Wednesday, 20 September 2017

वडेपुरी जि.प. क्षेत्रातील सरपंचांनी दिली हिवरेबाजार गावाला भेट

जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचा उपक्रम
नांदेड,20-   गावाच्‍या भौतिक व मानवी विकासाची संकल्‍पना स्‍पष्‍ट व्‍हावी, गावकारभा-यांना गावच्‍या विकासाची योग्‍य दिशा मिळावी म्‍हणून वडेपूरी सर्कलच्‍या जिल्‍हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच व प्रतिष्‍ठीत नागरीक यांची अहमदनगर जिल्‍हयातील हिवरे बाजार या गावात ग्रामविकास अभ्‍यास सहल जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्‍या पुढाकाराने आयोजित करण्‍यात आली होती. गावभेटी दरम्‍यान प्रत्‍यक्ष हिवरेबाजारमध्‍ये पोपटराव पवार यांच्‍या कर्मभूमीतील मार्गदर्शनामुळे सरपंचांना गाव विकासाच्‍या कृतीची प्रेरणा मिळाली.
      यावेळी सहलीमध्‍ये लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सौ.सोनालीताई शंकर ढगे, माजी उपसभापती लक्ष्‍मण बोडके, पंचायत समिती सदस्‍य आनंद शिंदे, सरपंच साईनाथ टरके, विलास रेंगे, बालाजी डेरलेकर, विरभद्र राजुरे, प्रकाश मोरे, शंकर ढगे, मुख्‍याध्‍यापक प्रभाकर कदम तसेच जिल्‍हा परिषदेचे स्‍वच्‍छ भारत मिशनचे अभियंता विशाल कदम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
      हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी आपल्‍या ग्रामीण शैलीत सरपंचांना आपले अनुभव सांगितले. गावातल्‍या सर्व प्रकारच्‍या लोकांचा पाठींबा आणि विरोध यासर्वांवर मात करीत सरपंचांना काम करावयाचे असते. लोकांच्‍या सवयी लक्षात घेऊन व त्‍यांच्‍या भावना लक्षात घेऊन आपल्‍या योजना व कामांमध्‍ये काही व्‍यवहारीक बदल केल्‍यास गावचे चित्र बदलणे अवघड नाही असे त्‍यांनी सांगितले. तसेच अभ्‍यास सहलीत आलेल्‍या सरपंचांनी प्रत्‍यक्ष गावक-यांशी बोलून गावातील परिवर्तन समजून घेतले. भौतिक विकासाबरोबरच करवसूली, सांडपाणी, शैक्षणीक गुणवत्‍ता, जलसंधारणाची कामे, शुध्‍द पिण्‍याचे पाणी तसेच लोकसहभागातील विविध उपक्रमाची माहिती सरपंचांनी घेतली.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...