मुंबई,दि.07- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना दिली.
वरळीतील एनएससीए सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस केंद्राला केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या दोन अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ओबीसींच्या हिताच्या योजना राबवताना हात आखडता घेणार नाही. त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment