Friday, 17 August 2018

राज्यघटनेची होळी करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

तिरोडा,दि.17 : दिल्ली येथील जंतरमंतरवर ९ ऑगस्ट रोजी भारतीय राज्यघटनेची होळी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याच्या मागणीकरिता १६ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयापासून माजी माजी आमदार भजनदास वैद्ये, माजी आमदार दिलीप बन्सोड, राधेलालजी पटले, अँड. नामदेव किरसान, नरेश माहेश्वरी, अँड. के.आर. शेंडे, डाँ. योगेन्द्र भगत, झामसिंगजी बघेले, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले बी.व्ही. गोंडाणे, अतुल गजभिये यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो महिला-पुरुष हातात संविधान बचाव देश बचाव, संविधान के सन्मान मे हम उतरे मैदान मे, असे फलक घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाऊन तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन दिले..
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत ॲड. के.आर. शेंडे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, ॲड. किरसान, ॲड. भांडारकर, प. स. सभापती निता रहांगडाले, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सुनिता मडावी, प.स. सदस्य डाँ किशोर पारधी, नगरसेवक राजेश गुनेरीया, नगरसेवक विजय बन्सोड, प्रकाश गेडाम, पंचशीला रामटेके, प्रविण शेंडे , मनोहर राऊत, शशीकला मेश्राम, नितेश खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना केवळ कोणा एका समाजाकरिता नसून सर्व स्तरातील भारतीय नागरिकांकरिता असून संविधानाची होळी करणाऱ्यांनी या घटनेचा स्वत: व्हिडीओ तयार करून व्हायरल केला असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. मोर्चाचे संचालन व आभार अतुल गजभिये यांनी केले. .

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...