दिल्ली,दि.16- तब्बल 9 आठवड्यापासून एम्समध्ये उपचारासाठी दाखल असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांनी आज (दि.16) सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांवर अखेरचा श्वास घेतला. श्री वाजपेईच्या निधनाचे वृत्त सर्वप्रथम रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. प्रा. आरती वीज यांनी जाहीर करताच संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.
बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा…
या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत ‘कदम मिलाकर’ सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयी हे 11 जूनपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. पण बुधवारी सायंकाळपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. बुधवारी रात्रीच्या मेडिकल बुलेटिनमध्ये वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असून त्यांनी लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनमध्येही अटलजींच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून चिंताजनक असल्याचेच सांगण्यात आले. अखेर गुरुवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने मी शून्यात गेलो असल्याचे, पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले..मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।
No comments:
Post a Comment