Saturday, 4 August 2018

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे

यवतमाळ,दि.04 : शिक्षकाने आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींशी अश्‍लील चाळे केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि.3) उघडकीस आली. सतीश जाधव (वय 31) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
येथील आश्रमशाळेत ग्रामीण भागातील होतकरू मुले-मुली शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. दरम्यान, दुपारचे जेवण झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनी वर्गात फळ्यावर लिहीत असताना आरोपी शिक्षकाने मागून येऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच आरोपीने तिला मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने अधीक्षिकेकडे तक्रार केली असता आणखी दोन मुलींसोबत हा प्रकार झाल्याचे पुढे आले. त्यानंतर बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...