक्षणातील प्रगती आणि  समाजातील स्थान निर्भीड व्हावे तसेच पोलीस विभागाची सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने ब्लॉसम स्कुल मध्ये 'सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
सदर प्रकल्पाला यशस्वीरूप देण्यासाठी देवरीचे कर्तव्यदक्ष आणि विध्यार्थी प्रेमी पोलीस अधिकारी कमलेश बच्छाव, पवार, आणि नितीन शिरपूरकर  यांनी प्रत्येक्षात  प्रत्येक विभागाची माहिती तसेच विविध कक्ष तसेच पोलीस विभागाची कार्यप्रणाली सविस्तररित्या पटवून दिली. सक्षम बालिका घडविण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था  या गोष्टीचे ज्ञान शालेय जीवनात आवश्यक आहे त्यामुळे पोलीस खात्याची माहिती  भीती दूर करणे काळाची गरज आहे. पोलीस खाते म्हणजे समाजाचे एक घटक! चोवीस तास समाजाची सेवा करत असतांना सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाही. रक्षाबंधांच्या पर्वावर हि भेट आयोजित केल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून स्नेह द्विगुणित केला. या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी  विद्यार्थिनी दाखविलेल्या स्नेहाने भारावून गेले. विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेची हमी यावेळी देण्यात आली.
या भेटीला मूर्तरूप देण्यासाठी पोलीस कर्मचारी, सचिव निर्मल अग्रवाल, शिक्षक नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, वैशाली टेटे, वैशाली मोहुर्ले, हर्षदा चारमोडे, विश्वप्रित निकोडे आदी शिक्षकांनी  मोलाचे सहकार्य केले.

Friday 24 August 2018

मुल्लाच्या तंमुस अध्यक्षपदी रामभाऊ गौपाले

नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत करता सरपंच व पदाधिकारी

देवरी,दि.२४- देवरी तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायतीमधील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामभाऊ गौपाले यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सरपंच कृपासागर गौपाले यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे.
सविस्तर असे की, गेल्या काही वर्षापासून मुल्ला येथील गाव तंटामुक्त समितीची निवड अनेक वेळा वादग्रस्त ठरली होती. परिणामी, या समितीचे अध्यक्षपद वादातीत बनले होते. परंतु, काल गुरुवारी (दि.२३) रोजी झालेली ग्रामसभा अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पडली. सभेच्या शेवटी पुन्हा अध्यक्ष निवडीचा प्रश्न समोर आला. यावेळी रामभाऊ गौपाले आणि जगतराम कुरसुंगे यांची नावे समोर आली. मात्र, यावेळी ग्रामसभेने सार्वमताने कुरसुंगे यांचे नाव फेटाळून लावल्याने श्री गौपाले यांची तंमुस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवडून आल्याने श्री गौपाले यांचे सरपंच कृपासागर गौपाले, उपसरपंच सीमा नाईक, तंमुस अध्यक्ष गुणीराम वैद्य, राजू खोटेले,नेतराम वघरे,प्रभा वंजारी,रत्नकला नंदागवळी,चंदन घासले,छन्नू कांबळे,संगीता नागोसे,ग्रामसेवक वैष्णव, सर्व समित्यांचे पदाधिकारी आणि गावकèयांचे अभिनंदन केले. नवनियुक्त अध्यक्षांनी समस्त गावकèयांचे आभार मानत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Tuesday 21 August 2018

नाभिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोहन क्षीरसागर



गोंदिया,दि.21 -    नुकत्याच गोंदिया येथे पार पडलेल्या नाभिक समाज संघटनेच्या जिल्हा बैठकित जिल्हाध्यक्ष पदावर सोहन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने हे होते.   या बैठकीत समजाची स्थिती आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  दरम्यान,  विद्यमान जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावार कार्यकारीणीच्या पुढील आदेशापर्यत उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
 यावेळी चेतन मेश्राम,  सुरेश चन्ने,  सतिश साखरकर, घनश्याम मेश्राम,  अशोक लांजेवार, वासू भाकरे,  दुलिचंद भाकरे,  रविंद्र चन्ने,  महेश उरकुडे,  सुशील उमरे, गोंदिया तालुका  प्रदीप लांजेवार,  आलोक लांजेवार,  चुन्नीलाल सूर्यवंशी, संतोष लक्षणे,  संगीता वाडकर,  मनिष उरकुडे,  महेश उरकुडे,  तेजलाल चन्ने, हेमंत कौशिक इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 
   प्रास्ताविक आणि संचालन जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी तर आभार तालुका उपाध्यक्ष प्रदीप लांजेवार यांनी मानले.

अंनिस व समविचारी संघटनेचे ‘जवाब दो’ आंदोलन

गोंदिया,दि.20: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकरूला अजूनपर्यंत अटक न झाल्याने गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, २० आॅगस्ट रोजी अंनिस व समविचारी संघटनेने धरणे देऊन ‘जवाब दो’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदियाद्वारे २० आॅगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष माणिक गेडाम यांच्या नेतृत्वात रमाकांत खोब्रागडे, कार्याध्यक्ष विनोद बन्सोड,डॉ. माधोराव कोटांगले,सचिव डॉ. सविता बेदरकर, युवा कार्यवाह अ‍ॅड. अमित उके यांचे मार्गदर्शनात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अर्ध्व्यु डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला ५ वर्षे उलटूनही तसेच जेष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्याही हत्येला साडे तीन वर्षे पुर्ण झाले असलेतरी अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनातर्फे या दोघांच्याही हत्येकर्यांची रेखाचित्र प्रसिद्ध करूनही अजूनपर्यंत अटक न झाल्याने कुठेतरी शासन या कार्यास प्रवृत्त करणारे सुत्रधार सनाथन संस्था व हिंदू जनजागरण समितीच्या साधकांचा आरोप व पत्रात सहभाग असल्याची स्पष्टपणे नमूद करण्यात आले असले तरी शासनाचे अक्ष: दिरंगाई व राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव जाणवत असून तसेच खुनाच्या तपासात समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या बळकटीसाठी आवश्यक ठोस पुरावे व फरार गुन्हेगारांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले असून या परिस्थितीत फरार मारेकºयांच्या विरोधात अंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस तपास यंत्रणांकडून यांच्यावर बक्षीस आणि छायाचित्र जाहीर करूनही याचा काही उपयोग झाला नसून राज्यात अल्पसंख्यांक, दलित, मागासवर्गीय महिला व बालिका यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असहिष्णूततेचे देशभरात वर्तन होत असून जनसामान्यमध्ये भयग्रस्त वातावरण निर्माण करणारे तसेच भारतीय संविधानाला धक्का पोहोचवून संवैधानिक व्यवस्था मोडकळीस आणण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त होत असून या सर्वांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारीन पक्ष संघटनांतर्फे विरोध दर्शविण्यात येत असून याबाबत शासनाने खुलासा करावा व डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येकºयांना त्वरित अटक करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी माणिक गेडाम, रमाकांत खोब्रागडे, विनोद बन्सोड, डॉ. माधव कोटांगले, प्रा. सविता बेदरकर, अ‍ॅड. अमित उके, कॉ. मिलिंद गणवीर, अनिल गोंडाणे, मनोज बोरकर, नरेश चव्हाण, सुरेश सोनवाने, पल्लवी रामटेके, डी.टी. कावळे आदी उपस्थित होते.

हैद्राबाद-गडचिरोली आशियाड बस नाल्यात कोसळली

अहेरी,दि.20 : मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र नदी नाल्यांना पूर आलेला आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळल्याची घटना आज घडली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.आलापल्ली-जिमलगट्टा मार्गावरील नंदीगावजवळच्या जिमेला नाल्यावर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली डेपोची ही बस नेहमीप्रमाणे सकाळी हैदराबादवरून निघाली. दुपारी 3.30 च्या सुमारास ती अहेरीत व नंतर गडचिरोलीत पोहोचते. मात्र, सततच्या पावसामुळे सोमवारी या बसला उशिर झाला. अहेरीला पोहोचण्याआधीच जिमेलाच्या नाल्यावरून थोडे पाणी वाहात असताना चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि पुलाचा काही भाग तुटलेला असल्याने ही बस एका बाजुने नाल्यात कोसळली. सुदैवान, ती झाडाला अडली होती. याबाबत माहिती मिळताच काळीपिवळी जीपचे चालक आणि नंदीगावच्या लोकांनी धावपळ करुन लांब दोरखंड आणि ट्रॅक्टरची व्यवस्था केली. त्याच्या सहाय्याने बसमधील 10 ते 25 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

भामरागडसह अनेक गावे जलमय

गडचिरोली,दि.20: जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी व नाल्यांना पूरआला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 मुलचेरा तालुक्यातील दिना नदीला पूर आला. त्यामुळे मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. किष्टापूर नाल्याच्या पलीकडे १२ गावे आहेत. पुरामुळे याही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्याबरोबरच छत्तीसगड राज्यातही रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भामगरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व छत्तीसगड सीमेलगत वाहणाऱ्या इंद्रावती या तीनही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहेत. पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने घर व दुकानातील वस्तुंचे नुकसान झाले आहे. संपूर्ण भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या नाल्यांना पूर आल्याने सदर मार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गसुद्धा बंद पडला आहे. गडचिरोली शहरातील सकल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

Monday 20 August 2018

अवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी




या अगोदरच्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसने  वैभव राऊत , सुंधवा गोंधलेकर आणि शरद कळसकर यांना अटक केली होती. चौकशी दरम्यान श्रीकांत पांगारकर याचे नाव समोर आल्याने त्यास जालना येथून अटक करण्यात आली होती. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले की आरोपी श्रीकांत हा प्रशिक्षत आरोपी असून त्याने घातपात घडविण्यासाठी कुठून प्रशिक्षण घेतले याचा तपास करणे गरजेचे आहे , या बरोबरच या आगोदरच्या अटक आरोपीना श्रीकांत पांगारकर याने आर्थिक मदत केली होती. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना काही कागदपत्रे व एक हार्ड डिस्क आढळून आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. श्रीकांत पांगारकरने  राज्यातील काही ठिकाणांची रेकी केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत अटक केलेले आरोपी हे छोटे प्यादे असून या सर्वांचा मास्टरमाइंड पकडला जाणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी म्हंटले आहे.

पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड



गोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या हिमालयीन बायोसाइट्स टेक्नॉलॉजी संस्थान (आयएचबीटी), पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे सहाय्यक वैज्ञानिक या पदावर निवड झाली आहे.पोलीस हवालदार रहमतकर यांनी आपले कर्तव्य बजावतांना मुलांना उच्चशिक्षणाचा दिलेल्या मुलमंत्राबद्दल त्यांचे व मुलाचे अभिनंदन गोंदिया पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधिक्षक हरिष बैजल,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,रामनगरचे पोलीस निरिक्षक,गंगाझरीच्या पोलीस निरिक्षक शितल जाधव यांच्यासह सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.

रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी

नागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयशा शेख असे आरोपी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.दरम्यान आयशा शेख यांनीही आपल्याला सदर एजंटाने डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलिस शिपाई आयशा शेख हिने पुण्याला जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करायची होती. त्यासाठी ती शनिवारी दुपारी मानकापुरातील कुणाल हॉस्प्टिलमसमोर असलेल्या “6-टेन’ नावाच्या कार्यालयात गेली होती. तिने 1,700 रुपयांची रेल्वेची तिकीट बूक करण्यासाठी एटीएम कार्ड स्वॅप केले. त्यानंतर ती घरी पोहोचली. दरम्यान, तिच्या मोबाईलवर 15 हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे ती आई, बहीण आणि अन्य नातेवाइकांसह एजेंटच्या कार्यालयात पोहोचली. त्याच्यावर 15 हजार रुपये अतिरिक्‍त काढल्याचा आरोप केला. त्यामुळे एजेंट आणि आयशा यांच्यात “तू-तू-मैं-मैं’ झाली. त्यानंतर मात्र आयशाने जोरदार भांडण करीत एजेंट पुष्पेंद्र सिंह पशुपतिनाथ सिंह (रा. जयहिंदनगर) यांच्या डोक्‍यावर डीओची बाटली मारून जखमी केले. पैशाची मागणी केली. मात्र, पुष्पेंद्र सिंह यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आयशाने पुष्पेंद्र यांच्या काउंटरमधून 500 रुपयांच्या नोटेचे बंडल बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पुष्पेंद्र यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहाला गुन्हा दाखल केला. एका सामाजिक संघटनेच्या आठ ते दहा तरुणांनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी

नांदेड : दि.19–गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचा जमिनी खरडून गेल्या आहेत.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करतांना शेतातील पिके व शेतजमिन यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोन दिवसापासून चालू मुसळधार पावसामूळे माहूर,कीनवट, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावाचे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतक-यांचे अन्नधान्य, रासायनिक खते, शालेय विद्यार्थ्याची पुस्तके,भांडे,कपडे व इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहे.घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. याकडे मात्र अद्यापही प्रशासनाने फिरकुनही पाहिले नाही.नुकसानग्रस्त भागाची त्वरीत पाहणी करून तात्काळ पंचनामा करून शेतक-यांना तात्काळ मदत किमान हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. पुरामुळे नदीकाढच्या गावात सर्वत्र चिखल पसरला असल्याने पिण्याचे पाणी दुषीत झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती आहे.यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करावे,शेतजमीन व पिकांचे स्वतंत्र सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करावे.जमीन खरडून गेल्याने शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासनाने सर्वेक्षनाचे काम त्वरीत सुरू करून शेतकरी व बेघर झालेल्या ग्रामस्थांना आधार द्यावा अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.यावेळी विनीत पाटील हरडफकर,प्रशांत पाटील आबादार,रामदास पाटील,संदीप पावडे,शिवशंकर थोटे,श्रीकांत शिंदे, परमेश्वर काळे,सुनील पाटील,अरविंद पाटील कदम,शंकर राऊत, अमोल शिंदे,पंकज टनमने,दिनेश जाधव,कुलभूषण ठाकरे,आदित्य पाटील,यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे – जयंत पाटील

गोंदिया,दि.19: पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पूर्व विदर्भाच्या दौरुयावर आलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रविवारी गोंदिया येथे आयोजित पक्षातील सर्व घटकांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत बुथ कमिटी निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले.
ते येथील नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियममध्ये आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते.मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, आमदार प्रकाश गजभिये, ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवनकर, जिला अध्यक्ष पंचम बिसेन, नरेश माहेष्वरी, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिनखेडे,राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, किशोर तरोणे, केतन तुरकर, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे, गणेश बरडे, अशोक सहारे, प्रवीण कुंटे पाटील, जानबा मस्के, वंदना बोरकर, कुंदन कटारे, बालकृश्ण पटले, केवल बघेले, डाॅ. अविनाष काशीवार, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, प्रेमकुमार रहांगडाले, जिब्राईल पठान, लोकपाल गहाने, कमलबापू बहेकार, तुकाराम बोहरे, देवचंद तरोणे, निता रहांगडाले आदि मंचावर उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात मंचावर प्रदेशाध्यक्षांच्या शेजारी जिल्हाध्यक्षांना बसण्याचा मान न मिळता त्यांना मंचावरील शेवटच्या खुर्चीवर बसावे लागल्याने या पक्षात जिल्हाध्यक्षाची भूमिका कुठे असते हे या चित्रावरून बघावयास मिळाले.
कार्यकर्ता मेळाव्यात  बोलतांना पाटील म्हणाले की राज्यातील सर्व जिल्हयामध्ये पक्ष स्थिती व कामाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आज गोंदिया जिल्हयाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्षाची ताकद बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्वच सेलवर अधिक भर देण्यात येणार आहे. जिला व तालुका कार्यकारिणी घोषणा लवकरच केली जाईल असे ते म्हणाले. जिल्हयातील प्रत्येक गावात बुथ कमेटी तयार करण्यात येणार आहे. बुथाावर किमान 15 ते 20 कार्यकर्ते निर्माण केले जातील. बुथ सदस्यांची नोंदणी आणि अचुक माहितीसाठी अॅप विकसित केले असुन त्या माध्यमातुन कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क केला जाईल, असे ते म्हणाले.
सम्मेलनात ते पुढे म्हणाले विदर्भातील या भागात धानाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जात असून धानाचा दर शेतकर्यांना कमी मिळतो. त्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. विरोधी पक्षात असतांना धानाच्या पिकासाठी भाजप कडून 3200 रुपयांची मागणी होत होती. आता सत्त्तेत आल्यानंतर भाजप सरकार धानाला का भाव देत नाही ? असा सवाल त्यांनी केले.  मेळाव्याला उपस्थित माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार मधुकर कुकडे, जिला अध्यक्ष पंचम बिसेन व अन्य पदाधिकार्यांंनी संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन जि.प. पक्षनेता गंगाधर परशुरामकर व माजी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिनखेडे यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष अशोक सहारे यांनी मानले.

संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप

गोंदिया,दि.19ः -देशात भाजपाच्या सोयीचे राजकारण सुरू आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधानाची प्रत जाळली जाते, आंबेडकरांविषयी अवमानजनक विधान केले जाते. मात्र, त्या समाजकंटकांवर कोणतीही कारवाई होत नाही.  यावरून या देशाचे राजकारण कोणाच्या हिताचे आहे, संविधान जाळण्यामागे भाजपाचे हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले. ते नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित  पत्रपरिषदेत बोलत होते.
७० वर्षांत रुपयाचे अवमूल्यन झाले नाही. तेवढे रुपयाचे अवमूल्यन मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. आजपर्यंत रुपयाचे अवमूल्यन कधीच एवढया निच्चांकी पातळीवर आले नाही. जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, नोकर्यांची स्थिती गंभीर आहे. गेल्या चार वर्षात देशातील जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. शेतकNयांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही या सरकारने दिली होती. मात्र, अद्याप ते सरकारला जमले नाही असे सांगत देशात शेतकNयांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. मात्र, दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी सत्तेचा मोह कधीच बाळगला नाही. वाजपेयी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते असे सांगत त्यांनी वाजपेयी यांची भाजपाला उणीव जाणवेल असे ते म्हणाले. राज्यात आमची सत्ता  असताना भाजपाने ३२०० रूपये समर्थन मुल्य देण्याची मागणी केली होती. मात्र, जेव्हा भाजपाची सत्ता वेंâद्रात व राज्यात असतानादेखील धानाला अद्यापर्यंत समर्थन मुल्य मिळू शकले नाही. ऐवढेच नाही तर आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकNयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु भाजपा सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रा काढल्यानंतर दबावात येवून फसवी कर्जमाफी जाहीर करूनही अद्यापसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित  आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून येत्य २०१९ निवडणुकीत जनताच भाजपाला धडा शिकवेल असे त्यांनी सांगितले.

रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात

गोंदिया,दि.19 :   कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून गडचिरोली जिल्ह्यात नेण्यासाठी अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकावरुन रेल्वेगाडीत चढलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने  शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) रंगेहात पकडले. तिघांना अटक करून त्यांच्याकडील नऊ हजार ७२४ किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. हे तिघेही युवक गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुची तस्करी केली जाते. यासाठी दारुची तस्करी करणारे वेगवेगळे मार्ग अवलंबित आहे. दारुची तस्करी करणाऱ्यांनी आता आपली नजर रेल्वे गाड्यांकडे वळविली आहे. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडीतून सामानाच्या टोपली व कॉलेजबॅगमधून दारुची तस्करी करीत असल्याच्या घटना सुध्दा यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. दरम्यान रेल्वे पोलिसांनी या गाड्यांमधील गस्त वाढविली असून दारुची तस्करी करणाºयावर बारीक नजर ठेवली आहे. स्पेशल टास्क टीमचे उप निरीक्षक विवेक मेश्राम, प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, आरक्षक पी.एल.पटेल, गुन्हे शाखेचे उप निरीक्षक एस.एस.बघेल, प्रधान आरक्षक आर.सी.कटरे शनिवारी (दि.१८) गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत नजर ठेवून होते. दुपारी १२ वाजतादरम्यान अर्जुनी रेल्वे स्थानकावर त्यांना तिघेजण वजनदार कॉलेज बॅग घेऊन संशयीत अवस्थेत गाडीत चढताना आढळले. यावर टीमने तिघांना पकडून त्यांची नावे विचारली असता त्यांनी रमेश गजानन खोब्रागडे (४०,रा.खरपुंडी बोरिंग,गडचिरोली), नितेश उर्फ बाल्या कवडू गेडाम (३२,रा.ढिमर मोहल्ला, गडचिरोली) व संतोष उर्फ गुड्डू नानाजी भोयर (३१, ढिमर मोहल्ला, गडचिरोली) असे सांगीतले. टीममधील कर्मचाºयांनी विचारपूस केली असता तिघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात रमेश खोब्रागडे याच्याकडील दोन बॅग व एका थैलीत देशी दारूच्या ९० मिलीच्या १८८ बॉटल्स, नितेश गेडामकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ९७ बॉटल्स तर संतोष भोयरकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ८९ बॉटल्स सापडल्या. दरम्यान, या तिघांची उलट तपासणी केली असता त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथून दारू खरेदी करून गडचिरोली येथे अवैध व्यापार करीत असल्याचे सांगीतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अर्जुनी ते वडसापर्यंतचे रेल्वेचे तिकीट आढळले. मात्र दारूची वाहतूक करण्यासाठी कोणतेही अधिकार पत्र मिळाले नाही. यावर टीमने तिघांना ताब्यात घेत वडसा येथून गोंदियाला आणले. तसेच त्यांच्याकडील एकूण नऊ हजार ७२४ रूपये किमतीच्या देशी दारूच्या ३७४ बॉटल्स पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले.

गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात




गोंदिया,दि.19 – शेजारील मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील बालाघाट-बैहर राज्यमार्गावर असलेल्या निसर्गरम्य इकोटुरिझम गांगुलपारा येथील जलाशयात गोंदियातील चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला उघडकीस आली आहे.त्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह पोलीसांना मिळाले असून हे मृतदेह घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर आढळून आले आहेत.तर चौथ्या तरुणाचा शोध अद्यापही लागलेला नाही.यामध्ये मृतकमध्ये गोलू राठौर(२३), दुर्गेश भूसे (२३), विल्सन विजय मदारे (१९) यांचा समावेश आहे.

Sunday 19 August 2018

तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक


देवरी, दि.19- गोंदिया येथे नुकत्याच पार पडलेल्या 13व्या जिल्हा स्तरिय तायक्वांडो स्पर्धेत देवरीेच्या योजन  कावळे याने सुवर्णपदक पटकावले.

गोंदिया येथे नुकत्याच 13 व्या तायक्वांडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन  केले. यामध्ये योजन धनवंतराव कावळे या विद्यार्थ्याने स्वर्णपदक तर विनित कमलेश पालीवाल या विद्यार्थ्यांने कास्यपदक पटकाविले. यो दोन्ही बालकांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या माता-पित्यांसह आपले शिक्षक आणि प्रशिक्षक स्वप्नील ठाकरे, अमित मेश्राम व पुरुषोत्तम बागडे यांना दिले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मान वाढविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा


गडचिरोली,दि.19ः देशाला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे पूर्ण झाले. परंतु ५४ टक्के एवढया मोठया संख्येने असणार्‍या ओबीसी समाजाचे प्रश्न मात्र अजूनपर्यंत सुटलेले नाहीत. ही खेदाची बाब आहे. भारतीय राज्य घटनेने कलम ३४0 नुसार ओबीसींना एस. सी., एस. टी. प्रमाणे घटनात्मक दर्जा दिलेला आहे. असे असतानासुध्दा एस.सी., एस. टी. प्रमाणे ओबीसींना घटनेने दिलेले अधिकार नाकारल्या जाते. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जात नाही. मंडल आयोगाची शिफारस असतानासुध्दा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा स्तरावर आर्शमशाळा, निवासी शाळा सुरू केल्या जात नाहीत. ओबीसी विद्यार्थ्यांना एस. एसी., एन. टी. प्रमाणे १00 टक्के शिष्यवृत्ती, फ्रीशिप दिली जात नाही. गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील घटनाबाह्य पध्दतीने ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत केले जात नाही, अशा विविध घटनात्मक मागण्यांबाबत शासन स्तरावर आपण प्रयत्न करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जातनिहाय जनगणना २0११ मधील ओबीसी समाजाची जनजणना निश्‍चित करून जाहीर करण्यात यावे, महामहीम राज्यपाल यांनी काढलेल्या ९ जून २0१४ च्या नोकर भरती अधिसूचेनेत सुधारणा करण्यात यावी व स्थानिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, ज्या गावात गैरआदिवासींची लोकसंख्या ५0 टक्के पेक्षा जास्त आहे, अशी गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळण्यात यावीत, गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्र व वनहक्कातील तलाव कार्यक्षेत्रातील स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना शासन नियमानुसार योग्य रक्कम घेऊन देण्यात यावी, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांचे अंतर्गत असणार्‍या आर्शमशाळा व वसतिगृहात ३0 टक्के जागा ओबीसी विद्यार्थ्यांना राखून ठेवण्यात याव्यात, गडचिरोली जिल्ह्यातील घटनाबाह्य पध्दतीने ओबीसींचे कमी केलेले आरक्षण सर्व पदासाठी पूर्ववत करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ईश्‍वर बाळबुध्दे, सुरेश सा. पोरेड्डीवार, दादाजी चापले, दादाजी चुधरी, विनायक झरकर, बाबुराव बावणे, खोब्रागडे उपस्थित होते.

बुधवारी काम बंद आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर,दि.19ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो ठेकेदारी कामगार व कर्मचार्‍यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आलेले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट पयर्ंत कामगारांना थकित पगार न दिल्यास बुधवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळामध्ये प्रहारचे निशा निरगुडे, सतीश खोब्रागडे, सतीश सांबर, चिंचकर, प्रज्ञा अलीकडे, सतीश घोनमोडे, दिनेश कंपू, किशोर महाजन, देवराव हटवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
थकित वेतन तातडीने मिळण्याच्या मागणीकरिता प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांनी विनावेतन एक तास काम करून एक अभिनव आंदोलन सुद्धा केले होते. परंतु अजून पयर्ंत कामगारांचे थकीत वेतन अदा करण्यात आलेले नाही. याबाबत कामगारांच्या एका शिष्टमंडळाने नगरसेवक देशमुख यांचे नेतृत्वात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.अर्थमंत्र्यांना कामगारांतर्फे एक निवेदन देण्यात आले. सरकारी विभागांमध्ये कार्यरत सर्वच ठेकेदारी कामगारांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते. परंतु अत्यल्प पगारावर शासनाला सेवा देणार्‍या कंत्राटी कामगारांचे वेळोवेळी वेतन थकीत करण्यात येते.
या कामगारांना परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.मागील चार महिन्यापासून मेडिकल कॉलेजमध्ये ठेकेदारी कामगार व कर्मचार्‍यांचा पगार थकीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे.शाळा सुरू झाली, परंतु मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी पगार नाही अशी परिस्थिती या कामगारांची झालेली आहे.कामगारांनी रचनात्मक आंदोलन करून या समस्येकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही उचित कार्यवाही अजून पयर्ंत करण्यात आलेली नाही. ही बाब कामगारांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सरकारी विभागातील सर्वच ठेकेदारी कामगारांचे नियमितपणे वेतन देण्याचे धोरण आखावे अशी मागणी प्रहारचे जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांनी केली.
मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कामगारांच्या थकीत वेतनची उचित चौकशी करून कारवाई करण्याची तसेच शासनाच्या सर्वच विभागातील ठेकेदारी कामगारांना नियमित वेतन देण्याचे धोरण आखण्याचे आश्‍वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार



गोरेगाव,दि.19 - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन सुमारे ५0 च्या वर विद्यार्थ्यांना नवोदयसारख्या परीक्षेत उत्तीर्ण करणारे सोनी जिल्हा परिषद शाळेतील सहायक शिक्षक संजय वैद्य यांचा १५ ऑगस्ट रोजी पोलिस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागील १२ वर्षांच्या काळात शिक्षक वैद्य यांनी परिश्रम घेऊन अनेक विद्यार्थी घडविले. राहणीमानापासून ते शिस्त, अक्षरवळण एवढ्यावरच न थांबता स्कॉलरशीप व नवोदयसारख्या कठीण परीक्षेसाठी विद्यार्थी तयार केले. विशेष म्हणजे, सन २0१७-१८ या वर्षात वरिष्ठ पूर्व माध्यमिक शाळा परसोडी येथील एकाच वगार्तील ९ विद्यार्थ्यांची त्यांच्याच मार्गदर्शनात नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. अशा या कार्यकर्तृत्त्वाचे सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज

गोंदिया,दि.19ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नमाद महाविद्यालयातील ऑडोटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
 या मेळाव्याला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प. गटनेते गंगाधर परशुरामकर, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, अशोक गुप्ता, किशोर तरोणे, केतन तुरकर, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जि.प., पं.स., नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

देवरी,दि.19ःःग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. गोंदिया अंतर्गत उपविभाग देवरीच्या वतीने शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात देवरी तालुक्यातील शिरपुरबांध, भर्रेगाव, पिंडकेपार व सावली या गावात नवीन नळ योजनेचे भूमिपूजन सोहळा १४ ऑगस्ट रोजी पार पडला.
भूमिपूजन आ. संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, दीपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, पं.स.सदस्य मेहतरलाल कोराम, महेंद्र मेश्राम, सरपंच नरसिंह फन्डकी, उपसरपंच दुर्योधन शिवणकर, भर्रेगावचे सरपंच विद्या खोटेले, उपसरपंच मनोज मिरी, पिंडकेपारच्या सरपंच प्रमिला घासले, उपसरपंच येनु घोगारे, सावलीचे सरपंच प्रभुदयाल पवार, उपसरपंच नीलेश शेंडे, पोलिस पाटील चंद्रसेन रहांगडाले, देवरीचे नगरसेवक यादवराव पंचमवार तसेच चारही गावातील ग्रा.प.सदस्य व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या चारही गावात एकूण १ कोटी ७७ लाख रुपयाचे निधीतून नळ योजनेचे काम केले जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन एस.व्ही. पवार यांनी तर आभार शाखा अभियंता पी.एम. मानकर यांनी मानले.

Saturday 18 August 2018

संविधान जाळणाºयांवर त्वरित कारवाई करा

आमगाव,दि.18 : दिल्ली येथील जंतर मंतर येथे ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही समाज विरोधी कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या संपूर्ण प्रकराचा येथील समाजबांधवानी निषेध नोंदविला. संविधानाचा अपमान करणाºया कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असे असताना काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाची होळी करण्याचे देशद्रोही कृत्य केले. भारतीय संविधानाला जाळणाºया व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या विकृत मानसिकतेच्या समाजकंटकाविरोधात प्रिव्हेशन आॅफ इन्सल्ट आॅफ नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१ अ‍ॅन्ड १०२४ ए आयपीसी नुसार कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात भारतीय बौद्ध महासभेचे भरत वाघमारे, बामसेफ कर्मचारी संघटनेचे मिलिंद पंचभाई, समता सैनिक दलाचे आनंद बन्सोड, हलबा हलबी आदिवासी संघटनेचे वाय. सी. भोयर, भीम गर्जना संघटनेचे निखिल मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव राजेंद्र सांगोळे, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राम्हणकर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष विनायक येडेवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संदिप मेश्राम, यंग मुस्लिम विकास कमिटीचे मुस्ताकभाई व वाय.के. रामटेके उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कारवाई करुन अटक करण्यात यावी. अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.
या वेळी दिलेल्या निवेदनातून भारताचे स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रध्वजासाठी हजारो भारतीय व शूर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र काही विकृत मानसिकेतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी करुन देशद्रोही कृत्य केले. अशा देशद्रोहींना त्वरीत अटक करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी दिला. शिष्टमंडळात माजी आ.दिलीप बंसोड, माजी म्हाडा सभापती नरेशकुमार माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प.सदस्य सुकराम फुंडे, राजेश भक्तवर्ती रविंद्र मेश्राम, महिला अध्यक्ष कविता रहांगडाले, विद्यार्थी सेल अध्यक्ष प्रफुल ठाकरे, महामंत्री देवेंद्र मच्छिरके, मुक्तानंद पटले, सचिव संतोष श्रीखंडे, संजय रावत, रवी क्षिरसागर, निखिल पशिने, प्रमोद शिवणकर, सिताराम फुंडे, शिवचरण शिंगाडे, रमन डेकाटे, उमेश भोंडेकर, राहुल रामटेके, तुंडीलाल कटरे, मयूर मेश्राम, अनिल चोखांद्रे, केशव भिमटे, मनोज डोंगरे, शिला हजारे, टिकाराम मेंढे, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, प्रकाश राऊत, किशोर रहांगडाले, गेंदलाल यावलकर यांचा समावेश होता.


त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा


देवरी : ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतरवर काही असामाजिक तत्वांच्या लोकांनी संविधानाच्या विरोधात घोषणा देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच संविधानाच्या प्रती जाळल्या. हे देश विरोधी कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन येथील मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटी व तालुक्यातील बौद्ध समाजबांधवांतर्फे देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांना दिले.
शिष्टमंडळात मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष राजू देशपांडे, उपाध्यक्ष मधू शहारे, सचिव भाऊराव रंगारी, कोषाध्यक्ष राजू मडामे, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, महिला व बाल कल्याण सभापती सीता रंगारी, नगरसेविका भूमिका बागडे, प्रतिमा देशपांडे, माधुरी मेश्राम, वसुधा देशपांडे, तारेश मेश्राम, रुपचंद जांभुळकर, गोपाल राऊत, प्रदीप रामटेके, मधुकर साखरे, सुरेंद्र कानेकर, प्रशांत उके, प्रशांत मेश्राम, महेश अंबादे, सुबोध देशपांडे, बन्सोड, खोब्रागडे यांचा समावेश होता.

डोंगरगावातील आपादग्रस्तांसाठी प्रभावी उपाययोजना करा- टोलसिंह पवार



माजी जि.प.अध्यक्षांनी केली आर्थिक मदत

देवरी,दि.17- देशात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव केला जात असताना निसर्गाने देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांवर अवकृपा केली. या निसर्गाच्या तडाख्यामध्ये ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशा प्रसंगी शासन-प्रशासना कडून डोंगरगाववासींना मदतीची अपेक्षा आहे. शासनाने या संकटावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. एक-दोन वेळचे जेवण वा एकदोन ताडपत्र्यांनी ग्रामस्थांची समस्या सुटणारी नाही. सतत होणाऱ्या नापिकीमुळे पिचलेला शेतकरी आणि पावसाळ्यामध्ये बेरोजगार असलेल्या गावकऱ्यांना तीन-चार महिने कसे जगता येईल, यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय कॉंग्रेसचे वयोवृद्ध नेते टोलसिंह पवार यांनी  शासनाकडे केली आहे. दरम्यान, श्री पवार यांनी आपदग्रस्त गावकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांचे कडे सोपविली.
गेल्या बुधवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये गावातील अर्ध्यापेक्षा जास्त घरांचे छत उडाले. शेतातील फळझाडे, पिक, घरातील साहित्य यांची पूर्णतः नासाडी झाली. यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. परिणामी, ज्याघरांचे छत उडून घरातील अन्नधान्याची नासाडी झाली, त्यांचे पुढे पोटाची खळगी भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची व्यथा टोलसिंह पवार यांनी साप्ताहिक बेरारटाईम्सशी बोलताना व्यक्त केली.
या गावाला अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली आहे. प्रशासन आज सायंकाळ पर्यंत या गावात राहणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण लोकप्रतिनिधींनी केवळ राजकारणापुरते काम केल्याने होणार नाही. प्रशासनाने केलेली जेवणाची व्यवस्था वा केलेली मदत ही गरजूंपर्यंत पोचत नसल्याचे निदर्शनात आले आहे. दोन लिटर रॉकेल, एक वेळचे जेवण वा छोट्याशा 100-150 ताडपत्र्यांनी गावकऱ्यांची समस्या सुटणार नाही. तर हे ग्रामस्थ उरलेले पावसाळ्याचे तीन महिने कसे जीवन जगणार याचा विचार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने करावा. त्यांना किमान पावसाळ्यात रेशन आणि आवासयोजनेतून घरकूल या प्राथमिक गरजांची पूर्तता कशी करता येईल, याचा विचार शासनाने करून आपादग्रस्तांची मदत करण्याची मागणी श्री पवार यांनी यावेळी बोलताना केली.

आवश्यक आणि शक्य ती सर्व मदत करू- विजय बोरूडे, तहसीलदार देवरी

प्रशासन गुरुवारपासून डोंगरगावात तळ ठोकून आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात येत आहेत. या नैसर्गिक आपदेमुळे गावातील 369 घरांपैकी 267 घरे आणि 225 गोठे वादळाच्या तडाख्यामुळे प्रभावीत झाली असून यामध्ये सुमारे 45 लाख 62 हजार 740 रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासनाच्या वतीने गावातील वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रकाशाची सोय म्हणून प्रत्येकी 2 लिटर रॉकेल, 142 ताडपत्र्यांचे वाटप आणि गावकऱ्यांना जेवण आणि नास्त्याची सोय करण्यात आली आहे. मी आपादग्रस्तांना शासनाकडून शक्य होणारी सर्व मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुजाण नागरिकांनी या संकटकाळी डोंगरगाववासीयांची मदत करावी, असे कडकडीचे आवाहन सुद्धा श्री बोरुडे यांनी केले आहे. यासाठी सचिव, तलाठी आणि सरपंच यांचे संयुक्त खाते महाराष्ट्र बॅंकेत उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक लावण्यात येणार असल्याचे श्री बोरुडे यांनी सांगितले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...