Friday, 17 August 2018

देवरीचे कृषी अधिकारी नाॅटरिचेबलःडोंगरगावचे शेतकरी हतबल

गोंदिया,दि.१७ :–देवरी तालुक्यातील डोंगरगाववासीयांवर स्वातंत्र्यदिनीच निसर्गाने आपली अवकृपा दाखविली आणि होत्याचे नव्हते झाले.कष्टकरुन शेती लावणार्या शेतकर्याच्या शेतीचे अतोनात नुकसान स्वातंत्र्यदिनी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने झाले.अनं अस्मानी संकट गावकऱ्यांवर कोसळले.गावातील नागरिकांनी झालेल्या घटनेची माहिती तालुकाप्रशासनाला दिली.त्यानंतर 16 आॅगस्टला आमदार संजय पुराम यांच्यासह तहसिलदार,गटविकास अधिकारीसह सर्वच अधिकारी डोंगरगावत दाखल होऊन नुकसानग्रस्त शेती व घराची पाहणी करु लागले.परंतु ज्या कृषी विभागावर शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन अहवाल सादर करण्याची जबाबदारी असते त्या कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी मात्र एवढे बधीर झालेत की त्यांनी आजपर्यंत त्या गावात जाण्यासही वेळ मिळालेला नाही.विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनापासून या अधिकार्यांनी आपले भ्रमणध्वनीसुध्दा बंद करुन ठेवल्याचे समोर आले आहे.ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांना तेव्हा तेव्हा हे दोन्ही कृषी अधिकारी नाॅटरिचेबलच आढळून आले. वर जनतेने नाराजी प्रकट केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...