Saturday 30 September 2017

देवरी येथे सरपंच पदासाठी 103 तर सदस्यांसाठी 209 नामांकन दाखल

सरपंचपदावर डोळा असणाऱ्यांच्या संख्येत भर


Image result for gram panchayat logoदेवरी, 29- 'सरपंच थेट जनतेतून' या पद्धतीमुळे येत्या 16 तारखेला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सदस्यपदापेक्षा सरपंच पदावर अनेकांचा डोळा असल्याचे नामांकन दाखल होण्याची अंतिम टप्प्यावरून दिसून आले. नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसी देवरी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या  75 प्रभागासाठी असलेल्या 209 सदस्य पदासाठी 441 तर सरपंचपदासाठी 103 नामांकन दाखल झाल्याची माहिती तालुका निवडणुक अधिकारी विजय बोरुडे यांनी दिली आहे.
येत्या 16 ऑक्टोबर रोजी देवरी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणुक होऊ घातली आहे. नामांकन पत्र भरण्याच्या पहिल्या तीन दिवसात एकही नामांकन पत्र दाखल झाले नव्हते. यावेळी नामांकनपत्र पहिल्यादा पूर्णपणे ऑनलाईन भरून दाखल करावयाचे असल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र तालुक्यात होते. अनेक ऑनलाईन फार्म भरणाऱ्या खासगी सेंटर वरील संगणक आपरेटर यांना प्रशिक्षणाच्या अभावामुळे जमेल तसे नामांकन अर्ज भरून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना सोपविण्यात आल्याचा प्रकार सुद्धा दिसून येत होता. अनेक इच्छुक उमेदवार आपला नामांकन भरण्यासाठी दुसऱ्या लोकांना विनंती करताना दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे अनेकांना ऑनलाईनच्या किचकट पद्दतीमुळे नामांकन दाखल करण्यापासून वंचित रहावे लागल्याचा प्रकार सुद्धा दिसून आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच हा थेट जनतेतून निवडून द्यावयाचा असल्याने सदस्य पदापेक्षा सरपंच पदावर अनेकांचा डोळा आहे. यासाठी तालुक्यातून 25 पदांसाठी 103 लोक इच्छुक असल्याचे दिसून आले. आपले अर्ज अवैध ठरू नये, यासाठी अनेकांनी 4-4 अर्ज भरल्याचेही निदर्शनात आले आहे. सरपंचपदाच्या तुलनेत 75 प्रभागासाठी केवळ 441 नामांकन दाखल झाले. यामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुकांवर प्रशासनाला बारीक नजर ठेवण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

देवरी तालुक्यातील ग्रामीण राजकारण पेटले


Friday 29 September 2017

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीतून धानाचे उत्पादन घ्यावे-जिल्हाधिकारी काळे

Shendriya Sheti
प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी चाखली भाताची चव


गोंदिया,दि.२८ : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा सोबतच आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीची कास धरुन धानाचे उत्पादन घ्यावे. असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रीय तांदूळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधतांना श्री.काळे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, गोंदिया जिल्ह्यासाठी कृषि आयुक्तालयाने परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजूरी दिली आहे. प्रति गट ५० शेतकऱ्यांना व प्रति शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरीता सेंद्रीय शेती राबविण्याची मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रीय गटामध्ये २३४६ शेतकरी सेंद्रीय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, आपल्या दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रीय तांदूळ उत्पादनामुळे शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादन सुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षांना सुध्दा विषमुक्त अन्न मिळेल. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ बळकट व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीमधील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यक्रमात जवळपास १५०० लोकांनी सेंद्रीय तांदूळाचा आस्वाद घेतला आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री कार्यक्रमामध्ये ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जय श्रीराम व एचएमटी या तांदूळाची प्रति किलो ६० रुपये याप्रमाणे ४ क्विंटल सेंद्रीय तांदूळाची विक्री करण्यात आली. सेंद्रीय तांदूळ खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखविली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना सेंद्रीय शेतीतील उत्पादित सेंद्रीय तांदूळ शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
श्री.चव्हाण माहिती देतांना यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील २३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतू यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११६८० क्विंटल सेंद्रीय तांदूळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति कुटूंब १० ते ५० किलो सेंद्रीय तांदूळ देण्याचे नियोजन आत्मा कार्यालयामार्फत सुरु असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले, सदर तांदूळ खरेदीकरीता ग्राहकांनी फेसबुकवर Organic Gondia (ATMA किंवा ९५०३५२५६७२ या भ्रमणध्वनीवरील व्हॉटस् ॲपवर नोंदणी करावी. नोंदणीकृत ग्राहकांना मागणीनुसार डिसेंबर पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ग्राहकांनी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषि विभाग कार्यालय येथे सुध्दा नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली- गोंदिया जिल्हयांचा घेतला आढावा गडचिरोलीत पर्यटनाच्या संधी-दिपक केसरकर

DSC01862

गडचिरोली, दि.२८: शांतता असेल तर समृध्दी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खुप मोठा वाव आहे. यासाठी नक्षलवाद्यांचा बिमोड करुन शांतता प्रस्थापित करणे व गडचिरोली जिल्हयाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण) तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.
एक दिवसाच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यात केसरकर यांनी गडचिरोली आणि गोंदिया जिल्हयाचा आढावा घेतला. यावेळी पोलिस उपमहासंचालक कनकरत्नम, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक तसेच पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, गोंदियाचे पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ आदींसह इतर प्रमुख पोलिस अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी बिपिन इटनकर, कार्यकारी अभियंता कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात असणाऱ्या नक्षल घडामोडी आणि तयावरील उपाय याबद्दल दोन्ही अधिक्षकांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना केसरकर म्हणाले की, तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे तसेच या जिल्हयात धानशेती प्रामुख्याने होते. याच सोबत वनउत्पादनावर आधारित उद्योगाव्दारे याभागासाठी उपजिविका वाढ याला प्राधान्य देण्याचा आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत.
शहीद परिवारांची भेट
यावेळी केसरकर यांनी शहीद कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या समस्यांची माहिती घेतली या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर किमान दोन महिन्यात बैठक घेण्यात यावी अशा सुचना त्यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. शहीद कुटुंबियांप्रती शासन संवेदनशील असून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देवू असे ते म्हणाले.
आत्मसमर्पितांना घरे
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोलीत १४२ भूखंड देण्यात आलेले आहेत. त्यांना रमाई व शहरी घरकूल योजनेतून प्राधान्याने घरे देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही करावी असे केसरकर म्हणाले. आवश्यकता भासल्यास त्या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात येतील याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. शरण आलेल्या नक्षलवाद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना कर्जावर वाहन देण्याची योजना आहे. त्याऐवजी राज्यातील शासकीय कार्यालयाची निर्लेखित वाहने या भागात दिल्यास त्याच्या योग्य त्या देखभाल दुरुस्तीनंतर त्यांना ही वाहने देता येतील, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले. या सूचनेवर निश्चितपणे विचार करु असे नायक म्हणाले.
रोख बक्षीस व गौरव
गेल्या वर्षभरात ज्यांनी पोलिस कारवाईत यश मिळविले अशा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देवून गृह राज्यमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी चर्चा केली.

रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा;आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

वर्धा दि.२८ :  विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. यावर झालेल्या चर्चेअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पंजाब नॅशनल बँक आणि विमा उतरविणारी रिलायन्स कंपनीवर शेतक-यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सावंगी पोलीस ठाणेदाराला दिल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
तत्पूर्वी शेतक-यांनी वर्धेचे आ. डॉ. पंकज भोयर यांच्यासह पंजाब नॅशनल बँक गाठली. येथे आमदारांनी बँकेचे व्यवस्थापक नेहरू यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी बघतो आणि करतो असेच उत्तर दिले. यावेळी धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी काशिनाथ श्यामराव राऊत व चंद्रशेखर जगताप यांनी त्यांना निर्माण झालेल्या समस्येचे गा-हाणे मांडले.  शेतक-यांनीच बँक व्यवस्थापकांना विमा उतरविणाºया रिलायन्स या कंपनीच्या संबधीत अधिकाºयांचे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी बँक व्यवस्थापक नेहरू यांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार नेहमीचाच असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतक-यांच्यावतीने विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली. बँकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी शेतकर्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

Thursday 28 September 2017

ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये नवरात्री महोत्सव व रास गरबा*

*ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी*
*नवरात्री महोत्सव व रास गरबा*
देवरी:27सप्टे.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये यावर्षी नववा नवरात्री महोत्सव 2017 मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमूर्ती आदर्श शिक्षिका व प्राचार्या रझिया बैग, सौ. बोरुडे, सौ. अर्चना अग्रवाल आणि मुख्याध्यापक सुजित टेटे प्रामुख्याने उपास्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूजा अर्चना करून करण्यात आली. सत्कारमूर्ती प्राचार्या रझिया बैग यांचा शाल व श्रीफळ देऊन मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी स्वागत व शाळेच्या वतीने सत्कार केला.
ठरल्या प्रमाणे शालेय विद्यार्थी शिक्षक आणि पालक गुजराती पोशाख परिधान करून सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सहभागी पालकांनी आपली कला कौशल्य सादर केली. शालेय विध्यार्थ्यांनी रास गरबा नृत्य सादर करून सर्व उपास्थितांना मोहून टाकलं होतं.
कार्यक्रमाचे पर्यवेक्षण प्राचार्या बैग आणि सौ. बोरुडे यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशासाठी शालेय सर्व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.


Wednesday 27 September 2017

BERARTIME_27 SEPT-03 OCT-2017





अदानी फाउंडेशनतर्फे आदिवासी युवकांना रोजगाराची संधी

27 Sept 12
गोंदिया,दि.२७– अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या समूहाच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उपक्रम सध्या सुरू असून या माध्यमातून बेरोजगार युवक सद्यस्थितीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये कामाला लागले आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलप्रभावित क्षेत्रातील युवकांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचे कार्य सध्या अदानी समूहातर्फे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अदानी समूहाचे व्यवस्थापक चैतन्य साहू व कार्पोेरेट व्यवस्थापक नितीन शिरवाडकर हे याकडे लक्ष देऊन आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे अदानी समूहातर्फे वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समूहाच्या व्यवस्थापनाकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात. याच उपक्रमाच्या श्रृंखलेत आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील आणि विशेषतः नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक हे बेरोजगारीच्या समस्येने ग्रासले आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे, यावर भर देण्याविषयी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या साठी ७० आदिवासी युवकांची निवड करून त्यांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये वीजतंत्री आणि सांधाता (वेल्डर) हे दोन प्रशिक्षण निवडण्यात आले. यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ७० युवकांना उत्तम प्रशिक्षण देऊन केवळ १५ दिवसात अत्यंत कुशल असे कारागीर तयार केले जातात. यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची युवक निवडीसाठी मदत घेतली जाते. यापूर्वी सुद्धा ६०-६० आदिवासी युवकांच्या दोन तुकड्यांतील युवकांना प्रशिक्षित करून त्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यात अदानी फाउंडेशनने महत्वाची भूमिका पार बजावली आहे. येथे प्रशिक्षणाला येणाऱ्या आदिवासी युवकांना जेवण व राहण्याची सोय विनामूल्य केली जाते. या युवकांसाठी दिल्या जाणाèया सोयींचा दर्जा हा अत्यंत उच्च आहे. येथे येणाèया प्रत्येक युवकाला बोलण्या-वागण्याच्या पद्धती सुद्धा शिकविल्या जातात. त्यामुळे कोणत्याही युवकाला पुढे नोकरीसाठी मुलाखत देताना या प्रशिक्षणाचा लाभ होतो. अनेक युवकांना येथे येण्यापूर्वी साधे संभाषण सुद्धा करता येत नव्हते. मात्र, येथे आल्यावर असे युवक बिनधास्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
बाहेरील अन्य कंपन्या सुद्धा येथे प्रशिक्षित युवकांची मागणी करू लागल्या आहेत. अशा कपन्यांचे अधिकारी अदानी परिसरातच युवकाच्या मुलाखती घेऊन जॉब प्लेसमेंट सुद्धा देत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. याविषयीचा किस्सा वर्णन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका कंपनीने केवळ १२ उमेदवाराची मागणी केली असता त्यांचेकडे २० प्रशिक्षित युवक पाठविल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा अदानी फाउंडेशनच्या वतीने त्या कंपनी व्यवस्थापनाला त्या युवकांशी केवळ संवाद साधण्याची विनंती केली. त्याचा परिणाम असा झाला की त्या २० युवकांना त्या कंपनीने कामावर ठेवून घेतले. यावरून अदानी फाउंडेशन देत असलेल्या प्रशिक्षणाचा दर्जा लक्षात येतो.
या प्रशिक्षणाला येणाऱ्या आदिवासी युवकांच्या जेवणाची व नाश्त्याची जबाबदारी ही सुरुची स्वयंसहायता महिला बचत गटावर सोपविण्यात आली आहे. या बचतगटामध्ये ११ महिला सदस्यांचा समावेश आहे. यासाठी अदानी फाउंडेशनच्या वतीने त्या गटाला लागणारा भांडी आणि साहित्याचा पुरवठा केला आहे. युवकांना लागणारे भोजन, नास्ता आणि चहा-काफी तयार करण्यासाठी लागणारा खर्च हा गटाला करावा लागत आहे. मोबदला म्हणून एकवेळच्या जेवणासाठी प्रती युवक ५० रुपये गटाला अदा करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
अदानी समूहाच्या वतीने आदिवासी युवकांसाठी चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक आदिवासी युवकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

खैरबोडीच्या महिला करताहेत बांगड्यांची निर्मिती

27 Sept 17

तिरोडा,दि २७- राजस्थानसह देशातील अनेक भागात लाखेपासून तयार होणाèयांना बांगड्यांना चांगली मागणी आहे. याचा विचार करता अदानी फाउंडेशनच्या प्रयत्नातून खैरबोडीतील महिलांना आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी बालाघाट येथील एका व्यापाèयाच्या माध्यमातून खैरबोडीच्या बचतगटाच्या सदस्यांना सध्या प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून लवकरच खैरबोडीच्या बांगड्या देशाच्या कानाकोपèयात पोचतील, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
राजस्थानसह देशातील अनेक भागात महिलांना लाखेपासून तयार होणाèया बांगड्यांनी भुरळ घातली आहे. यामुळे या बांगड्यांची मागणी मोठी आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाखेचे उत्पादन होते. ही बाब अदानी फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने हेरली. बालाघाट येथील बांगड्यांचे व्यापारी पारधी यांच्या सहकार्याने खैरबोडी येथील महिला बचत गटांच्या सदस्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना कच्चा माल पुरविणे आणि तयार मालाला बाजारपेठेत नेणे यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. सध्या बचत गटाला बांगड्या अधिक आकर्षक कशा तयार करता येतील, याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रत्येक सदस्याने दिवसाला ५० जोड बांगड्या तयार करणे अपेक्षित आहेत. सध्या एक सदस्य केवळ ४ जोड तयार करू शकत असल्याने त्यांना अत्यंत कमी मोबदला मिळत आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी असली तरी त्या भविष्याप्रती नक्कीच आशान्वित आहेत.

Tuesday 26 September 2017

दुचाकी अपघातात गाय जागीच ठार दुचाकी स्वार गंभीर

देवरी/वडेगाव, 26,-देवरी आमगाव रोड सध्या अपघातासाठी  चांगलाच चर्चेत आहे. या महार्गावर अजून किती बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. आज मंगळवारी (ता. 26)  लोहारा कडून देवरीकडे येणाऱ्या एका दुचाकी स्वाराचे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघात एका गायीला जीव गमवावा लागला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडेगाव शिवारात घडली.
जखमीचे नाव सुनील रामचंद उईके (21) राहणार ओवारा असे आहे.
सविस्तर असे की, सुनील आपल्या होन्डा साईन क्र.  MH35-AB -1407 या दुचाकीने ओवारावरून देवरी कडे येत होता. या मार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा रस्त्यावरून अचानक रोडवर आलेल्या गायीकडे लक्ष गेले नाही. यामुळे झालेल्या अपघातात गाय ही जागीच गतप्राण झाली तर सुनील हा गंभीर जखमी झाला.त्यासा देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Monday 25 September 2017

गटविकास अधिका-याने मागितली एक हजाराची लाच

वाशिम,दि.25 : मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव महागांवकर यांनी विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने महागावकर यांना अटक केली. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजता घडली.
१४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गटविकास अधिकारी महागांवकर यांना सोमवारला ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वडीलांचे नावे झालेल्या विहीरीचे खोदकामाच्या पहिल्या बिलाचे ७१ हजार रूपयाचा धनादेश खात्यामध्ये जमा करण्यासाठी गटविकास अधिकारी महागावकर याने २९ आॅगस्ट रोजी एक हजाराची लाच मागितली होती. अशी तक्रार १३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील ए.सी.बी. कार्यालयात दिली. या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता गटविकास अधिकारी महागांवकर यांनी पडताळणी दरम्यान १ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून १८ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता गर्दी वाढल्यामुळे तक्रारदारावर संशय आला त्यामुळे गटविकास अधिकाºयाने लाचेची रक्कम स्विकारली नाही.

Sunday 24 September 2017

बहुजनांनो, आरक्षणासाठी लढा उभारा-मडावी

24bhph31_20170914969भंडारा,दि.24:भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी, एससी, एसटी, एनटीव्हीजे व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली असली तरी सत्ताधाºयांनी आरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बहुजनांना आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळाला नाही. देशात ८५ टक्के असलेल्या बहुजन समाजबांधवांनी समाज जागृती करून जन्मजात संविधानदत्त आरक्षणाच्या हक्कासाठी बहुजन समाजाने संघटीत होऊन लढा उभारावा, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ राज्य संयोजक दशरथ मडावी यांनी केले.

येथील मुस्लीम लायब्ररी सभागृहात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने बिआरएसपीचा आरक्षणविरोधी षडयंत्र पर्दाफाश कार्यक्रमात बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीआरएसपीचे ज्येष्ठ नेते झेड.आर. दुधकुवर, आप्पासाहेब कावळे, राजेश बोरकर, श्रावण भानारकर, विचारवंत डॉ.वामन शेळमाके, ज्येष्ठ नेते माधवराव फसाटे, जगदीश मडावी, सूर्यकांत हुमणे, जिल्हा प्रभारी डॉ.महेंद्र गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेश महासचिव झेड.आर.दुधकुवर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले पण त्याकाळी दस्तुरखुद्द मराठा समाजाने आरक्षण नाकारले होते. तोच मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ८५ टक्के असलेल्या बहुजन समाजाच्या उत्थानासाठी संविधानात आरक्षणाची तरतुद करून ठेवली आहे. परंतु सत्ताधारी मात्र आरक्षणच बंद करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. त्यामुळे संविधानदत्त आरक्षणाच्या संरक्षणासाठी बहुजन समाजाने कटीबद्धता बाळगावी सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केवळ एससी, एस.टी. समाजाला आरक्षण असून त्यांनाच नोकरी मिळते असे विरोधक समाजामध्ये गैरसमज पसरवित आहेत. ओबीसी समाजबांधवांनी याबाबत विचारमंथन करून आपल्या संविधानदत्त न्याय हक्क अधिकारासाठी संघटीत होऊन सामाजिक क्रांती घडवून आणावीे. खोट्या आदिवासींनी बनावटरित्या जातीेचे प्रमाणपत्र तयार करून मुलनिवासी आदिवासी समाजाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील जागा बळकावली आहे, अशा खोट्या आदिवासींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिवर्तनशील विचारांनी संबोधित केले. प्रास्ताविक बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजेश बोरकर तर संचालन निरज बन्सोड व आभार प्रदर्शन डॉ.महेंद्र गणवीर यांनी केले.

नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही – पृथ्वीराज चव्हाण

pruthvirajchavan-akola_20170914949अकोला,दि.24 : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी महाराष्ट्रात येण्याआधीपासून आहे ते जाणार, असे आम्हीही ऐकत आहोत;  अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे यांच्या निवासस्थानी रविवारी त्यांनी पत्रकारांशी हा संवाद साधला. पुसद येथील पुस्तक प्रकाशनानिमित्त जाण्यासाठी चव्हाण विदर्भ एक्स्प्रेसने अकोल्यात आले होते.

तूर उत्पादनाचे अंदाज वारंवार बदलून राज्य सरकारने सट्टाबाजार गरम केला आहे. भाजपचे सटोडियांशी संगनमत असल्याचा आरोप करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी तुरीच्या आकडेवारीचा गोंधळ पत्रकारांसमोर मांडला. काँग्रेसने आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांकडून चौकशी लावली. तीदेखील अधिकार नसल्याने फसवी ठरत आहे.आम्ही आमच्या कार्यकाळात शेतक-यांसाठी ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली. शेतकºयांकडून कोणताही अर्ज भरून न घेता कर्जमाफीचा लाभ दिला. भाजपा सरकारने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शेतक-यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले. ८९ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत, असे सरकारने सांगितले होते. आता कर्जमाफीसाठी ५८ लाख शेतक-यांचे अर्ज झाल्याने उर्वरीत शेतकरी गेले कुठे, ८९ लाखाचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला. ८९ लाख शेतक-यांसाठी ३४ हजार कोटींची तरतूद केल्याचे सरकार सांगत आहे. ३४ हजार कोटींची तयारी केली असेल तर दीड लाख रुपयांऐवजी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. भाजपा सरकारने बळीराजांचा घोर अपमान चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी मे तुकडे गिराकर समाजतक ही सिमित रखना चाहती मोदी सरकार-सासंद अशोक सिध्दार्थ


IMG_20170924_193744

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) २४ सिंतबर- केंद्र की विद्ममान भारतीय जनता पार्टी की सरकार इस देश कि पिछडी जाती याने ओबीसी समाज को न्याय एंव सवैंधानिक अधिकार देकर उनका विकास करने की बजाय ओबीसी समाज के आरक्षण मे आरक्षण की निती अपनाकर ओबीसी अंतर्गत आनेवाले जातीय समाज के नेताओंको अपने जाती तक ही सिमित रखने का काम किया जा रहा है।  एैसी टिप्पणी बहुजन समाज पार्टी के सासंद एंव मध्यप्रदेश के प्रभारी अशोक सिध्दार्थ ईन्होने की है । सासंद सिध्दार्थ इन्होने कहा की देश मे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सरकार एक हुकूमशहा सरकार की जैसी है, जौ लोकसभा हो या राज्यसभा यहा पर बोलने पर पांबदी लगाती है। इसलिये हमारी राष्ट्रीय नेता मायावतीने ओबीसी,एससी,एसटी समाज की आवाज को जनता के सामने रखने के लिये अपने राज्यसभा के सासंद पद का त्यागपत्र दिया है । सविंधान के कलम ३४० मे देश की पिछडी जाती यांने ओबीसी के लिये सवैंधानिक अधिकारो की तरतुदे की गयी । लेकीन आज तक उसपर किसी भी सरकारने सही ढंग से ध्यान नही दिया मंडल आयोग लागू किया गया ।लेकीन उसका विरोध कर न्यायालय के आदेश पर ५० प्रतिशत से भी ज्यादा जनसंख्या मे होनेवाले इस समाज को २७ प्रतिशत आरक्षण लागू किया गया। वही आरक्षण मध्यप्रदेश की सरकार १४ प्रतिशत देते आ रही है । मध्यप्रदेश मे काँग्रेस और भाजप के नेताओंने ओबीसी समाज के साथ हमेशाही अन्याय की राजनिती कर इस समाज को पिछडा रखा है। वही आज मेडीकल हो या इंजिनियरींग मे नीट के माध्यम से इस समाज के छात्रो को उच्चशिक्षा मे रोखने का षडयंत्र रचा गया है ।ओबीसी समाज धिरे धिरे जागृत होने लगा तो बिजेपी की सरकार ने ओबीसी आरक्षण मे टुकडे गिराने का काम सुरु कर ओबीसी की जाती जाती(लोधी,कुरमी,कुणबी,मरार,पवार,शाहू आदी) मे मतभेद पैदा कर इन समाज के नेताओंको सिर्फ अपनी जाती तक सिमित रखकर उच्चवर्णीय लोगो को सत्ता का लाभ देने के लिये यह सब किया जा रहा, एैसा आरोप कर बहुजन समाज पार्टी इसका पुरजोर विरोध करती है एैसे सिध्दार्थ इन्होने बताया।वैसेही मध्यप्रदेश की शिवराजसिंह चव्हाण की सरकार से जनता का मोहभंग हो चुका है । भ्रष्टाचार,महगाई,किसान आंदोलन मे लाठीहल्ला आदी मे यह सरकार अपनी गरिमा खो चूकी है ।किसान आत्महत्या कर रहा तो बेरोजगार युवक रोजगार की राह मे खडा है ।लेकीन सरकारने २०११ के बाद कोई भी नई भरती न करने से युवाओंमे असंतोष पैदा हुवा है ।आनेवाले २०१८ के मध्यप्रदेश विधानसभा के चुनाव मे ग्वालेर,रिवा,बालाघाट जिले मे हमारी पार्टी अच्छा प्रदर्शन करने के तैय्यारी मे है ।वैसेही २२० मे से ५० सिटोंपर हम महत्वपुर्ण भूमिका मे रहकर सत्ता बनाने मे हमारी महत्वपुर्ण भूमिका रहेगी क्यु की विरोधी पक्ष काँग्रेस यहा आज भी कमजोर स्थिती मे होने से एव भाजप के प्रति रोष होने से किसी की भी स्पष्ट बहुमतवाली सरकार मध्यप्रदेश मे बनने की उम्मीद कम है एैसे सांसद सिद्धार्थ इन्होने बताया। इस अवसर पर उनके साध पुर्व विधायक किशोर समरिते एंव बसप के मध्यप्रदेश प्रभारी प्रदिप अहेरवार भी मौजूद थे।

देश विकायचा आहे…

भारताचा स्वातंत्र्य लढा शिकविताना आम्हाला सांगण्यात आले की भारतात एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी आली व राज्यकर्ते बनली. आज तर आपल्या देशात खाहुजा (एलपीजी) धोरणांतर्गत एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र), एफडीआय, पीपीपी, एनजीओ मार्फत हजारो मल्टीनॅशनल कंपन्यांद्वारे देश गिळंकृत होताना दिसतो. एकट्या एसईझेड अंतर्गत ७२ हजार कंपन्यांमार्फत देशांतर्गत विदेश तयार करण्याचा परवानाच राज्यकत्र्यांनी देवून टाकलाय. असेच करायचे होते तर इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात लाखो लोकांच्या बलिदानाचे काय? इंग्रजांनी कमीत कमी देशात विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार केला, सार्वत्रिक शिक्षणासाठीची पाळेमुळे रोवली, विविध अनिष्ट प्रथा कायद्याने बंद करून सामाजिक व धार्मिक सुधारणा केल्या.
आज स्वतंत्र भारतात काय सुरू आहे, देशातील सार्वजनिक सत्ता केंद्रे एका व्यक्ती व कंपनीला विकणे सुरू आहे. असे करने म्हणजेच सामाजिक व आर्थिक लोकशाही नष्ट करने नव्हे काय? निवडणूक पुर्तीच्या नाममात्र लोकशाही अंतर्गत जे राज्यकर्ते निवडून येतात ते सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून देश घेता का देश, असा उद्योग सुरू करताना दिसत नाही काय?लोकांचा विरोध होऊ नये म्हणून सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रातील खर्च कमी करून व्यवस्थापन जर्जर करून मोडकडीत आणतात व त्याचे पीपीपी (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप) वा एनजीओ (नॉन गव्हरमेंट ऑर्गनायझेशन) द्वारे खासगीकरण करतात. मग तेच क्षेत्र भरभराटीस आल्याचे भासवतात. बजेट शासनाचे लागतं व व्यवस्थापण मात्र एका खाजगी व्यक्तीचं असते. अशाप्रकारे दुर्बल व मागास घटकांना भागीदारी व सोयी सवलती मिळणे तर सोडा त्याचे शोषण सुरू होते. उदाहरणच घ्यायचे झाले त बृहन्मुंबई महानगरपालिकेने २३ जानेवारी २०१३ ला १,१७४ शाळांना पीपीपी धोरणाद्वारे खाजगी व्यवस्थापनाच्या हस्ते निलाम करण्याचा निर्णय घेतला. पुणे मनपाने ४८ बालवाडींना खाजगी कंपन्यांना सोपविले. उत्तराखंड सरकारने २,२०० शाळा व दिल्ली सरकारने दक्षिण क्षेत्रातील ५० मनपा शाळा पीपीपी द्वारे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच अलीकडे मोठा नोकरी क्षेत्र असलेल्या रेल्वे विभागाने ३६ रेल्वे प्लॅटफार्मचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. हे काय दर्शविते. जाती व्यवस्थेअंतर्गत विविध घटकांना प्रतिनिधित्व (भागीदारी) मिळावी म्हणून असलेले आरक्षण व सोयी-सवलती नामशेष करने तसेच कंत्राटीकरणाच्या माध्यमातून कर्मचाèयांचे व मजुरांचे शोषण करने हे शासकजातींचे षडयंत्र वाटत नाही काय?
सरकारी व्यवस्थापन कोलमडावे यासाठीच राज्य व भारत सरकार दरवर्षी शिक्षण, आरोग्य व सार्वजनिक उपक्रमांचे बजेट करते व त्यांचे रूपांतर पीपीपी व एनजीओ द्वारे खाजगी करणात करते आणि सोबतच स्वयंअर्थसहाय्य शाळांना परवानगी देवून प्रोत्साहित करते. याचा अर्थ काय तर पूर्वी जसे जातीच्या नावावर शिक्षण नाकारले तसेच आज पैशाच्या नावावर गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण नाकारण्याचे षडयंत्र नाही का वाटत? हे सर्व संविधान डावलून छुप्या मनुस्मृती कायद्यांची अंमलबजावणी होतेय असे नाही का वाटत?
भारतीय लोकशाहीने मिश्र अर्थव्यवस्था (भांडवलवादी-समाजवादी अर्थव्यवस्था) स्वीकारली असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तोट्यात सोडा हो, नफ्यात चालणारे हजारो उद्योग खाजगी भांडवलदारांना विकण्यात आले. तेव्हा कुठे राहिली समाजवादी अर्थव्यवस्था? डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगविख्यात अर्थशास्त्रज्ञानाने सांगितले की, ‘ङ्कमहत्तम सामाजिक लाभाचे उद्योग सरकारने तोट्यात देखील चालवावेङ्कङ्क पण प्रत्यक्षात देशातील राज्यकत्र्यांनी भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारल्याचे दिसते. भांडवलवादी अर्थव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्टच आहे ‘ङ्कमहत्तम नफा कमविणेङ्कङ्क महत्तम नफा कमवायचे असेल तर शोषण केल्याशिवाय ते शक्य नाही हे अर्थशास्त्र शिकवून जाते.
आता टाटा-बिर्ला-अंबानी-अदानी सारखे भांडवलवादी खाजगी विद्यापीठांच्या मागे लागलेत. पीपीपी च्या मार्फत सरकारी शाळांवर कब्जा करीत आहेत. तर त्यांना काय कल्याणकारी राज्य निर्माण करायचे आहे म्हणून काय? नाही सरकारी शाळा चालो अथवा बुडो पण सरकारी शाळेमार्फत हजारो एकर जमीन व सरकारी बजेट लाटता येते व खाजगी विद्यापीठातून भांडवली अर्थव्यवस्थेला लागणारे कौशल्यधारक अविचारी गुलाम निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. तसं पाहिलं तर सरकारी विद्यापीठातूनही अपवाद वगळता दैवी-अवैज्ञानिक पिढीचा निर्माण होताना दिसतो.
लोकशाहीचे रूपांतर भांडवलशाही, झुंडशाही व एकाधिकारशाही होतांना दिसत आहे. राजेशाही, सरंजामशाही, हुकुमशाहीपेक्षा केव्हाही लोकशाही हीच उत्तम शासनप्रणाली आहे. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी शिक्षित व नैतिक समाजाची गरज असते. तसा समाज निर्माण होईत्सव त्रुट्या असल्या तरी लोकशाही जिवंत ठेवण्याचा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. पण भारतात लोकशाही नामशेष होऊन एकाधिकारशाही, हुकूमशाही निर्माण होतांनाचे चित्र दिसत आहे.
पण सामान्य भारतीयांना जात-धर्म द्वेष व qहसा गाय-गोबर-मूत्र, देशभक्त की देशद्रोही, तीन तलाक इत्यादी मुद्यांचा गुंगारा देण्यात आला आहे. आतंकवाद, नक्षलवाद व भ्रष्टाचार निर्मूलन करण्याऐवजी फक्त भावनिक कल्लोळ सुरू आहे. त्यातल्या त्यात माझा तो सुधारित व शुभ्र प्रतिमेचा व तुझा तो भ्रष्ट असे आरोप करून चौकशी सुरू आहे. मिडीयाने तयार केलेल्या अशाप्रकारच्या आभासमान वातावरणात शेतकèयांचे प्रश्न, मागासांचे प्रश्न, शिक्षण-नोकरीचे प्रश्न, बलात्कार-qहसा व महिलांचे प्रश्न बाजूला फेकले गेलेत. या वातावरणात भारताच्या सार्वजनिक अर्थव्यवस्थेची निलामी कसी होत आहे. यापासून देश अजून अनभिज्ञच आहे. ओएनजीसी द्वारे भारतीय रेल्वेला जो पेट्रोलियमचा पुरवठा होत होता. तो अंबानींच्या रिलायंसला देवून ओएनजीसीला संपविण्याचा घाट घातला आहे.
बीएसएनएलचे बरेच युनिट बंद करून खासगीकरणाला वाव देण्यात येत आहे. इंडियन एअर लाइन्सच नफा देणाèया सेवा खाजगी कंपन्यांना हस्तांतरित करून इंडियन एअर लाइन तोट्यात आणून त्याला खासगीकरणाच्या वाटेवर आणून ठेवलाय. विमा क्षेत्रातही एलआयसीमध्ये ४९ टक्के खाजगी कंपन्यांना भागीदारी देण्यात आली आहे. सामान्यांच्या जीवनाला सुरक्षेची हमी देणारी व्यवस्था ही खाजगी कंपन्या केव्हा गिळंकृत करतील हे कळणार ही नाही. ९ हजार करोड घेऊन सरकारच्या संगनमताने पळणारे विजय माल्याचे तुम्ही काय बिघडवून घेतलेत? अशाप्रकारचे विविध सार्वजनिक सत्तांचे हस्तांतरण खाजगी कंपन्यांना होत आहे. म्हणजे हा देश खाजगी कंपन्या चालवणार तर लोकशाही व कल्याणकारी राज्याची संकल्पना राहिली कुठे?
शिकलेल्या व चार qभतीच्या आड सुस्त पडलेल्या अविचारी शूद्र-गुलामांनो तुमच्या येणाèया पिढ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. आता तरी अभ्यासपूर्ण विचार करा.ङ्कङ्क आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचाङ्कङ्क असा संविधानाला अपेक्षित भारत केव्हा घडविणार?
सावन कटरे 
प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ मो.९४२१७९६३७१

जैन कलार समाजाची कोजागिरी 7 आक्टोंबरला

416057da-7f9c-4d8e-b145-b932123d23bd

गोंदिया,दि.24- येथील जैन कलार समाज जिल्हा गोंदियाच्या मुख्य कार्यकारिणी , सल्लागार समिती, युवा समिती व महिला समिती  सभा शनिवार(दि.२३) ला  समाज भवन गोंदिया समाज अध्यक्ष  तेजराम मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध समाजोपयोगी विषयांवर चर्चा करण्यात आली. जसे बांधकामांचा आढावा, जमा खर्च , पुढील कामांचे नियोजन, बांधकाम देणगी स्विकारणे, ७ आक्टोबर ला कोजागिरी चे नियोजन, आजीवन सदस्याचे प्रमाणपत्र वाटप आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकिला
समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे, सचिव सुखराम खोब्रागडे, कोषाध्यक्ष शालीकराम लिचडे, सहसचिव सुखराम हरडे, सदस्य लालचंद भांडारकर, उमेश भांडारकर, यशोधरा सोनवाने, विणा सोनवाने, मनोज भांडारकर, राजकुमार पेशने, उमेश हजारे, रोशन दहीकर, देवानंद भांडारकर, गोपाल हजारे, विजयकुमार ठवरे, चेतना रामटेक्कर, रेखा कावळे, वर्षा तिडके व विजय सोनवाने उपस्थित होते.

कंटेनर दुचाकी अपघातात एक ठार,तीन जखमी


वाई फाटा व रीलायन्स पेट्रोल पंपाजवळील घटना
कारंजा लाड दि. 23 कारंजा नागपुर हायवे रस्त्यावरील वाई फाटयाजळ पादचारी चालणा-या 75 वर्षीय इसमाचा कंटेनरने अपघात होउन ठार झाला. तर दुस-या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झालेल्या दुचाकी व कंटनेर अपघातात
3 दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 23 सष्टेंबर रेाजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, मंगरूळपीर तालुक्यातील पोटी पारवा येथील महादेव दगडूजी अंभारे वय 75 हे जमकेश्वर येथून वाई मार्ग पोटी पारवा येथे पायी जात असतांना वाई फाटयाजळ कारंजा कडून भरधाव वेगाने येणा-या सी.जी. 8676 या कंटनेर 75 वर्षीय इसमाला चिरडले. अपघाताची माहीती मिळताच जयगुरूदेव रूग्णवाहीकेचे निलम राठोड, सुमेत बागडे हे घटनास्थळी दाखल होउन अपघात ग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचारा करीता आनले. उपचारा दरम्यान महादेव अंभोरे यांचा मृत्यृ झाला. तर दुसरा अपघात कारंजा नागपुर हायवे रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सायकांळी 5 वाजतांच्या दरम्यान घडला. यामध्ये नागपुर येथून रिलायन्स पेट्रोल पंप चैकातून एम.एच.40 ए.टी. 6777 हा कंटनेर भरधाव वेगाने जात होता. दरम्यान समोरून चांदई कडे तिन प्रवासी स्पेन्डर क्रमांक एम.एच.37 एस 2718 जात असतांना या दुचाकीला कंटनेची जोरदार धडक लागली. या धडकेत चालका सह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. यामध्ये देवीदास हरीभाउ साउत वय 40, नितीन अनिल भगत वय 35, हरीराम साउत वय 36 राहणार चांदई वालई येथील असून या तीन दुचाकी स्वराचे पाय चिरडल्या गेले. अपघात झाल्याची माहीती मिळताच जय गुरूदेव रूग्णवाहीकेचे निलम राठोड, भारत कांबळे, श्याम सवाई व श्री गुरूदेव रूग्णवाहीका विशाल सोनोने, मनसे रूग्णावाहीका बाळू राठोड यांनी अपघात ग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करीता अकोला येथे पाठविण्यात आले. कारंजा ग्रामीण पोलीसांनी दोन्ही कंटनेर ताब्यात घेतले.

कर्जाची उचल न करणाऱ्यांच्या नावे कर्जाची रक्कम

IMG_20170923_122823

गोंदिया तालुक्यातील बिरसी सेवा सहकारी संस्थेचा प्रताप
जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल
गोंदिया,दि.२३-गोंदिया तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बिरसी(कामठा)येथील संस्थेच्या अध्यक्ष व सचिवानी मिळून गावातील शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल केल्याचे प्रकरण संबधित शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास गेले असता समोर आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.या सर्व प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आल्याची माहिती बिरसीचे सरपंच रविंद्र तावाडे यांनी पत्रपरिषदेत दिले.बिरसी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी सुमारे ५४ लाख रुपयाचे कर्ज अशाप्रकारे विनासमंती लोकांच्या नावे उचलून स्वतःच फस्त केले आहे. तावाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,भाऊलाल बनाफर यांच्यानावे ३४ हजार ४३२,कनईसिंह गहरवार यांच्या नावे ६५ हजार,उर्मिला नैकाने यानी ८ हजाराचे कर्ज घेतले परंतु त्याच्या नावे ५१ हजाराची थकबाकी मुद्दल व्याजासह दाखविण्यात आली आहे.रणजितंसिह पंडेले यांनी २००९-१० मध्ये कर्जच घेतले नाही त्या काळात ते गुजरातमध्ये असताना त्यांच्या नावे तरीही ५४ हजाराची थकबाकी दाखविण्यात आली आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल करुन मोठ्याप्रमाणात गैरव्यहार झाल्याचे प्रकरण या कर्जमाफीच्या निमित्ताने समोर आले आहे.सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी केलेल्या या सर्व प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष व सचिव सभासदांना तुमचे कर्ज पुर्ण करुन देऊ चिंता करु नका असे सांगत असल्याचेही तावाडे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणाबाबत संस्थेचे सचिव जी.एस.जांभूळकर यांना विचारणा करण्याकरिता भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

काँग्रेस निरीक्षकांपुढेच आ.वड्डेटीवार व पुगलिया गटात हाणामारी

चंद्रपूर,दि.23 : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच २ गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार आज शनिवारला चंद्रपुरात घडला. माजी खासदार नरेश पुगलिया आणि आमदार विजय वडेट्टीवार गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि गोंधऴ माजला.शहरातील बायपास मार्गावरील इंटक भवनात ही घटना घडली. या गोंधळात सभागृहाच्या काचा फोडल्या, जिल्ह्यातील कुख्यात गुंडांचा सभागृहात वावर असल्याचाही आऱोप करण्यात आला.या गोंधळावेळी झेंड्यांच्या दांड्याचा मारामारीसाठी वापर, लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ देण्याचा पुगलिया गटाचा आग्रह होता तर आमदार वडेट्टीवार गटाने निवडणूक निरीक्षकांना मोकळीक दिली नसल्याचा आरोप करत हा गोंधळ घालण्यात आला.

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपुर्वी अशक्य-खा.प्रफुल पटेल

21762187_1925043814379529_7276582073839327607_n
गोंदिया,दि.23(खेमेंद्र कटरे)- गोंदिया- भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भासह महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून महाराष्ट्र सरकारची कर्जमाफीची घोषणा म्हणजे फसवी योजना असून या योजनेचा लाभ कुठल्याही परिस्थितीत मार्चपुर्वी शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी असल्याची टिका करीत हे सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल म्हणाले.ते आज गोंदिया-भंडारा येथे पक्षाच्या जिल्हा मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.कर्जमाफीसाठीची आॅनलाईनची प्रकिया ही किचकट प्रक्रिया असून मुदतीत भरलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.जिल्हा उपनिबंधकामार्फत तपासलेले अर्ज हे तालुकानिंबधकाच्यावतीने प्रत्येक गावात चावडी वाचनाच्या माध्यमातून तपासले जाणार आहेत.त्यानंतर त्या अर्जावर विचार केला जाणार आहे.त्यामुळे जेव्हा चावडी वाचनाचा प्रकार होईल तेव्हा गावातील लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता वर्तवित ही योजनाच फसणार असल्याचे पटेल म्हणाले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची वाईट अवस्था झाली असून गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालय असलेल्या केटीएस व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाकडे बघितल्यावर आपणासही वाईट वाटते असे म्हणत प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कामकाजात चुकत असल्याचे म्हणाले.जिल्हा सामान्य रुग्णालय असले तरी त्याची ईमारत व इतर गोष्टीकडे बघितल्यास किती निकृष्ट दर्जाचे बांधकाम व देखरेख होते हे बघावयास मिळते असे म्हणाले.सोबत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी श्रेयाचे राजकारण करणे सोपे असते परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते न झाल्यानेच आज मान्यता न देण्याचा विचार समोर येत आहे.याबाबत आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे पटेल म्हणाले.जे लोकामधून निवडून आले त्यांनी पळून न जाता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास करण्यासाठी धावपळ केली पाहिजे.माझे कुणी एैकत नाही हे सांगून चालणार नाही.आपण काय केलात हे जनतेला आधी दाखवा असेही पटेल म्हणाले.
30 रुपयाच्या पेट्रोलवर 50 रुपयाची कमाई
आज देशात सर्वचस्तरावर पेट्रोलचे दर  हे डाॅलरच्या तुलनेत 30 ते 35 रुपये प्रतिलिटर असायला हवे.परंतु सरकार एका पेट्रोलवर 50 रुपयाची कमाई करीत आजपर्यंत सुमारे 4 ते 5 लाख कोटी रुपयाची कमाई पेट्रोलच्या माध्यमातून सरकारने केल्याचे खा.पटेल म्हणाले.आमचे युपीएचे सरकार असताना डाॅलरचे दर अधिक असतानाही आमच्या काळात पेट्रोल 80 च्या वर पोचले नव्हते परंतु सध्यातर डाॅलरचे दर कधीपासूनचे कमी असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.सोबतच गॅसवरील सबसिडी सुध्दा बंद केली असून कुठल्याच खात्यावर सबसिडी जमा होत नसल्याचेही सांगत सरकार सबसिडीच बंद करायला निघाल्याचे म्हणाले.देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईस आली असून मोदी सरकारच्या काळात निर्यातमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.निर्यातमध्ये झालेली घट भरुन काढण्यासाठी सबसिडी बंद करणे ,पेट्रोलच्या दरात वाढ करुन तो पैसा सरकार वसूल करीत असल्याचा आरोप खा.पटेल यांनी केला.मेक इन इंडियाच्या नावावर गाजर दाखविण्याचे काम केले असले तरी डोकलाम मध्ये झालेली चिनची माघार ही आर्थिक व्यवस्थेचा परिणाम बघून झाल्याचे म्हणाले.भारतासोबत संबध ताणल्यास 3 लाख कोटीच्या व्यापारावर चिनला फटका बसू शकला असता तो टाळण्यासाठी चिनने डोकलाम मध्ये ताळमेळ बसवत माघार घेतल्याचे ही पटेल म्हणाले.देशात भाजपचे सरकार आल्यानंतर कुठलेच बदल झाले नसून विकासही झालेला नाही.ज्या गुजरात मधून मोदी आलेत त्या गुजरातमधील शेतकरी सुध्दा अडचणीत असून अस्वच्छतेचा कहर गुजरातमधल्या विविध शहरात बघावयास मिळतो.

सरकारवर फसवणुकीची गुन्हा दाखल व्हावा- नाना पटोले

Nana Patole 1 copy

नागपूर,दि.23 – ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय.  राज्यातील कोणत्याही तलावात बारमाही पाणी राहात नाही. तरीही वर्षभराची लीज वसूल करून मच्छिमारांची फसवणूक सुरू आहे.  शेतकरी व मच्छिमारांची फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ४२० कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकरी व मच्छिमारांच्या बाजुने निर्णय झाला नाही, तर रस्त्यावर लढाई करु असा इशारा खासदार नाना पटोले यांनी शनिवारी नागपूरात दिला.
कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर न लावता मासेमार -शेतकरी संघर्ष अभियान राबविण्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.  या पार्श्वभूमिवर बजाजनगर येथे मच्छिमारांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय जवान, जय किसान  संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, मच्छिमार संघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक बर्वे, विदर्भ मच्छिमार संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, प्रफुल्ल पाटील, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, मनू दत्ता, देविदास चवरे, रामदास पडवळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Saturday 23 September 2017

कर्जमाफीसाठी 58 लाख अर्ज


मुंबई,दि.23 – कर्जमाफीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत 58 लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज आल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात 89 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत, हा सरकारचा दावा खोटा ठरला आहे. यात किमान 15 ते 20 लाख खोटे खातेदार असल्याची शंका सहकार खात्याला आहे. आठवडाभरात हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे समजते.
राज्य सरकारच्या घोषणेनुसार राज्यात 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सरकारने जाहीर केले होते. या शेतकऱ्यांना सुमारे 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असेही सरकारने जाहीर केले आहे. मात्र, या थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांबद्दलची कोणतीच माहिती राज्य सरकार अथवा राज्याच्या सहकार विभागाकडे नाही. 2008-09 च्या कर्जमाफीत 70 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. सहकार खात्याने आता याबाबत बॅंकांना विचारणा केली असता तेव्हाची माहिती उपलब्ध नसल्याचे बॅंकांनी सांगितले. काही हजारांच्या कर्जासाठी शेतकरी, नागरिकांना नोटिसावर नोटिसा बजावणाऱ्या बॅंकांकडे 10 हजार कोटींच्या कर्जमाफीचे कोणतेही पुरावे नसावेत, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आ.राणाच्या गाडीवर नागपूरात हल्ला

नागपूर,दि.२३:- बडनेराचे आमदार व युवा स्वाभीमानचे अध्यक्ष रवी राणा यांच्या वाहनावर आज नागपूरात अनोळखी इसमाने हल्ला केल्याची घटना घडली.

पोलिसांवर गुंडाचा चाकूहल्ला

यवतमाळ, दि. 22 :: नागपूर व यवतमाळ पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलिसांवर चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 21) रात्री शहरात घडली. यात तीन पोलिस कर्मचार्‍यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
येथील रहिवासी नारू पिल्ले यांचा नागपुरात राहणारा भाचा प्रतीक पिल्ले (वय 23) हा गुरुवारी शहरातील आठवडी बाजारात चाकूचा धाक दाखवून लोकांना धमकावत होता. त्यामुळे आठवडी बाजारातील काही नागरिकांनी त्याला तेथून हाकलून लावले. त्यानंतर तो अग्रसेन भवनजवळ असलेल्या दुर्गादेवीच्या मंडपाजवळ आला. तेथेही त्याने रंगदारी सुरू केली. चाकूचा धाक दाखवून लोकांना धमकावले. त्यामुळे दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्याचा वाद झाला. कुणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक संजीव खंडारे, जमादार सुजित सोनोने, जमादार सुहास मंदावार, पोलिस कर्मचारी नितीन गेडाम व सचिन मडकाम तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे पाहताच त्या गुंडाने तेथून पळ काढला. तो आपल्या मामाच्या घरी दडून बसला. पोलिसांना त्याच्या मामा नारू पिल्ले यांनी तो घरी नसल्याचे सांगितले.
पोलिस परत फिरताना बोळीत लपून बसलेल्या त्या गुंडाने पोलिसांवर चाकूहल्ला केला. त्याने पोलिस उपनिरीक्षक संजीव खंडारे यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. तर जमादार सुजित सोनोने यांच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर सुहास मंदावार यांच्या खांद्यावर चाकू मारला. तो चाकू त्याच्या खांद्यातच तुटला. त्यामुळे त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढला. यात तिन्ही पोलिस कर्मचार्‍यांना गंभीर दुखापत झाली. तर झटापटीत संशयित आरोपी प्रतीक पिल्ले यालाही खाली पडल्याने डोक्याला मार लागला. त्या सर्वांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शरद पवार एनडीएसोबत -रामदास आठवले

aathwale

अमरावती, दि. २२ –  केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे पत्रपरिषदेत केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहिताचे निर्णय घेत आहेत. नोटबंदी, जीएसटी, रस्ते विकास, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना अशा विविध योजनांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिकेत असून न्यायालयाच्या अधीन राहून मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही अगोदरपासून रिपाइंची मागणी आहे. केंद्र सरकार संविधान बदलविणार हे विरोधकांचे दिशाभूल करणारे वक्तव्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधिकारी, कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. कोणत्याही कर्मचा-यांवर अन्याय होणार नाही, ही काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही ना. आठवले यांनी दिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. ते लवकरच भाजपात येणार असून रिपाइंची दारेही त्यांच्यासाठी खुली आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अमरावतीचे महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, भाजपाचे पक्षनेता सुनील काळे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आ. अनिल गोंडाणे, नगरसेवक प्रकाश बनसोड, प्रदीप दंदे, कृष्णा गणविर, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.

Friday 22 September 2017

सिमेंट रस्ता बांधकामात गैरव्यवहार,अभियंत्याचे कंत्राटदाराला पाठबळ

21bhph35_20170914290मोहाडी,दि.22 : तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली. मात्र साहायक अभियंत्याने तक्रारदाराला पत्र देऊन साधी चौकशीही केली नाही. यावरून साहायक अभियंता कंत्राटदाराला पाठबळ देत असल्याचा आरोप तक्रारदार सुनील मेश्राम यांनी केला आहे.चौकशी विनाच ठेकेदाराला कामाचे देयके दिल्यास उपोषण करण्याचा इशारा मेश्राम यांनी दिला आहे.

कंत्राटाराला पाच जणांना कमीशन द्यावे लागणार असल्याने व साहायक अभियंता, शाखा अभियंता यांचे निकृष्ट काम करण्यास पाठबळ मिळत असल्याने ठेकेदाराने सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा गौडबंगाल करणे सुरू आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या ५०/५४ योजने अंतर्गत मुख्य चौक ते सेलोकर यांच्या घरापर्यंत ३०० मीटर १५ लक्ष रूपये अंदाजपत्रकाचे असून काम करणारी यंत्रणा रोहणा ग्रामपंचायत आहे. चांगल्या योजनांना गालबोट लावण्याचे काम प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार करीत आहेत.
बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदाराला घेऊन करावी व तसा अहवाल पाठवावा, असे पत्र ८ सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सहायक अभियंता यांना दिले तरीही चौकशी होत नसल्याने तक्रारदाराने उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी साहायक अभियंता यांना फोन करून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदारांना घेऊन करण्याचे सांगितले. मात्र त्यांच्याही आदेशाला साहायक अभियंत्याने जुमानले नाही. पुन्हा १५ सप्टेंबरला तक्रारदार नवनियुक्त कार्यकारी अभियंत्यांना भेटले. त्यावेळी साहायक अभियंता यांना दूरध्वनीद्वारे तक्रारदाराला सोबत घेऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या सिमेंट रस्त्याची चौकशी करून सिमेंट रस्ता बघण्यासाठी मला बोलवा असे सांगितले त्यावेळी त्यांचे कक्षात उपकार्यकारी अभियंता हे सुद्धा उपस्थित होते.

यावरून सहायक अभियंता किती कार्यतत्पर आहे हे स्पष्ट होते. कार्यकारी अभियंत्याच्या पत्राला केराची टोपली दाखविली व दूरध्वनीवरच बोलण हवेतच विरले.कंत्राटाराला पाठबळ देऊन सिमेंट रस्त्याचे काम सुरूच ठेवून वरिष्ठ अधिकाºयांची व तक्रारदार यांची दीशाभूल सहायक अभियंत्यांनी या ठिकाणी केली आहे.

आमगाव विधानसभा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त जाहीर करा


21gndph19_20170914270


देवरी,दि.22 : आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे धानाचे उत्पादन होऊ शकले नाही. या तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. या मागणीचे निवेदन आ. संजय पुराम यांनी कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांना मंगळवार (दि.१९) मंत्रालयात दिले. यावर कृषीमंत्र्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.
या दरम्यान आ. पुराम यांनी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सालेकसा तालुक्यातील आदीवासींचे देवस्थान कचारगढ व हाजराफॉल (धबधबा) येथे रोपवे मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केलीे आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून दोन्ही ठिकाणी पर्यटक व भाविक लाखोंच्या संख्येत येतात. रोपवे निर्माण केल्यास येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. सदर ठिकाण महाराष्ट्राच्या महत्वाच्या पर्यटनाच्या नकाशावर घेता येतील. यासाठी आपल्या विभागाकडून सदर प्रकल्प मंजूर करुन ऐतिहासीक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.
यावर सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याचे सचिव यांना तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनासुध्दा निवेदन देवून देवरी, सालेकसा, आमगाव तिन्ही तालुके तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून एमटीडीसी मार्फत हाजराफॉल व कचारगड येथे विश्रामगृह निर्माण करण्याची मागणी केली. यावर मंत्री रावल यांनी ‘ब’ वर्गाचे पर्यटन स्थळ असलेले कचारगड तसेच हाजराफॉल येथे विश्रामगृह बांधून देण्याची हमी दिली.
यावेळीे आ.पुराम यांनी या भागातील विविध समस्या मार्गी परिसराच्या विकासाला गती देण्याची मागणी विविध विभागाच्या मंत्र्यांकडे केली. तसेच विविध मागण्याचे निवेदन त्यांना दिले.

मागासवर्गियांचे आरक्षण कायम ठेवा-बंजारा समाजाची मागणी


21gndph16_20170914272


गोंदिया,दि.22 : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नती, आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. यासंदर्भात राज्य शासनाने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून आरक्षण अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाचे अधिकारी कर्मचारी यांनी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. या संबंधात राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी सादर करण्यात आली.
निवेदन देतेवेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा सचिव सुनील राठोड, कोषाध्यक्ष विलास राठोड, संजय राठोड, गणेश पवार, जाधव, आकाश चव्हाण तसेच इतर तालुक्यातील बंजारा कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी एकजुटीने सामाजिक संघटनेचे कार्य करुन समाजाचा विकास कसा करता येईल, याबद्दल चर्चा करण्यात आली.

देवरी तालुक्यातील ग्रामीण राजकारण पेटले


तालुका प्रशासन देखील सज्ज

आजपासून नामांकनाला सुरवात

सुरेश भदाडे


Image result for gram panchayat logoदेवरी,२२- 'गावचा सरपंच हा थेट जनतेतून ' या राज्यसरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकारणाने चांगलाच पेट घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याची देवरी सारख्या शांत तालुक्याली सुद्धा लागण झाली असून गावागावात 'सरपंच मीच होणार' या भावनेचा चांगलाच उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आवाहन पेलण्यासाठी तालुका प्रशासनाने सुद्धा कंबर कसली असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरूडे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राज्य सरकारने यावर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणा करून आमुलाग्र बदल घडवून आणला. आता सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य नाही, तर जनतेद्वारा थेट मतदानातून निवड करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. हे बदल करताना गावसरंपचाच्या अधिकार कक्षा रुंदावताच त्यांच्या अधिकारातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण राजकारणातील लुडबुड कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने सरपंचावरील अविश्वास दर्शक ठराव पारित करण्याची पारंपारिक पद्दत सुद्धा उखडून फेकली आहे. परिणामी, गावात 'मीच सरपंच होणार' या भावनेने गावनेते चांगलेच कामाला लागले आहेत. यामुळे आतापर्यंत पॅनलमध्ये निवडणुक लढवून नंतर सरपंच पदाची फिल्डींग लावणारी मंडळी आता पॅनल ऐवजी सरपंचाच्या खूर्चीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते सुद्धा पडद्याआड चाली खेळून या निवडणुकीत रंग भरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
देवरी तालुक्यातील नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाèया २५ ग्रामपंचायतींसाठी येत्या १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून आज २२ सप्टेंबर पासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. एकूण ७५ प्रभागासाठी होणाèया निवडणुकीतून २०९ सदस्यांची निवड होणार असून यात ११७ महिला सदस्यांचा समावेश आहे. आरक्षणाचा विचार केला तर अनुसूचित जातीतील २३ पैकी १९, अनुसूचित जमातीतील १२० पैकी ६४, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून ४१ पैकी २१ तर सर्वसाधारण गटातून २५ पैकी १३ महिला सदस्यांची निवड करावयाची आहे.
तालुक्यातील सरपंच पदाचा आकडेवारी पाहिल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातून ४ पैकी २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ पैकी ९, नामाप्रतून ६ पैकी २ तर सर्वसाधारण गटातून २ पैकी १ असे १४ गावाच्या प्रमुखपदी महिला सरपंच विराजमान होणार आहेत. देवरी तालुक्यातील ४१ हजार १४८ लोकसंख्येच्या २५ गावातील २९ हजार २९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. यामध्ये १४ हजार ८७३ पुरूष तर १४ हजार २९७ महिला मतदारांचा समावेश आहे.
तहसीलदार विजय बोरूडे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणुक सुरळीत पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे सांगत एकूण ५ निवडणूक निर्णय अधिकारी व ५ सहायत निवडणूक निर्णय अधिकाèयांची नेमणूक केल्याची माहिती दिली. निवडणुक प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा श्री. बोरुडे यांनी बोलताना केले. सदर निवडणुक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले

Thursday 21 September 2017

मीच पक्ष सोडतो, असे म्हणत नारायण राणेंची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी


 

rane03_1505991346
सिंधूदुर्ग(विशेष प्रतिनिधी),दि.21- ‘तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो’, असे म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज (गुरुवारी) घटस्थापनेच्या मुहुर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.
अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच निश्चित करू, असे त्यांनी स्पष्ट केले.संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसर्‍याच्या आधी माझी ताकद काय आहे, हेही दाखवून देतो. दसर्‍याच्या आधी पुढील भूमिका स्पष्‍ट करणार असल्याचे राणेंनी म्हटले आहे. शिवसेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी राणेंनी काँग्रेसमधील 12 वर्षांची खदखद व्यक्त केली.

मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्यावेळी प्रणव मुखर्जी, अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा 48 आमदारांनी मला पसंती दिली, तर 32 आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनाच पक्ष वाढवायचा नाही. तेच पक्षातील नेत्यांवर कुरघोड्या करत आहेत. त्यामुळे मला चारवेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते, मात्र ते पाळले नाही, असे त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांनी मला केवळ अडचणीत आणण्याचे काम केले असे राणेंनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुकान बंद होणार असून महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही, अशी राणेंनी नाराजी यावेळी व्यक्त केली आहे. आता मी काँग्रेसमूक्त झालो असल्याचे ते म्हणाले. दुपारी दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवल्याचे राणेंनी सांगितले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...