Friday, 24 August 2018

मुल्लाच्या तंमुस अध्यक्षपदी रामभाऊ गौपाले

नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत करता सरपंच व पदाधिकारी

देवरी,दि.२४- देवरी तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायतीमधील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामभाऊ गौपाले यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सरपंच कृपासागर गौपाले यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे.
सविस्तर असे की, गेल्या काही वर्षापासून मुल्ला येथील गाव तंटामुक्त समितीची निवड अनेक वेळा वादग्रस्त ठरली होती. परिणामी, या समितीचे अध्यक्षपद वादातीत बनले होते. परंतु, काल गुरुवारी (दि.२३) रोजी झालेली ग्रामसभा अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पडली. सभेच्या शेवटी पुन्हा अध्यक्ष निवडीचा प्रश्न समोर आला. यावेळी रामभाऊ गौपाले आणि जगतराम कुरसुंगे यांची नावे समोर आली. मात्र, यावेळी ग्रामसभेने सार्वमताने कुरसुंगे यांचे नाव फेटाळून लावल्याने श्री गौपाले यांची तंमुस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवडून आल्याने श्री गौपाले यांचे सरपंच कृपासागर गौपाले, उपसरपंच सीमा नाईक, तंमुस अध्यक्ष गुणीराम वैद्य, राजू खोटेले,नेतराम वघरे,प्रभा वंजारी,रत्नकला नंदागवळी,चंदन घासले,छन्नू कांबळे,संगीता नागोसे,ग्रामसेवक वैष्णव, सर्व समित्यांचे पदाधिकारी आणि गावकèयांचे अभिनंदन केले. नवनियुक्त अध्यक्षांनी समस्त गावकèयांचे आभार मानत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...