Sunday, 5 August 2018

गटविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्यास शिक्षा

गडचिरोली,दि.05 : सिरोंचा येथील तत्कालीन संवर्ग विकास अधिकाऱ्यास जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
 रवींद्र मुप्पीडवार, शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. तो सिरोंचा पंचायत समितीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आहे. ही घटना आहे 16 जानेवारी 2016 ची. या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी रवींद्र मुप्पीडवार हा संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरसकोल्हे यांच्या निवासस्थानी गेला. रवींद्रने श्री. मरसकोल्हे यांना झोपेतून उठवून "माझ्याकडे प्रभार का दिला नाही', अशी विचारणा करून त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय मारण्याची धमकीही दिली. बीडीओ मरसकोल्हे यांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी मुप्पीडवार विरुद्ध गुन्हा दाखल केला. 22 ऑगस्ट 2016 रोजी मुप्पीडवार यास अटक करण्यात आली. सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 1 ऑगस्ट 2018 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाने फिर्यादी व इतर साक्षदारांचे बयाण नोंदविल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुप्पीडवार यास शिक्षा सुनावली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...