Monday, 20 August 2018

कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे – जयंत पाटील

गोंदिया,दि.19: पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पूर्व विदर्भाच्या दौरुयावर आलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रविवारी गोंदिया येथे आयोजित पक्षातील सर्व घटकांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत बुथ कमिटी निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले.
ते येथील नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियममध्ये आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते.मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बंसोड, आमदार प्रकाश गजभिये, ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवनकर, जिला अध्यक्ष पंचम बिसेन, नरेश माहेष्वरी, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिनखेडे,राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, किशोर तरोणे, केतन तुरकर, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे, गणेश बरडे, अशोक सहारे, प्रवीण कुंटे पाटील, जानबा मस्के, वंदना बोरकर, कुंदन कटारे, बालकृश्ण पटले, केवल बघेले, डाॅ. अविनाष काशीवार, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, प्रेमकुमार रहांगडाले, जिब्राईल पठान, लोकपाल गहाने, कमलबापू बहेकार, तुकाराम बोहरे, देवचंद तरोणे, निता रहांगडाले आदि मंचावर उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात मंचावर प्रदेशाध्यक्षांच्या शेजारी जिल्हाध्यक्षांना बसण्याचा मान न मिळता त्यांना मंचावरील शेवटच्या खुर्चीवर बसावे लागल्याने या पक्षात जिल्हाध्यक्षाची भूमिका कुठे असते हे या चित्रावरून बघावयास मिळाले.
कार्यकर्ता मेळाव्यात  बोलतांना पाटील म्हणाले की राज्यातील सर्व जिल्हयामध्ये पक्ष स्थिती व कामाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आज गोंदिया जिल्हयाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्षाची ताकद बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्वच सेलवर अधिक भर देण्यात येणार आहे. जिला व तालुका कार्यकारिणी घोषणा लवकरच केली जाईल असे ते म्हणाले. जिल्हयातील प्रत्येक गावात बुथ कमेटी तयार करण्यात येणार आहे. बुथाावर किमान 15 ते 20 कार्यकर्ते निर्माण केले जातील. बुथ सदस्यांची नोंदणी आणि अचुक माहितीसाठी अॅप विकसित केले असुन त्या माध्यमातुन कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क केला जाईल, असे ते म्हणाले.
सम्मेलनात ते पुढे म्हणाले विदर्भातील या भागात धानाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जात असून धानाचा दर शेतकर्यांना कमी मिळतो. त्यामुळे शेतकरी असमाधानी आहेत. विरोधी पक्षात असतांना धानाच्या पिकासाठी भाजप कडून 3200 रुपयांची मागणी होत होती. आता सत्त्तेत आल्यानंतर भाजप सरकार धानाला का भाव देत नाही ? असा सवाल त्यांनी केले.  मेळाव्याला उपस्थित माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार मधुकर कुकडे, जिला अध्यक्ष पंचम बिसेन व अन्य पदाधिकार्यांंनी संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन जि.प. पक्षनेता गंगाधर परशुरामकर व माजी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिनखेडे यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष अशोक सहारे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...