Monday, 6 August 2018

दापोली विद्यापीठाच्या मृत कर्मचाऱ्यांना देवरी येथे श्रद्धांजली

देवरी,दि.06- स्थानिक मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये  दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या मृत कर्मचाऱ्यांना नुतकीच श्रद्धांजली वाहण्यात आली.
 या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण झिंगरे हे होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद प्रामुख्याने हजर होते.
गेल्या काही दिवासापूर्वी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील 33 कर्मचारी बसने सहलीला जात असताना महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला होता. या आपघातात सुदैवाने प्रकाश सावंत-देसाई नावाचे गृहस्थ बचावले.
या श्रद्धांजली सभेला महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...