Tuesday, 7 August 2018

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनाला मुंबई येथे सुरवात


सुरेश भदाडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते द्वीप प्रज्वलन 

मुंबई,०७-  राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या राष्ट्रीयअधिवेशनाला मुंबई येथे आज सुरवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते द्वीप प्रज्वलित करून अधिवेशनाची सुरवात करण्यात आली.
 मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम येथे या आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्षापदी  डॉ. बबनराव तायवाडे हे आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक जीवतोडे  हे आहेत.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर, राज्याचे मंत्री ना. राम शिंदे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तेलंगानाचे खासदार बी. नरसय्या गौड, माजी मंत्री विजय वड्डेटीवार,  ना. महादेव जानकार, हरियाचे खासदार राजकुमार सैनी आदी मान्यवर उपस्थित आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार अविनाश वारजुरकर, वामनराव चटप, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य डॉ. शकील उझ झमान अंसारी, मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, अमेरिकेतील लीड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.हरी एप्पन्नापल्ली, वाशिंगटनचे पुल्ली रावि, माजी आमदार सेवक वाघाये, आ.हेमंत पटले, ओबीसी कृती समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, हंसराज जांगिड, सुषमा भड आदी मान्यवर उपस्थित आहेत.


   ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या

१. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करून केंद्रात स्वतंत्र मंत्रालय हवा.
२. मंडल आयोग, नच्चीपन आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करा.
३. ओबीसी शेतकरी, शेतमजूर यांना वयाच्या ६० व्या वर्षापासून पेंशन लागू करा
४. ओबीसी समाजाला असंवैधानिक क्रिमीलेअर अटीतून मुक्त करा.
५. महात्मा ज्योतिराव फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तरीत्या भारतरत्न देऊन सन्मानित करावे.
६. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा द्या.
७. ओबीसी कर्मचाèयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे.
८. ओबीसीसाठी विधानसभा आणि लोकसभेत स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करा.
९. तालुका स्तरापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायिक स्तरावर ओबीसीसाठी आरक्षण लागू करा.
१०. ओबीसींना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण द्या
११. ओबीसी शेतकèयांना वनहक्क पट्ट्यांसाठी लागू केलेली तीन पिढ्यांची अट रद्द करा.
१२. ओबीसी विद्याथ्र्यांसाठी नागरी सेवा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी साठी राज्य आणि जिल्हा स्तरावर भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सुरू करा.
१३. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट ग्राम योजना लागू करा.
१४. देशात प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर ओबीसी विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करा.
१५. केंद्र व राज्याच्या शासकीय कार्यालयात ओबीसींच्या रिक्त पदांचे अनुशेष भरण्यासाठी स्वतंत्र अभियान सुरू करा आणि रिक्त  पदांच्या भरतीसाठी कडक कायदा करा व मॉनिटरिंग कमिटीची स्थापना करा.
१६. ओबीसी समाजाच्या चंद्रपूर ११ टक्के, गडचिरोली ६, यवतमाळ १४, नंदूरबार धुळे ठाणे, नाशिक आणि पालघर ९ टक्के जिल्ह्यात वर्ग ३ व ४च्या पदभरतीमध्ये कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे.
१७. सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण बंद करा.
१८. एससी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकèयांना १०० टक्के सुविधा केंद्र आणि राज्य सरकारने सुरू करावी.
१९. शेतमालाच्या खरेदीसाठी एकाधिकार प्रणाली सुरू करा.
२०. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देऊन त्वरित सुरू करा.
२१. ओबीसी विद्याथ्र्यांना स्वाधार योजना त्वरित लागू करी.
२२. विजाभज, इमाव आणि विमाप्र मंत्रालयाला केवल ओबीसी मंत्रालयाचे नाव द्या.
२३. महाराष्ट्रात बीबीए आणि बीसीसीएच्या विद्याथ्र्यांना मिळणारी शिष्यवृत्ती पूर्ववत लागू करा.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...