एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी कमी करत प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलिंडरचा दर दोन रुपयांनी वाढवावा, असे सरकारने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्यांना सांगितले आहे. त्यानुसार सध्या एलपीजीचे दरही वाढत आहेत. केरोसिनवरील सबसिडी जशी टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली, त्याचप्रमाणे एलपीजीवरील सबसिडीही कमी करण्यात येत आहे.
मलेशिया, इंडोनेशिया, भूतान, म्यानमार या आशियाई देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल व डिझेलचा दर सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. १ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार, भारतात पेट्रोल ६९.२६ रुपयांना विकले जात होते तर मलेशियात ते ३२.१९ रुपये प्रतिलीटर या दराने विकले जात होते. याच दिवशी इंडोनेशियात भारताच्या
तुलनेत पेट्रोलचा दर ४१ टक्के कमी होता.
जागतिक बाजारात प्रति बॅरल कच्च्या खनिज तेलाचा दर २०१४ पासून सातत्याने खाली येत असून हा दर २०१४ पासून 106 डॉलरवरून यावर्षी ५१ डॉलरवर आला आहे. तरीही देशात इंधन महाग मिळत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment