अर्जुनी मोरगाव,,दि.०५- तालुक्यातील शिवरामटोला-भरनोली परिसरातील तिरखुडी भाग-१ बिटच्या कम्पार्टमेंट नं.३३२ मध्ये मागील आठवडाभरात वाघाने दोन गायींची शिकार केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
शिवरामटोला येथील मनिराम नरेटी व भरनोली येथील भाऊराव मेश्राम या पशुपालकांनी गायी गुराख्यामार्फत जंगलात चरायला सोडल्या होत्या. गायींच्या कळपावर हल्ला करुन दोन गायींना ठार केले. मागील महिन्यात (दि.२७) मनिराम लष्कर नरेटी यांच्या गायीची वाघाने शिकार केली. जनावरांवर वांरवार वाघाचा हल्ला होत असल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे.मागील चार महिन्यापूर्वी बिबट्याने शिवरामटोला येथील बैल व तिरखुडी गावातील बोकडाची शिकार केली होती. वनविभागाने वेळीच वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना त्याचा आर्थिक मोबदला दिला जाईल. असे वन परिक्षेत्र अधिकारी बी.के.राणे व वनरक्षक एन.एल. बरोटकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment