Wednesday, 1 August 2018

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय संयुक्त सभा

देवरी,दि.01 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांतील प्राचार्य मुख्याध्यापाकांसह शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त सभा प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. या वेळी समितीचे सदस्य तथा नगराध्यक्ष कौशल कुंभरे, आनंद नळपते, शंकर मडावी यांच्यासह सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक, शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य राहण्याच्या दृष्टीने व्यसनमुक्ती कार्यक्रम प्रत्येक महिन्यात राबवावे, व्यसनांपासून होणाºया दुष्परिणामांची चित्रफीत दाखवून सर्व शाळा व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे, आदिवासी विद्यार्थ्यांना आयपीएस, आयएएस होण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे व त्यासाठी स्वतंत्र वाचनालय तयार करुन तेथे एनबीद्वारे पुस्तके देण्यात यावे, असे निर्देश आ. संजय पुराम यांनी दिले.
तसेच विद्यार्थी मृत्यू प्रकरण शून्य ठेवण्याच्या दृष्टीने व शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचाराबाबद कोणतीही घटना घडणार नाही, याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी. विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकीन वेळेवर पुरविण्याचे आदेश आ. पुराम यांनी दिले.डीबीटीमुळे विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांचे चांगले मत आहे. या डीबीटीमध्ये अजून एक हजार रुपये वाढविले तर चांगले होईल. या विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक व संचालन प्रकल्पाचे नियोजन अधिकारी एस.एस. देवगडे यांनी केले. आभार ककोडी येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम. एन. शहारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी (अनुदानित शाळा) एल. एच. भोंगाडे, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही.एम. टेंभुर्णीकर, सहायक प्रकल्प अधिकारी एस.वाय. खोटेले, उपलेखापाल पी.सी. डोळस, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.के. गाते व एस.जी.तोरकड यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...