Friday, 17 August 2018

आमगावचे बीडोओ चंद्रकांत साबळे तर गोरेगावच्या सहा.बीडीओ रोहीणी बनकर

गोंदिया,दि.१७:राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल(दि.१६) परिविक्षाधीन प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १६ अधिकाऱ्यांना पूर्णवेळ गटविकास अधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत.यामध्ये गोरेगाव पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी पदी रोहीणी बनकर,आमगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून चंद्रकांत साबळे, कुणाल उंदिरवाडे यांची गडचिरोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विकास सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी गट ‘अ’ आणि सहायक गटविकास अधिकारी गट ‘ब’ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा २०१५ द्वारे निवड होऊन अनुक्रमे यशदा व वनामती या प्रशिक्षण संस्थांमध्ये दाखल झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यांची ज्येष्ठता निश्चित करुन पदस्थापना करण्यात आली आहे. पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये(नियुक्तीच्या पंचायत समितीचे ठिकाण कंसात दिले आहे) प्रशांत काळे(श्रीगोंदा, जि.अहमदनगर), राहुल म्हात्रे(तलासरी, जि.पालघर), राघवेंद्र घोरपडे(धुळे, जि.धुळे), समाधान सोनावणे(श्रीरामपूर, जि.अहमदनगर), उदयसिंह राजपूत(जाफ्राबाद, जि.जालना), प्रवीण सिनारे(श्रीवर्धन, जि.रायगड), श्रीकृष्ण वेणीकर(घनसावंगी, जि.जालना), प्रवीण सुराडकर(गंगाखेड, जि.परभणी), सचिन पानझडे(नांदुरा, जि.बुलढाणा),सुशील संसारे(कळंब, जि.पालघर), चंद्रकांत साबळे(आमगाव, जि.गोंदिया), कुणाल उंदिरवाडे(गडचिरोली, जि.गडचिरोली), विवेक जमदाडे(आर्वी, जि.वर्धा), शंकर धोत्रे(अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती), शशिकांत सोनावणे(जळगाव, जि.जळगाव), प्रणाली खोचरे(पातूर, जि.अकोला) यांचा समावेश आहे.
याशिवाय सहायक गटविकास अधिकारी गट ‘ब’ म्हणून रघुनाथ पांढरे(मोखाडा, जि.पालघर), शेखर देशमुख(सिरोंचा, जि.गडचिरोली), रोहिणी बनकर(गोरेगाव, जि.गोंदिया), प्राजक्ता भस्मे(ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), धीरज पाटील(लाखनी, जि.भंडारा),शरद कोकाटे(रिसोड, जि.वाशिम), स्वप्नील मगदूम(देसाईगंज,जि.गडचिरोली), सूरज मोहोर(गडचिरोली, जि.गडचिरोली)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांची नियुक्ती रिक्त पदांवर करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...