गोंदिया,१७- गोंदिया जिल्ह्यातील दवडीपार या लहानशा खेड्यातील एका सामान्य कुटुंबात १९७५ साली १७ सप्टेंबर रोजी जन्मलेले खेमेंद्र कटरे यांनी आपल्या जिद्दीने व कष्टाने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या निर्भीड, निःपक्ष आणि सडेतोड पत्रकाराला त्यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त बेरारटाईम्स परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
श्री खेमेंद्र कटरे यांचा जन्म गोंदिया नजीक असलेल्या गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथील श्री हिरदीलाल कटरे या शिक्षक दांपत्यांच्या घरी झाला. श्री. कटरे यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नेवजाभाई हितकारणी महाविद्यालयातून पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना समाजकारणाची आवड जडली. आपल्या समाजाला प्रस्थापितांकडून मिळणारी वागणूक, ओबीसी समाजाची हलाखीची परिस्थिती, शिक्षणाच्या सोयी या विषयाला घेŸवून त्यांच्या मनाची नेहमीच घालमेल व्हायची. या सर्व बाबींनी नेहमी त्यांचे मन कासावीस होत असे. यातून त्यांना आपल्या समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्वखर्चाने त्यांनी ओबीसी समाजाचे मोर्चे काढून आपल्या समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याची एकप्रकारे प्रक्रिया सुरू केली. त्यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरातील थोर मंडळी हे सर्व शासकीय नोकरीत असताना त्यांचेवर एखादी शासकीय नोकरी करण्याचे दडपण होते. मात्र, विद्यार्थिदशेपासून समाज कार्याची आवड असलेले खेमेंद्रजी यांचे मन तिकडे रमले नाही. समाजाच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे व्रत स्वीकारले. सुमारे वीस वर्षे त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या बॅनरखालील वृत्तपत्रात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. पण माध्यम जगतात असलेली प्रस्थापितांची मालगुजारीमुळे त्यांच्या लिखाणावर नेहमी गदा येऊ लागली. त्यांच्या ओबीसी समाजाच्या हिताच्या लिखाणावर मर्यादा घातली जायची. या सर्व बाबींमुळे त्यांनी या प्रस्थापितांच्या माध्यम जगताला निरोप देण्याची धाडसी निर्णय २०११ साली घेतला. आर्थिक चणचण असली तरी समाजासाठी असलेली तगमग काही केल्या कमी झाली नाही. यातून आपल्या समाजाला काही मिळवून द्यायचे असेल तर आपले स्वतःचे माध्यम असणे गरजेचे आहे, हे ओेखळून त्यांनी बेरारटाईम्स या नावाने साप्ताहिक सुरू करण्याचे ठरविले. पत्रकारिता करीत असताना ओबीसी समाजासाठी वेगवेगळ्या बॅनरखाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणाèया समाजधुरिणांना एकत्र आणण्याचा विडा सुद्धा त्यांनी उचलला. यातून आजची ओबीसी चळवळ मोठी करण्यास त्यांच्या या कामाने मोठे पाठबळ मिळाले.
या कठीण कार्यासाठी प्रवाहाविरुद्ध प्रवास करणाèया निर्भीड पत्रकाराला आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढत त्यांची समाजविकासाचा रथ पुढे नेण्याची जिद्द नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या कार्यात त्यांची सहचारिणी सौ भारती कटरे आणि चिमुकली मुलगी मुस्कान ह्यांचा मोलाचा वाटा आहे, हे प्रकर्षाने नमूद करावे लागेल. त्यांच्या ४२ व्या वाढदिवसी त्यांना बेरारटाईम्स परिवाराकडून मनस्वी शुभेच्छा.
-बेरारटाईम्स परिवार
Happy birthday to Khemendra bhai.
ReplyDelete