Tuesday, 19 September 2017

देवरी येथे स्वच्छ भारत अभियान

देवरी,19-देवरीच्या नगरपंचायत आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने स्थानिक सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्रात भारत स्वच्छता अभियान व अभ्यासिका केंद्राच्या साप्ताहित स्वच्छता अभियान अपक्रमांतर्गत अभ्यासिका केंद्राच्या परिसरात स्वच्छता अभियान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. 
अभ्यासिका केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य हवा, स्वच्छ परिसर, स्वच्छ वातावरणाचा त्यांच्या जीवनप्रणालीवर योग्य परिणाम व्हावा, या करिता अभ्यासिका केंद्रात व्यवस्थापकासह विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आठवड्याच्या प्रत्येक रविवारी साप्ताहिक स्वच्छता अभियान म्हणून सातत्याने उपक्रम आयोजित करण्यात येतात. भारत स्वच्छ अभियानअंतर्गत झालेल्या स्वच्छता अभियानात संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, सहकारी हर्षवर्धन मेश्राम, राधेश्याम धनवाते , अरुण मानकर, गोपाल चनाप, संदीप गोंडाणे, राजेश धनवाते, सीमा भुरकुटे व इतर संस्थेचे पदाधिकारी अभ्यासिका वर्ग व  विद्यार्थी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...