Monday 6 August 2018

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर के धवन यांचे निधन

Indira Gandhi's secretary, Senior Congress leader R.K. Dhawan passed away | इंदिरा गांधींचे सचिव ज्येष्ठ काँग्रेस नेते आर.के. धवन यांचे निधन
नवी दिल्ली,दि.06 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर.के.धवन यांचे आज निधन झाले, ते 81 वर्षांचे होते. राज्यसभा खासदार राहिलेले आर.के.धवन इंदिरा गांधींचे सचिवही होते. धवन यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे.

काँग्रेस नेते आर.के. धवन हे इंदिरा गांधींच्या हत्येचे प्रत्यक्षदर्शी असल्याचे बोलल्या जाते. मी गांधी कुटुंबाचा प्रामाणिक सेवक असून या कुटुंबाची निष्ठापूर्वक सेवा करण्यातच आपले जीवन समर्पित करणार असल्याचे धवन यांनी म्हटले होते. त्यामुळेच आपण उशिरा लग्न केल्याचा दावाही ते करत. धवन यांचे लग्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले होते. धवन यांना वायरल इन्फेक्शनचा आजार होता. त्यावेळी, धवन यांची सेवासुश्रूषा करण्याचे काम अचला मोहन नावाची महिला करत. मात्र, आपल्या वयाच्या 74 वर्षी धवन यांनी अचला मोहनशी विवाह केला. त्यावेळी, अचला मोहनचे वय 59 वर्षे होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...