या अगोदरच्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊत , सुंधवा गोंधलेकर आणि शरद कळसकर यांना अटक केली होती. चौकशी दरम्यान श्रीकांत पांगारकर याचे नाव समोर आल्याने त्यास जालना येथून अटक करण्यात आली होती. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले की आरोपी श्रीकांत हा प्रशिक्षत आरोपी असून त्याने घातपात घडविण्यासाठी कुठून प्रशिक्षण घेतले याचा तपास करणे गरजेचे आहे , या बरोबरच या आगोदरच्या अटक आरोपीना श्रीकांत पांगारकर याने आर्थिक मदत केली होती. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना काही कागदपत्रे व एक हार्ड डिस्क आढळून आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. श्रीकांत पांगारकरने राज्यातील काही ठिकाणांची रेकी केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत अटक केलेले आरोपी हे छोटे प्यादे असून या सर्वांचा मास्टरमाइंड पकडला जाणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी म्हंटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment