Sunday, 26 August 2018

देहव्यापार अड्डय़ावर छापा तीन महिलांसह एका पुरुषाला अटक

भंडारा,दि.26ः- शहरातील हनुमान वॉर्डात सुरू असलेल्या देहव्यापार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाने धाड मारून तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली. ही कारवाई शुक्र वारी संध्याकाळी करण्यात आली.
शहरात २0 ते ४0 वयोगटातील काही महिला देहविक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विनीता साहू व अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉडला कारवाईचे निर्देश दिले. शुक्र वारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हनुमान वॉर्डातील अक्षय संजय फुलसुंगे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी घराच्या समोरील खोलीत दोन महिला बसल्या होत्या. त्यांना तिथे असण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन आतील खोलीत प्रवेश केला असता एक पुरूष महिलेसह अर्धनग्न अवस्थेत मिळून आला. त्यांना पकडून पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्याजवळील पैसे व साहित्य असा ६ हजार ५२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाचे पोलिस निरीक्षक अरूण गुरनुले, उपनिरीक्षक सचिन गदादे, जितेंद्र आडोळे, सहाय्यक फौजदार अरूण झंझाड, अश्‍विनकुमार मेहर, रुपचंद जांगळे, प्रदिप डहारे, किशोर मेर्शाम, विनोद शिवणकर, योगिता जांगळे, सुप्रिया मेर्शाम, सचिन गाढवे यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...