Friday, 17 August 2018

बिल्डरच्या त्रासामुळे कंत्राटदाराची आत्महत्या

नागपूर ,दि.17: बिल्डरने आर्थिक कोंडी करून प्रचंड मानसिक त्रास दिल्याने टाईल्स फिटींगचे काम घेणाऱ्या एका ठेकेदाराने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संतोष पांडुरंग बावनगडे (वय ६०)असे मृताचे नाव आहे. ते पारडीतील विनोबा भावेनगरात राहत होते.
आरोपी हिरेंद्र भाऊराव निमकर (वय ४६, रा. लकडगंज), कमलेश ईश्वरचंद चंदीरामाणी (वय ३६) आणि जगदीश दिगंबरभाई पटेल (वय ४५) हे तिघे जयराम बिल्डरचे भागीदार आहेत. त्यांनी नंदनवनमधील अनमोलनगरात बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. आरोपींनी बावनगडे यांना तेथे टाईल्स फिटींगचे कंत्राट दिले होते. बावनगडे यांनी मजूर लावून ते काम पूर्ण केले. आरोपींनी त्या कामाची रक्कम त्यांना दिली नाही. मजुरांकडून त्यांना सारखी पैशाची मागणी होत असल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली. तशात आरोपी निमकर, चंदीरामाणी आणि पटेल यांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याने बावनगडे अस्वस्थ झाले होते. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी जयराम अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्याच्या पायरीवर बसून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. प्रणय संतोष बावनगडे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी बिल्डरांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...