Friday, 31 August 2018

माथनी टोलनाक्यावर अवैध रेती नेणाऱ्या 8 वाहनावर कारवाई

मौदा,दि.31 (प्रा.शैलेश रोषनखेडे) -ः  नागपूर ग्रामीण पोलीस  विभागातंर्गत येत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवारला सकाळी 7 वाजेच्या सुमारास माथनी टोलनाक्यावर विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या 8 ट्रकवर कारवाई करीत 2 कोटी 41 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी मोहीम चालविली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. हे ट्रक भंडारा जिल्ह्यातून रेती घेऊन नागपूरला दररोज जात असताना भंडारा महसूल विभाग व पोलिसांनी का कारवाई केली नाही, अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आज अवैधरीत्या विना रायल्टी रेती वाहून नेणाऱ्या ट्रक्सना जप्त करण्याची मोहीम अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपनिरीक्षक दुबे यांच्या चमूने केली. पकडलेले ट्रक मौदा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले असून आरोपींवर भादंवी 379 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील कारवाई निरीक्षक आशिफ शेख करत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...