देवरी,दि.04- देवरी नगरपंचायतीचे नवनियुक्त बांधकाम सभापती नेमीचंद आंबिलकर यांच्या पुढाकाराने वृक्षलागवडीच्या लक्ष्यपूर्ती अभियानांतर्गत नगरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, सभापती आंबिलकर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, नगरसेवक रितेश अग्रवाल, माया निर्वाण, दविदंर कौर भाटिया, प्रवीण दहिकर आदि मान्यवर उपस्थित होते. या अभियानामध्ये त्रिमूर्तीनगर, शिवनगर, सैनिक नगर आदी भागात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment