गोंदिया,दि.21 - नुकत्याच गोंदिया येथे पार पडलेल्या नाभिक समाज संघटनेच्या जिल्हा बैठकित जिल्हाध्यक्ष पदावर सोहन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने हे होते. या बैठकीत समजाची स्थिती आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावार कार्यकारीणीच्या पुढील आदेशापर्यत उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी चेतन मेश्राम, सुरेश चन्ने, सतिश साखरकर, घनश्याम मेश्राम, अशोक लांजेवार, वासू भाकरे, दुलिचंद भाकरे, रविंद्र चन्ने, महेश उरकुडे, सुशील उमरे, गोंदिया तालुका प्रदीप लांजेवार, आलोक लांजेवार, चुन्नीलाल सूर्यवंशी, संतोष लक्षणे, संगीता वाडकर, मनिष उरकुडे, महेश उरकुडे, तेजलाल चन्ने, हेमंत कौशिक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि संचालन जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी तर आभार तालुका उपाध्यक्ष प्रदीप लांजेवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment