देवरी,दि.19ःःग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. गोंदिया अंतर्गत उपविभाग देवरीच्या वतीने शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात देवरी तालुक्यातील शिरपुरबांध, भर्रेगाव, पिंडकेपार व सावली या गावात नवीन नळ योजनेचे भूमिपूजन सोहळा १४ ऑगस्ट रोजी पार पडला.
भूमिपूजन आ. संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, दीपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, पं.स.सदस्य मेहतरलाल कोराम, महेंद्र मेश्राम, सरपंच नरसिंह फन्डकी, उपसरपंच दुर्योधन शिवणकर, भर्रेगावचे सरपंच विद्या खोटेले, उपसरपंच मनोज मिरी, पिंडकेपारच्या सरपंच प्रमिला घासले, उपसरपंच येनु घोगारे, सावलीचे सरपंच प्रभुदयाल पवार, उपसरपंच नीलेश शेंडे, पोलिस पाटील चंद्रसेन रहांगडाले, देवरीचे नगरसेवक यादवराव पंचमवार तसेच चारही गावातील ग्रा.प.सदस्य व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या चारही गावात एकूण १ कोटी ७७ लाख रुपयाचे निधीतून नळ योजनेचे काम केले जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन एस.व्ही. पवार यांनी तर आभार शाखा अभियंता पी.एम. मानकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment