Sunday, 17 September 2017

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-काँग्रेसची मागणी

16gndph17_20170912995गोंदिया,दि.17 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टरवर धानाची शेती केली जाते. ज्यावर जिह्यातील १० लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेजमजूर, कृषी व्यापारी व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा पावसाअभावी ७० टक्के रोवण्या झालेल्या नाही. ज्या शेतकºयांनी रोवण्या केल्या त्या देखील संकटात आल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशात आता पाऊस आला तरिही धानाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत दुष्काळी स्थिती पाहता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन उपाय योजना राबविण्याची मागणी केली. सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी अद्याप झालेली नाही. शेतकºयांना १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली.मात्र बँकांनी शेतकºयांना कर्ज दिले नाही. उलट कर्जमाफी व तातडीच्या कर्जाच्या आशेत शेतकºयांनी नातेवाईक व सावकारांकडून कर्ज घेऊन जास्तच संकट ओढवून घेतले आहे. यामुळे येणाºया दोन-तीन महिन्यांत शेतकºयांची स्थिती अधिक गंभीर होणार आहे. पीक विमा काढण्यातही जिल्ह्यातील शेतकरी माहिती अभावी मागे राहिले. शिवाय ५ आॅगस्ट रोजी सरकारने आॅनलाईन ऐवजी साध्या अर्जावर पीक विमा करवून देण्याचे आदेश दिले. मात्र शेतकºयांपर्यंत या सूचना न पोहोचल्याने लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचीत राहिल्याचे वंचित आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आता सरकारने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांना देण्यात येणारी सर्व मदत येथील शेतकºयांना त्वरीत देण्यात यावी. कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित करून राज्यव्यापी कर्जमाफी देण्यात यावी, कर्ज वसुली न करण्याचे आदेश सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात यावे, शेतकºयांचे महसूल कर, पाणीपट्टीकर आदि शासकीय करवसुली स्थगित करावी, शेतकºयांनी हेक्टरी ३५ हजार रूपयांची मदत देण्यात यावी, शेतकºयांचे वीज देयक भरून सिंचन योजनांवरील वीज जोडणी पुन्हा करावी, कृषीपंपांची थकबाकी असल्याने खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पुन्हा करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, झामसिंग बघेले, डॉ. योगेंद्र भगत, राधेलाल पटले, पी.जी.कटरे, रमेश अंबुले, विनोद जैन, उषा शहारे, प्रकाश रहमतकर, विमल नागपूरे, भागवत मेश्राम, डेमेंद्र रहांगडाले, अमर वराडे,संदिप भाटिया,शेखर पटले यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...